ASHOK HASE...
2.8K views
2 days ago
प्रसिद्ध संगीतकार, संगीत सम्राट वसंत देसाई यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन... 💐🙏 महाराष्ट्र भूमीने हिंदी चित्रपटसृष्टीला जी लखलखती अस्सल रत्ने दिली त्यापैकीच वसंत देसाई हे एक अमूल्य रत्न. प्रभात युगापासून त्यांच्या चालींनी जशी मराठी चित्रपटांना बहार आणली, तसेच ते हिंदीतही चमकले. घन:श्याम सुंदरा श्रीधरा,अरुणोदय झाला', या त्यांनी स्वरसाज चढवलेल्या भूपाळीने आजही महाराष्ट्र रोज सकाळी जागा होतो. 'ऐ मालिक तेरे बंदे हम' ही त्यांनी स्वरबद्ध केलेली प्रार्थना आजही केवळ भारतात नव्हे तर पाकिस्तानातही प्रिय आहे. 'गुड्डी'मधील 'हमको मन की शक्ति देना' ही प्रार्थनाही अशीच लोकप्रिय झाली. 'झनक झनक पायल बाजे', ' गूँज ऊठी शहनाई' या आणि अशा अनेक चित्रपटांतील त्यांनी संगीतबद्धकेलेली गीते अजरामर झाली. १९६२च्या चीन युद्धाच्या वेळचे 'जिंकू किंवा मरू’ या ग.दि. माडगुळकर यांच्या गीताला त्यांनीच चाल लावली होती. त्यांनी दिलेल्या अप्रतिम चालींनमुळे त्यांचे नाव भारतात आणि परदेशांत अजरामर झाले आहे. #वसंत_देसाई #पुण्यतिथी #स्मृतिदिन #विनम्र #अभिवादन #VasantDesai #Punyatithi #Smrutidin #Vinamra #Abhiwadan ##जयंती /श्रध्दांजली /स्मृतीदिन/ पुण्यतिथी /बर्थडे #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #दिनविशेष... ✍ #अशोक हासे ग्राफिक आर्ट