ASHOK HASE...
725 views • 9 hours ago
आपल्याला लहानपणापासूनच 'मुक्या प्राण्यांवर प्रेम करा' ही शिकवणी दिली जाते. अनेक साधू-संतांनीही आपल्या वाणीतून भूतदयेविषयी जनजागृती केली आहे. 'सर्व सृष्टीवर प्रेम करा’ हे भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारे सांगितले आहे. परंतु गेल्या काही दशकांत आपण त्यापासून दूर जाऊ लागलो आहोत आणि हे पूर्णपणे चुकीचे आहे. फक्त आपल्याकडेच नाही; तर जगात अनेक ठिकाणी सर्व प्रकारच्या प्राणीमात्रांना क्रूरपणे वागवले जाते किंवा त्यांच्याकडे दुर्लक्षच केले जाते. वास्तविक माणूस आणि इतर प्राण्यांची मैत्री जुनीच आहे, परंतु हे संबध आता अनेक कारणांनी ताणले जाऊ लागले आहेत.
प्राण्यांचेही पर्यावरणासोबतच संरक्षण व्हावे यासाठी १९३१ मध्ये इटली देशातील फ्लाॅरेन्स शहरात एक पर्यावरण परिषद भरवण्यात आली होती. या परिषदेत लोकांमध्ये प्राण्यांविषयी संवेदनशीलता आणि आपुलकीची भावना निर्माण करण्यासाठी जनजागृती व्हावी यासाठी ४ ऑक्टोबर हा दिवस 'जागतिक प्राणी दिवस' म्हणून पाळला जावा, असे ठरवण्यात आले.
जागतिक प्राणी दिनानिमित्त सर्व प्राणीप्रेमी व प्राणीमित्र संघटना यांना मनःपूर्वक शुभेच्छा... 🌹🙏
#जागतिक_प्राणी_दिवस #हार्दिक #शुभेच्छा
#WorldAnimalDay #Hardik #Shubhechha
#📢4 ऑक्टोबर अपडेट्स🔴 #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #दिनविशेष... ✍ #अशोक हासे ग्राफिक आर्ट
6 likes
19 shares