KG
1K views
5 months ago
नांदेडचा नूरच हरवलेला, मग कसला ‘कोहिनूर’ म्हणायचा..! #नांदेड जिल्ह्यातील परिस्थिती अतिशय भीषण झाली आहे. मुसळधार पावसामुळे गावोगावी हाहाकार माजला आहे. अनेकांचे प्राण गेले, जनावरे वाहून गेली आणि त्याहून मोठं दुःख म्हणजे अंत्यसंस्कार करण्यासाठीही रस्ते उरलेले नाहीत. सर्वत्र फक्त आक्रोश ऐकू येतोय. अशा वेळी सत्ताधारी आमदार-खासदारांनी लोकांच्या वेदना मांडायला हवे होते; पण डझनभर लोकप्रतिनिधी असूनही कोणीच पुढे सरसावलेले नाही. नांदेड जिल्ह्यासह हदगाव हिमायतनगर विधानसभा क्षेत्रातील अनेक गावे पाण्याखाली आहेत, मुखेड तालुक्यात तर परिस्थिती जीवघेणी बनली आहे कंधार किनवट अशी नांदेड जिल्ह्यातले जवळपास बरेच तालुके पाण्याखाली आहेत. परंतु खरी गरज आहे तत्काळ मदतीची. तर लोकांच्या दुःखात त्यांच्यासोबत उभं राहणं हेच लोकप्रतिनिधीचं खरं कर्तव्य आणि जबाबदारी आहे. #💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐 #⛈️पुढील 24 तासांसाठी सर्तकेचा इशारा जारी☔ #महाराष्ट्र #nanded