फॉलो करा
Dr Rutuja (Hemangi) @Youth India Hroup
@315794121
1,086
पोस्ट
3,116
फॉलोअर्स
Dr Rutuja (Hemangi) @Youth India Hroup
575 जणांनी पाहिले
25 दिवसांपूर्वी
ठाणे पुर्व चेंदणी कोळीवाडा येथे फास्ट फूड सेंटर किंवा इतर खाद्य व्यवसायासाठी रस्त्यालगतची जागा भाडयाने द्यायची आहे.... या जागेवर चायनीज हाॅटेलचा धंदा मजबूत नफ्यात जोरदार चालू होता... कोणाला फुड सेंटर - स्टाॅल चालू करायचे असेल तर संपर्क करा-😊👍 whatsApp 9821215879 #🙂Positive Thought
Dr Rutuja (Hemangi) @Youth India Hroup
934 जणांनी पाहिले
25 दिवसांपूर्वी
FoodKart -- Stall start up business sathi jaga rent ni dyaychi aahe...... Thane East la.... koni interested asel tar message drop kara....9821215879 whatsapp #🙂Positive Thought
Dr Rutuja (Hemangi) @Youth India Hroup
1.3K जणांनी पाहिले
2 महिन्यांपूर्वी
*आजचे ऐतिहासिक शिवकालीन दिनविशेष.* **************************** 📜 १६ नोव्हेंबर इ.स.१६७७ (मार्गशीर्ष शुद्ध द्वितीया शके १५९९ संवत्सर पिंगळ वार शुक्रवार) व्यंकोजीराजे यांच्या फौजेबरोबर मराठ्यांची चकमक! किल्ले जिंजीचा सुभा संताजी भोसले व हंबीरराव मोहीते यांच्यासह रघुनाथपंतांच्या ताब्यात देऊन महाराज ४००० घोडेस्वारांसह ते ऑक्टोबर इ.स.१६७७ च्या शेवटी जिंजीहून निघाले. त्यांच्या सोबत आनंदराव व मानाजी मोरे हेही होते. आपला मुलुख महाराजांनी‌ बळकावल्यामुळे व्यंकोजीराजे चिडून जाणे स्वाभाविक होते. त्यांनी मदुरेचा नायक व अन्य पाळेगार यांच्याशी संगनमत करून महाराजांची पाठ फिरताच आपला मुलुख परत मिळविण्याचे ठरविले.त्याप्रमाणे महाराज‌ निघून जाताच ४००० स्वार व १०००० पायदळ जमवून त्यांनी युद्धाची तयारी चालविली. यावेळी हंबीरराव मोहीते व संताजी भोसले ६००० स्वार व ६००० पायदळासह वालगुंडपुरास होते. व्यंकोजीराजे यांचे सैन्य त्यांच्या वर चालून आले. दोन्ही सैन्य समोरासमोर आली तरी लढाईस तोंड लागेना. कारण कित्येक दिवस व्यंकोजीराजे यांच्या सैन्याच्या तळावरून गिधाडांचा कळप रोज जात असे. या अपशकुनाला भिऊन व्यंकोजीराजे युद्ध टाळीत होते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १६ नोव्हेंबर इ.स‌.१६७९ ऑगस्ट १६७९ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पावसाळ्याचा फायदा घेऊन इंग्रज व सिद्दीच्या समुद्री हालचालींना पायबंद घालण्यासाठी मुंबईजवळील खांदेरी बेट ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम सुरू केले.या कामी इंग्रजानी विरोध करत खांदेरीची नाकेबंदी केली. याचबरोबर आपल्या भांडणाचा फायदा घेऊन सिद्दीने हे बेट ताब्यात घेऊ नये ही काळजीही ते घेत होते. पण नोव्हेंबर महिन्यात सिद्दी २ मोठ्या नौका ३ डोलकाठयांची ५ फ्रिगेट्स २ गुराब आणि २५ गलबतांचे आरमार घेऊन मुंबईजवळ दाखल झाला.आपल्या बरोबर त्याने लगेच खांदेरीची बातमी मिळवली की खांदेरीवर ३०० सैनिक २०० कामकरी व फक्त १२ तोफा आहेत. सिद्दीचा मुख्य हेतू खांदेरीवर हल्ला करून ते ताब्यात घेणे व त्याच्या साहाय्याने शिवाजी महाराजांच्या मुलखात लुटालूट करणे हा असल्याने त्याने गलबतामधून खांदेरीवर तोफांचा मारा सुरू केला. खांदेरीवरील मराठ्यांनीही त्याला चोख प्रत्युत्तर दिले. त्याचबरोबर सिद्दीने खांदेरीवर हल्ला करण्यासाठी इंग्रजांशीही बोलणे लावले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 १६ नोव्हेंबर इ.स.१७१३ कान्होजी आंग्रे आणि शाहू राजे (पहिले) यांच्यामध्ये १६ नोव्हेंबर १७१३ रोजी तह झाला. सातारकर छत्रपतींची कोकणची जहागीर मोगलांपासून सुरक्षित राखण्याची जबाबदारी छत्रपती पहिले राजाराम यांनी सिधोजी घोरपडे यांचेवर सोपविली होती, परंतु हे जोखमीचे काम घोरपडे पार पाडू शकले नाही आणि पुढे ही जवाबदारी कान्होजींवर आली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १६ नोव्हेंबर इ.स.१८५२ महात्मा फुले यांनी अस्पृश्यांनाही शाळेत प्रवेश देण्यास सुरुवात केले हे लक्षात येताच लहुजींनी महार,मातंग वस्तीमध्ये जाऊन तेथील मुलांना फुलेंच्या शाळेत पाठविण्यासही प्रयत्न सुरु केले. अस्पृश्य समाजासाठी शैक्षणिक कार्य केल्याबद्दल शिक्षण खात्याने १६ नोव्हेंबर १८५२ रोजी फुलेंचा सत्कार केला, त्या समारंभास लहूजी वस्ताद जातीने हजर होते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १६ नोव्हेंबर इ.स.१९१५ गदर पार्टीचे सदस्य आणि लाहोर कटातील क्रांतिकारक विष्णू गणेश पिंगळे यांच्यासह ७ जणांना फाशी देण्यात आले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 || हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.|| #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🙂Positive Thought
Dr Rutuja (Hemangi) @Youth India Hroup
944 जणांनी पाहिले
2 महिन्यांपूर्वी
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 📜 १३ नोव्हेंबर इ.स.१६६७ (मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी, शके १५८१, संवत्सर प्लवंग, वार बुधवार) महाराजांचा डिचोलीस मुक्काम! बारदेशचा सोक्षमोक्ष लावायचाच हा एकमेव विचार करून महाराज डिचोली येथे मुक्कामास राहीले. कारण पोर्तुगीज रामाजी शेणवी कोठारी हा वकील तहाची याचिका घेऊन येणार असल्याचा महाराजांना निरोप आला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १३ नोव्हेंबर इ.स.१६६८ (कार्तिक वद्य पंचमी शके १५९० संवत्सर किलक वार शुक्रवार) गोव्यात श्रीसप्तकोटीश्वराचे देवालय बांधण्यास शुभारंभ. महाराज वेंगुर्ल्यावरून भतग्राम महालातील नारवे या गावी गेले. नारवे येथील श्रीसप्तकोटीश्वराचे देवालय प्राचीन काळापासून विख्यात होते. कोकणच्या ६ प्रमुख दैवतांमध्ये श्रीसप्तकोटीश्वराची गणना होत होती. पंचगंगेच्या तीरावरील श्रीसप्तकोटीश्वर कदंब राजाचे कुळदैवत होते. यावनी काळात या शिवमंदिराची दुर्दशा झाली त्यावेळी, विजयनगरच्या बुक्करायाने त्याचा जीर्णोद्धार केला होता. त्यानंतर पोर्तुगीज अंमलात पुन्हा हे मंदीर ऊद्धवस्त करण्यात आले. श्रीसप्तकोटीश्वराचे शिवलिंग पोर्तुगिजांनी एका विहिरीच्या काठाला बसविलेले होते. त्यावर पाय ठेवून क्रिस्ती लोक पाणी ओढीत! पुढे भतग्रामच्या देसायाने ते गुप्तपणे काढून नेले व नारवे येथे त्याची स्थापना केली. महाराज श्रीसप्तकोटीश्वराच्या दर्शनार्थ गेले आणि या देवालयाचा जीर्णोद्धार करण्याची आंतरिक प्रेरणा त्यांना झाली. लगेच त्यांनी देवालयाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले. *श्रीसप्तकोटीश्वराच्या महाद्वारावर यावेळी खोदलेला शिलालेख अजुनही कायम आहे तो असा:- "श्रीसप्तकोटीश्वर शके १५९०, किलकाब्दे कार्तिक क्रृष्ण पंचम्या सोमे श्रीशिवराज्ञा देवालयस्य प्रारंभ:" यावरून शके १५९०, च्या (कार्तिक वद्य पंचमीला म्हणजे शुक्रवार)* 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १३ नोव्हेंबर इ.स.१६७३ मुंबईकर सूरतकरांना १३ नोव्हेंबर १६७३ ला लिहितात: "सिद्दीने तक्रारी केल्या असताना सुभेदाराचे आमच्याबद्दल इतके मन आहे हे वाचून आनंद झाला. आता बंदरांत असलेल्या बादशहाच्या दोन गलबतांना आम्ही चांगले वागविले हे पाहून बादशाहाविषयी आमचे मनांत पूज्यबुध्दी आहे हे त्याला दिसून येईल ... फ्रेचांनी जर इतक्या तोफा आणि इतके शिसें ( गोळे ) राजापूरला पाठविले असतील, तर छत्रपती शिवाजी महाराजांना सिद्दाविरुध्द चांगले आरमार सज्ज करणस बरे पडेल. कारण त्याने आमच्याकडे मागणी केली परंतु आमच्याजवळ पुष्कळ तोफा असूनही आम्ही तुमच्या सूरतेतील हितसंबंधाकडे लक्ष देऊन तोफा दिल्या नाहीत." सूरतकरांनी १३ नोव्हेंबर १६७४ ला उत्तर लिहिले जे:' "शिवाजीच्या तोफांच्या मागणीबद्दल कळविण्यांत आले. त्यावर आमचे मत असे आहे की, अशा कृत्याने बादशहाला घुस्सा येईल. फ्रेंचानी नुकताच त्यास दारुगोळा पुरविल्याबद्दल दरबाराकडे तक्रारी गेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना बेटावरुन अन्नसामुग्री मिळते याचाच त्यांना संताप येतो. मग त्याला युध्दसामुग्री पुरविली तर त्यांना वैषम्य वाटणारच. बरे मुंबईच्या रक्षणाच्या दृष्टीने मोठ्या तोफा फक्त १३ च आहेत. त्या व पितळी तोफाही तेथे आवश्यक आहेत... छत्रपती शिवाजी महाराजांना आपण धान्य पुरवितो अशी बहादुरखानाने व इतर अधिकाऱ्यांनी तक्रार केली आहे....पितळी तोफांचा समुद्रावर चांगला मारा होतो. त्यांना खर्च मोठा लागत असला तथापि छत्रपती शिवाजी महाराज किंवा दुसरा कोणी त्यांचा मालक होणे आम्हांला लाज आणणारे आहे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १३ नोव्हेंबर इ.स.१६८१ पालीजवळ छत्रपती शंभुराजे व अकबराची भेट! छत्रपती संभाजी महाराज किल्ले पन्हाळ्याहून किल्ले रायगडास सप्टेंबरच्या अखेरीस आले. २ आॅक्टोबरपासून नवरात्र होते. १२, आॅक्टोबरला दसरा-विजयादशमी होती. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज अकबराची भेट घेण्यास मोकळे झाले. नंतर "कार्तिक शुध्द १३ वार रविवार, म्हणजेच १३ नोव्हेंबर इ.स.१६८१ पातशहापुरी (पाली जवळ) छत्रपती संभाजी महाराज व अकबराची भेटी जाहली. अगदी सेनासमुदायाने लष्कर व हशमदेखील समागमे होते. अकबरासमागमे दुर्गादास होता. बहुत सन्मान केला". पाली जवळ छत्रपती संभाजी महाराज व अकबराची भेट झाली 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १३ नोव्हेंबर इ.स.१६९९ राजाराम महाराजांसोबत मराठे सुरतेच्या रोखाने जात असल्याची खबर मोगल सरदारास भेटताच बेदरबख्त, चिन किलीज खान, झुल्फिकारखान, नस्त्रतजंग हे त्यांच्या पाठलागावर दौडत आले व परिंदयाजवळ बेदरबख्ताने यास गाठले. थोडी चकमक होऊन मराठे अहमदनगरच्या दिशेने वळाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १३ नोव्हेंबर इ.स.१७८० महाराजा रणजितसिंग यांचा जन्म ज्यावेळी सारा भारत मुघल फौजांनी आपल्या टाचेखाली चिरडला होता त्यावेळी त्यांचा मुकाबला करून स्वत:चं स्वतंत्र अस्तित्व दाखवण्याची हिम्मत भारतात ज्या हिम्मतवान राजांनी केली त्यात अग्रेसर होते आपल्या महाराष्ट्राचे राजे शिवछत्रपती ज्यांच्या मराठा साम्राज्याची दहशत दिल्लीत औरंगझेबाने देखील घेतलेली होती आणि दुसरे होते पंजाब प्रांतातील शीख साम्राज्याचे संस्थापक महाराजा रणजीतसिंग. महाराजा रणजितसिंग यांचे नाव आज इतिहासात राजा शिवछत्रपतीं इतकेच आदराने घेतले जाते. तरीही त्यांच्या जीवनचरित्राबद्दल किंवा त्यांनी केलेल्या कार्याबद्दल पंजाबएतर लोकांना फारशी माहीत नाही. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀ #🙂Positive Thought #🚩शिवराय #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू
Dr Rutuja (Hemangi) @Youth India Hroup
805 जणांनी पाहिले
2 महिन्यांपूर्वी
१० नोव्हेंबर 🔥 *शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष* ********************************** *१० नोव्हेंबर इ.स.१६५९* किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखान नावाच्या राक्षसाचा कोथळा बाहेर काढून त्यास ठार केले..!! *☼ अफजलखानाचा वध ☼* शालिवाहन शके १५७७ मध्ये पौष महिन्यात शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यास जिंकून त्याचा जावळी प्रांत काबीज केला. शिवाजी महाराज आता एक एक किल्ला जिंकून आपले राज्य वाढवत होते. पुढे शके १५८० च्या अश्विनात राजे कर्नाटकाकडे कूच करत होते. हळू हळू हि वार्ता विजापूरच्या दरबारात कळू लागली. बादशाहने शहाजी राजेना पत्र लिहून शिवाजीला रोखण्यास सांगितले. पण त्याचा काही फारसा उपयोग झाला नाही. तेंव्हा शिवाजी राजांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे विजापूरच्या इभ्रतीस काळिमा होता. आता शिवाजीला रोखलाच पाहिजे यासठी बेगम ने दरबार भरवला आणि आपल्या सर्व सरदारांस आव्हान केले कि कोण रोखेल त्या शिवाजीला " कोणीच तयार होत न्हवते…. तेव्हढ्यात एक सरदार उठला आणि म्हणाला मै लावूंगा शिवाजी को… ! जिंदा या मुर्दा ! सर्व दरबार सुन्न झाला अफलखानाने विडा उचलला आणि तो मोठ्या सैन्यानिशी मराठी स्वराज्यावर चाल करून आला. ☼ विजापूर दरबारात आपल्याला सेनापती अधिकार आणि शिवाजी महाराजांना कैद अथवा मारून टाकण्याचा विडा उचलून अफजल्या वाईकडे यावयास निघाला.- वाईतून मग जावळी प्रांतात आला. ☼ शिवरायांचा या आधीचा पराक्रम आणि कोणी अवलियाने (फकिराने) तुझे अनिष्ठ होयील अस सांगताच खान आधीच खचला होता. आपण माघार घ्यायची नाही व बडी बेगमला दिलेला शब्द पाळायचा असा निर्वाणीचा विचार करून त्याने आपल्या त्रेसष्ठ पत्नींना ठार मारले.(क्यारे नावाच्या फ्रेंच प्रवाशाने त्याच्या ग्रंथात त्रेसष्ठ बायका मारल्याचा उल्लेख केला आहे) ☼ अफजल खानाचा मार्ग - डोण नदीला डावे घालून पंढरपूर - माणकेश्वर - करंकभोस - शंभूमहादेव - मलवडी - रहमतपूर मार्गे वाई (तुळजापूर - पंढरपूर येथे तुळजाभवानी व पांडुरंगाच्या देवस्थानाचा उपद्रव केला) ☼ वाई येथे अफजलखानशी दोन हात करण्यास कठीण जायील खान जावळीस यावा यासाठी शिवाजी महाराजांनी खानाचे वकील कृष्णाजी भास्कर यांच्यावतीने खानास निरोप पाठविला " राजा कचदिल आहे, वाईस येवून भेट घेण्यास भितो" ☼ हाती आला ससा । तो जावू कसा द्यावा" असा विचार करून खान जावळीस यायला तयार झाला (माशाला गळाचे आमिष नीट लागले) ☼ शिवाजी राजांनीही आपले वकील पंताजी गोपीनाथ बोकील यांच्या मार्फत पत्र पाठविले त्यात लिहिले " जैशे शहाजीराजे तैसे तुम्ही, आपण खानाचा भतीजा होय" असा पत्रव्यवहार करून दोघेही एकमेकांना शब्दांचा, पत्रांचा व्यवहार करून खेळवत होते. पण, इकडे शिवाजी महाराज आपली योजना आखत होते तर खान गुर्मीत शिवाजीला कसा ठार मारू याचा विचार करत होता. ☼भेटीचा दिवस निश्चित करण्यासाठी महाराजांकडे वकील आला त्या दिवशी मार्गशीष शुद्ध पंचमी होती "खानाचे वकील राजीयास जावून भेटले. लौकिक बोलणे जे बोलायचे ते बोलले, एकांती मागती सर्व वर्तमान सांगितले कि आपण बोलल्या प्रमाणे खानास घेवून आलो. आता तुमची त्यांची भेटी एकांती खासे खासे यांची करवितो. तुम्ही हरीफी करून कार्यभाग करणे तो करावा. म्हणोन सांगितले, भेटीस एक दिवस आड करून दुसऱ्यादिवशी दिवशी भेटावे असे केले. राजे गडावरून उतरावे, खानाशी गोठांतून पुढे यावे, उभयतांनी दरम्यान देरे देवून खासे खासे भेटावे" खानास वर्तमान सांगितले व खानानेही ते मान्य केले. *{ संदर्भ - कृष्णाजी अनंत सभासद बखर }* ► खलबताच्या वेळी भेटीचा दिवस एक दिवस आड करून ठरविला. त्याचे कारण - १. दुसरे दिवशी चंपाष्टी होती. २. अफजलखान अजूनही वाई प्रांतात होता त्याला जावळीस यायला वेळ मिळावा. शिवाय अफजलखान व शिवाजी महाराज भेट होणार याची खबर इतर सरदारांत, मुलखांत पोहोचावी, व आपल्या मावळ्यानकडून गुप्त तयारी करून घेण्यास वेळ मिळावा. ☼अफजलखान भेटीची शिवरायांनी केलेली तयारी - गडाच्या खाली डोंगराच्या चढणीवर एक उत्तम सदर तयार करणेस शिवाजी महाराजांनी "अंबाजी रंगनाथ मलकरे यांना पाठवले (काही ठिकाणी मळेकर, माळेकर असा उल्लेख आहे) *[संदर्भ - अफजलखानाचा वध . वि. ल. भावे]* सैन्य दूर ठेवले होते ते जवळ आणून सरदारांस ठिकाणे नेमुंन दिली. ढवळे घाटात चंद्रगडावर लोक जमवून ठेवले कारण हि जागा अशी आहे कि येथून आजूबाजूचा परिसर स्पष्ट दिसतो. आणि येथे सैन्य घेवून जाणे खूपच अवघड आहे. अशा प्रकारे इतर उंच उंच ठिकाणी नाकेबंदी केली. आपले सैन्य दिसणार नाही असा झाडी झुडपातून दबा धरून मावळे तयार ठेवले व गडावरून तोफेचा आवाज होताच खानच्या सैन्याची धूळधाण उडवावी असा हुकुम दिला. शिवरायांनी अशी जागा निवडली की सदरेत होणारी मसलत सर्वांना दिसेल, बुरुजावरील तोफ अशी ठेवली कि भेटीचा शामियाना आणि खानाचे सैन्य दोन्ही टप्यात येईल. व सहज दिसतील. अफजल खान शामियाना बघूनच भूलेल अशा शाही थाटात सदर उभारली. डेऱ्यास सोन्याचे चंदाराई कळस लावला (चंदाराई कळस- चंद्रराव मोऱ्यांचा आणलेला) बाजूने मखमली झालर व पडदे लावले. *[संदर्भ - अफजलखानाचा वध . वि. ल. भावे]* तंबूत एक चौथरा बांधला. हा चौथरा ३३ फुट रुंद आणि ४० फुट लाब असा होता. त्याचे कारण असे कि सदरेच्या परिसरात खानाने पुष्कळ लोक आणायचे ठरविले तर अशक्य होते. व दोन्ही बाजूला तुटलेले कडे होते त्यामुळे शिवाजी महाराजांनी जाणीवपूर्वक चौथरा बांधला होता. मुसलमान बैमान आहे…. कदाचित भेटीच्या वेळी दगाफटका करेल याचा अंदाज शिवाजी महाराजांना होता त्यामुळे सावधगिरीचा इशारा देवून शिवाजी महाराजांनी " हैबतराव, बालाजी सिलीमकर, बांदल सरदार यांना सैन्य जर जवळ आणून अफजलखानाच्या संपूर्ण सैन्याला चांगलेच घेरले होते. अफजलखान आता चांगलाच चक्रव्युहात सापडला होता. माघारी फिरणेही आता शक्य न्हवत. शिवाजी महाराजांनी खुद्द प्रतापगडावरही नियोजन पूर्वक बंदोबस्त आखला होता. दर बुरजास ५० मावळे, मागील व पुढील बाजूस १०० मावळे, दरवाजावर तसेच कचेरी नजीक तोफा ठेवल्या, तोफांचा आवाज होताच सर्वांनी हुशार व्हावे असा इशाराच देवून ठेवला. *[ संदर्भ - शिवद्विग्विजय १६५]* भेटीच्या सदरेच्या मागच्या अंगाला एका खोल दरीत, गर्तेत हिरोजी फर्जंद असे विश्वासू ४० माणूस लपविले शके १५८१ मध्ये मार्गशीष शुद्ध सप्तमी दिवशी भेटीचा संकल्प ठरला. सकाळी पूजा अर्चा करून शिवरायांनी सर्व विश्वासू सरदाराना एकत्र बोलविले, आम्हाला काही दगाफटका झाल्यास काशीस जावून उत्तर कार्य करावे, धर्म हस्तके व गोदानें सुद्धा दिधली. स्वताची तयारी करताना दाडी लांब होती ती लहान केली, अंगात चिलखत व जरीची कुडती घातली. डोक्यात बखतर टोप घातला. डाव्या हातात बिचवा लपविला तर अस्तनीत नवटाकी पट्टा घातल, पायात चोळणा घालून कास कसली. अशा मजबुतीने राजे गडाखाली येण्यास तयार झाले. राजे आई जीजावूंचा आशीर्वाद घेण्यासाठी निघाले, सर्व सरदार आजूबाजूला जमले होते. त्यावेळी राजेंनी आपल्या मातोश्रींकडे संभाजी राजेंना हवाली केले. व म्हणाले "काही वावडे झाल्यास घाबरे न होता, गर्दी करून शत्रूस बुडवावे. राज्य रक्षावे." सभोवारच्या सरदारांना म्हणाले … " तुम्ही सर्व शूर पराक्रमी आहात आमची मदार तुमच्यावरच आहे….सर्वांनी आपली शर्त करावी, राज्य वृद्धीस न्यावे ते तुमचेच आहे. मातोश्रींचा आशीर्वाद घेवून राजे निघाले ते खानच्या भेटीला. ☼ *भेटीचा प्रसंग -* अफजलखान प्रचंड सैन्यानिशी येत होता हे दिसताच शिवाजी महाराजांचे वकील पंताजी गोपीनाथ बोकील यांनी खानकडे निरोप पाठविला कि "भेटीसाठी इतके लोक कशाला, राजे आपणाला घाबरतात. इतका जमाव पाहून राजे घाबरून माघारी जातील. व आपली भेट होणार नाही. आपण सोबत एक अंगरक्षक घेवून यावा व बाकीचे लोक परत पाठवावे. खानाला हे पटले व तो पालखीसोबत दोन हुद्देकरी सशत्र, कृष्णाजी पंत, व बरोबर सय्यद बंडा नावाचा पटाईत सरदार होता. खान सदरेजवळ येतोय हे शिवरायांना वरून दिसत होते. खानच्या मनात दगा आहे हे शिवराय जाणून होते त्यांनी तसा सर्वांना सावधगिरीचा इशारा दिला होता. प्रतापगडाच्या पलीकडे नेताजी पालकर व मोरोपंत पिंगळे हे सैन्य घेवून सज्ज होते. तोफेचा आवाज होताच हे खानवर तुटून पडणार होते. *[ संदर्भ - कृष्णाजी अनंत सभासद बखर]* गडाच्या भोवती रानभर मावळे पेरले होते. सदरेच्या बाहेर एक रणशिंग घेवून मावळा उभा केला होता. "भेट घडताना माझे काहीही होवूदे पण तू शिंग वाजवून सैन्यास इशारा दे" अस शिवरायांनी त्याला सूचना केली होती. शिंगवाल्याचा इशारा होताच गडावरील तोफ डागावी व तोफेच्या इशाऱ्याने सैन्याने शत्रूवर तुटून पडावे अशी योजना होती. अफजलखान सदरेजवळ येताच शामियाना पाहून थक्क झाला. खानाने राजांना लवकर भेटावयास असा निरोप पाठवला. राजे गड उतरून आलेच होते. राजेंच्या सोबत विश्वासू जीवा महाला (यांचे उपनाव सकपाळ. जावळी प्रांतात मौजे कोंडवली येथे राहणारे जीवा महाले ) होता. तर खानासोबत त्याचा अंगरक्षक सय्यदबंडा उभा होता. मनासारखे सर्व जुळून आले होते जीवामहाला व संभाजी कावजी राजेंसोबत शामियानाच्या दिशेने निघाले. शिवाजी महाराज शामियाना जवळ येताच त्यांनी सय्यद बंडाला दूर करा. आम्हाला त्याची भीती वाटते खानाने हसत हसत त्याला दूर केला खान मनात खूप खुश होता कि माझ्या अंगरक्षकाला शिवाजी इतका घाबरला तर मला किती घाबरला असेल. खान गुर्मीत शिवाजी राजांकडे पाहत होता. खान म्हणाला हाच का शिवाजी. तेंव्हा राजेंनी हि हा खानच असल्याची खात्री करून घेतली खानाने राजीयांची मुंडी कवटाळून बगलेखाली धरली - *[संदर्भ - सभासद बखर व शिवदिग्विजय]* राजांना थोडे घेरी आल्यासारखे झाले, यावेळी राजेंच्या मनास रामदास स्वामींची आठवण झाली. महाराजांचे मन जरा ठिकाणावर येते न येते इतक्यात खानाच्या कमरेत भली मोठी जमदाड होती. तिचे म्यान टाकून खानाने ती राजीयाच्या कुशीत चालविली. पण राजीयाच्या अंगावर जरीची कुडती होती. त्यावर ती खरखरली अंगास लागली नाही. खानाने दगा केला हे पाहून, मोठ्या हिमतीने सर्व ताकत एकटवून डावे हाती बिचवा होता तो राजांनी खानाच्या हृदयाखाली पोटी मारला. व 'एकांगी करून खानावर तडाख्याचा वार केला. त्या जोरावर एकाच तडाख्यानिशी खानची आतडी बाहेर आली. - *[संदर्भ - हनुमंत स्वामींची बखर व रायगडची बखर ]* खान ओरडला "दगा दगा दगा…। इतक्यात खानाचे कृष्णाजी पंत तिथे आले त्यांनी राजांवर वार केला. परंतु तो कारीगार झाला नाही व लागू पडला नाही. इतक्यात राजांनी दुसऱ्याने पट्याचा वार खानवर केला त्याच बरोबर खानची आतडी बाहेर आली. खान पुरा झाला खाली पडला. कृष्णाजी पंतांनी राजांशी पुन्हा लगट केली पण राजेंनी त्यास दूर होण्यास सांगितले. कृष्णाजी पंत निघून न जात भोयांस आत बोलावले व खानाला पालखीत बसवू लागले. तेवढ्यात संभाजी कावजी व जीवा महाला तिथे होते. संभाजी कावजींनी भोयांचे पाय तोडले व खानाची पालखी अडवली. त्यांनी खानाचे मुंडके कापले. इकडे खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा राजेंवर चाल करून आला. वर्मी घाव मारणार इतक्यात जीवा महालांनी सय्यद बंडाचा हात वरच्यावर कलम केला व राजीयास वाचविले "यावरून एक म्हण प्रसिद्ध झाली "होता जीवा म्हणून वाचला शिवा" *[संदर्भ - अफजलखानाचा वध . वि. ल. भावे]* [ टीप - अफजलखानाचे वकील कृष्णाजी भास्कर शिवाजी महाराज यांच्या हातून मारला गेल्याचा हनुमंत स्वामींची बखर, रायगडची बखर, कृष्णाजी अनंत सभासद बखर, शिवदिग्विजय या समकालीन साहित्यात कोणताच पुरावा नाही ] खान पडला वार्ता सगळीकडे पसरली, रणशिंग वाजताच तोफेचा आवाज झाला. आणि एकच कापाकापी उडाली. मराठ्यांचे सैन्य खानच्या सैन्यावर तुटून पडले तुफान युद्ध झाले. खानाचे सीने जीव तोडून पळत होते. या घनघोर युद्धात शिवरायांचे दोन सरदार शामराज पद्मनामी व त्रिंबक भास्कर कामी आले *[संदर्भ - अफजलखानाचा वध . वि. ल. भावे]* अफजलखानाचा मुलगा फाजलखान कोयना काठाने निसटून जात असता खंडोजी काकडे(खोपडे) या सरदाराचे हाती सापडला. पण खंडोजीने धनाच्या मोहास पडून त्यास सोडून दिले. हि वार्ता राजांस कळताच तात्काळ खंडोजीला पकडून त्याचा शिरच्छेद करण्यात आला. *[संदर्भ - अफजलखानाचा वध . वि. ल. भावे]* प्रतापगड युद्धात महाराजांना हजार बाराशे उंट, चार हजार घोडे, तीन लाखांचे जवाहीर, सात आठ रोकड राज्यांच्या खजिन्यात जमा झाली. कापड हत्यारे लुट मिळाली ती निराळीच. अशी हि अफजलखान वधाची गोष्ट शके १५८१ विकारी नाम संवछरी मार्गशीष सप्तमी गुरवारी घडली. ☼ प्रतापगडाचे युध्द झाल्यावर युद्धात कमी आलेल्या व पराक्रम गाजवलेल्या सर्वांना महाराजांनी बक्षिसे आणि मदत दिली. काही दिवसांनी अफजलखानाचा मदतगार खंडोजी खोपडा पकडला गेला राजांनी त्याचे शीर कलम केले. ☼ थोड्याच दिवसांनी शिवाजी राजेंनी प्रतापगडावर मोठा उत्साह साजरा केला. आई भवानीने आम्हाला यश दिले म्हणून राजेंनी आपली ती कुलस्वामिनी तिचे दर्शन वारंवार घडावे याकरता गंडकी शिळा आणून एक हुशार कारागीर तुळजापूरास पाठवून तेथील देवीच्या ध्यानाप्रमाणे मूर्ती घडवून घेतली. व तिची प्रतापगडावर मंदिर बांधून राजेश्री मोरोपंत पिंगळे यांच्या पत्नीच्या हस्ते प्रतापगडी स्थापना केली *[संदर्भ - अफजलखानाचा वध . वि. ल. भावे]* मराठ्याच्या पोराने पादशाही सरदाराला सबंध गिळून टाकला हि वार्ता वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. सर्वत्र कीर्तिवंत राजा अशी ख्याती झाली. डोंगरातल्या उंदराने विजापूरच्या वाघाला खाउन टाकला म्हणून बेगम खूपच हताश झाली. विजापूरचे सिंहासन डळमळू लागले. बखरकार सांगतात, अफजलखान मारला गेला हि बातमी चौथ्या दिवशी विजापुरास कळली, ती ऐकताच आदिलशहा ताक्तावरून उठून खेद करू लागला… बडी बेगम अल्ला !! अल्ला !! खुदा ! खुदा ! करून रडत अंग पलंगावर पडली. पुढे तिने तीन दिवस पाणीही ग्रहण केले नाही. इकडे जीजाउंना इतका आनंद झाला कि त्यांना तो त्रैलोक्यात मावेना. शिवाजी राजांचा दरारा इतका वाढला कि, चारी दिशांच्या शत्रूंना नीट झोप लागेना. प्रतापगडाच्या पराक्रमानंतर राजांच्या विजयाचा घोडा चौकुर उधळला. आणि यशवंत राजा, कीर्तिवंत राजा म्हणून लोकप्रिय झाला. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 *१० नोव्हेंबर इ.स.१६५९* सुपे, शिरवळ व सासवड परत शिवरायांकडे १० नोव्हेंबर १६५९ ला शिवरायांनी प्रतापगडावर अफजलखानाचा वध केला. त्याच दिवशी शिवरायांच्या मावळ्यांनी सुपे, शिरवळ व सासवड जिंकले. प्रतापगडापासून ह्या ठिकाणांचे अंतर पाहता ही आक्रमणे निर्धारित योजनेनुसार केली गेली होती व ती शिवाजीराजा -अफजलखान भेटीच्या परिणामावर अवलंबून नव्हती. ह्या प्रकरणात शिवरायांनी आदिलशाही सैन्य व विशेषकरुन अफजलखानला ज्या प्रकारे भुलविले ते अभ्यास करण्याजोगे आहे. शिरवळ, सुपे व सासवड परत जिंकून घेणे ही निश्चितच आक्रमक चाल होती. भेटीच्या योजनेच्या सफलतेवर शिवरायांना किती दृढ विश्वास होता हे त्यातून दिसते. जरी अफजलखानला मारता आले नसते तरी ह्या तीन जागा घेतल्याने त्याला एक कणखर संदेश मिळाला असता. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१० नोव्हेंबर इ.स.१६८३* पोर्तुगीजांनी फोंड्याचा वेढा उठवला. ५ दिवस सतत तोफा मारून सुद्धा यश येत नव्हते, विरजई निराश झाला होता, त्याला पादऱ्याांनी सावरले व सांगितले किल्ला पडल्यावाचून राहणार नाही, मराठे अतिशय चिवट पने लढा देत होते, मराठयांना कुमक येत आहे तेव्हा माघार घेणे इष्ट ठरेल असे त्याचे मत पडले, पण पोर्तुगीजांनी त्यांचा सल्ला मानला नाही व तोफेचा मारा चालूच ठेवला, त्याचवेळी एक गोळा किल्ल्यात पडला असता मराठे सैनिक तो पाहण्यासाठी गेले एवढ्यात स्फोट होऊन ७० मराठे ठार झाले. हे होऊनदेखील विरजई किल्ला हातात येत नाही म्हणून थकला होता त्यात पावसाचे थैमान आणि हवामान अतिशय थंड होते, वादळी हवा आणि गारठा इतका होता की पोर्तुगीज सैनिक गारठले होते. विरजई ने माघार घेण्याचा निर्णय घेतला, मराठे खाडीची जागा ताब्यात घेतील व आपली वाट बंद होईल तेव्हा त्वरित माघार घेण्याचे ठरले. १० नोव्हेंबर १६८३ रोजी वेढा उठविला, परत फिरत असताना मराठ्यांनी तोफांवर छापा घातला पण त्या पोर्तुगीजांनी मिळवून दिला नाही आणि वाटेत दारुगोळा नष्ट केला पण तरी किल्लेदाराने ३०० पोती तांदूळ, २०० बैल आणि काही चीजवस्तू पळवल्या. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 जय जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय गडकोट !! हर हर महादेव !! 🙏🏻🙏🏻🚩मराठा🚩🙏🏻🙏🏻 ------------------------------------------------- #🙂Positive Thought #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय
Dr Rutuja (Hemangi) @Youth India Hroup
2.1K जणांनी पाहिले
2 महिन्यांपूर्वी
*आजचे ऐतिहासिक शिवकालीन दिनविशेष.* **************************** 📜 ९ नोव्हेंबर इ.स.१६५९ (मार्गशीर्ष शुद्ध पंचमी शके १५८१ संवत्सर विकारी वार बुधवार) महाराजांचे सहकाऱ्यांना कामाचे वाटप! सर्व सहकाऱ्यांना कामाचे वाटप करुन इशारात कोडवर्ड दिले. काय करायचे ह्या सुचना दिल्या. महाराजांनी आपल्या जवळच्या सर्व सवंगड्यांना या युध्दाचे महत्त्व पुन्हा पटवुन दिले. कोणत्याही परिस्थितीत संयम ढळू न देता. अफझलखानच्या सेनेचा पुर्ण पराभव करा असा आदेश दिला. आम्ही राहु अथवा न राहू परंतु स्वराज्य राहीले पाहिजे हे सवंगड्यांना पटवुन दिले. आणि सर्व निरवानिरव करुन टोकाटाक सर्वांना किल्ले प्रतापगडाच्या परिसराचा संपूर्ण ताबा तोही गुपचूप व अफजल सैन्याला कळु न देता घेण्याचे आदेश महाराजांनी दिले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ९ नोव्हेंबर इ.स.१६७५ शिवरायांनी सातारा हा प्रांत जिंकला. १३५८ ते १३७५ हा बहामनी बादशाहीचा वैभवाचा काळ अजिंक्यताऱ्याचा जन्म याच काळातला. विजापूरकरांनी नंतर तो आपल्या ताब्यात घेतला व त्याची जोपासनाही मोठ्या ईर्षेने केली. शहाजीराजे जेव्हा विजापूरकरांसोबत होते तेव्हा त्यांना देशमुखी मिळाली ती कऱ्हाड प्रांताची. अजिंक्यताऱ्याचा अधिक उपयोग विजापूरकर करीत होते ते तुरुंग म्हणून. या तुरुंगात असलेले मुधोजी व बजाजी निंबाळकर पळाले ते शहाजीराजांच्या मदतीनेच. त्यांनी फलटणची जहागिरी मिळविली. शहाजींचे ऋण बजाजी निंबाळकराने नाते जोडूनच फेडले. त्यांची बहीण सईबाई शिवाजीराजांची पत्नी झाली. फलटणची कन्या पत्नी झाली तरी १६७५पर्यंत शिवछत्रपतींकडे सातारचा किल्ला आला नव्हता. मे १६७३ मध्ये शिवरायांनी परळीचा किल्ला घेतला, परंतु सातारा किल्ला हस्तगत व्हावयास नोव्हेंबर उजाडला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ९ नोव्हेंबर इ.स.१६८२ औरंगजेबाचा अधिकारी अबु मुहम्मद याने दक्षिणेच्या भुगोलाची (सह्याद्रीची) माहिती औरंगजेबास दिली, त्याची नोंद! औरंगजेबाचे सैन्य चौफेर मराठ्यांचा बंदोबस्त करीत होते.मराठे औरंगजेबाच्या ठाण्यावर आणि आसपासचे भागातून चौथ वसूल करीत होते. विशेषतः ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर इ.स. १६८२ मध्ये हे हल्ले होत होते असे दिसते. नाशिक, बागलाण, अहमदनगर, पेडगाव, सोलापूर, सातारा, पुरंदर (पुणे-चाकण), शिरवळ या भागात चकमकी चालू होत्या. परकीय प्रदेशात लढाई करणे म्हणजे त्यास भुगोलाचे ज्ञान असणे जरुर असते. बादशाही सैन्यात दक्षिणेचा भुगोल नद्या, डोंगर, दऱ्या, रस्ते, घाट इत्यादी) माहीती असणारा अबु मुहम्मद नावाच्या अधिकाऱ्यास मराठांच्या मुलखातील घोडखिंडीची माहीती करुन घेण्याबद्दल सांगण्यात आल्यावर त्याने मराठ्यांच्या प्रदेशात जाण्यास ३६० घाट व खिंडी आहेत व ६५ घाट असे आहेत की जिथुन हत्ती उंट वैगरे जाऊ शकतात व बाकी खिंडीमधील वाटा अरुंद असल्याची माहिती औरंगजेब बादशहाकडे दिली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ९ नोव्हेंबर इ.स.१६८३ याच दिवशी फोंड्याच्या मदतीस आलेल्या संभाजी महाराजांनी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत म्हणजे जवळपास दोन महिने पोर्तुगीजांची अवस्था फार दयनीय करून टाकली होती. संभाजी महाराजांच्या धास्तीने शेवटी सेंट झेवियरच्या मृत शरीरास शरण जाऊन पोर्तुगीजांनी प्रार्थना केली. तरीही पोर्तुगीजांना शेवटची आशा होती ती मोघल राजपूत्र शहा आलम याच्या सैन्याच्या कोकणातील आगमनाची. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ९ नोव्हेंबर इ.स.१७२८ गोदावरी ओलांडून चिमाजीअप्पा बागलाण खानदेशमार्गे माळव्याकडे निघाले. त्यांच्याकडे अंदाजे २२००० फौज होती. उदाजी पवार, राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर, बाजी भिवराव रेठरेकर, अंताजी माणकेश्वर, गणपतराव मेहेंदळे असे ताज्या दमाचे शिपाईगडी होते. हे सर्वजण थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या तालमीतले. त्यामुळे विद्युत वेगाने हालचाली करणे त्यांच्या नसानसात भिनलेले होते. रोज ३०/३० कोसांचे मोठे मोठे पल्ले ओलांडत मजल दरमजल करीत मराठी फौजा बुन्हाणपूरनजीक आल्या. हे कळताच नंदलालने त्याची माणसे भेटीसाठी पाठविली. त्यांच्या मदतीने मराठी फौजांनी धर्मपुरी, महेश्वर, अकबरपुरा या दरम्यान नर्मदा ओलांडली आणि ते माळव्यात शिरले. होळकरांच्या चरित्रात उल्लेख आढळतो की हा नंदलाल, मराठ्यांनी नर्मदा ओलांडल्यानंतर २०० स्वारानिशी मल्हारराव होळकरांना येऊन भेटला. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 ९ नोव्हेंबर इ.स.१७३९ शाहु महाराजांचे संभाजीराजेंना (कोल्हापूर) पत्र बाजीराव पेशव्याने पोर्तुगीजांशी युद्ध करीत असताना संभाजीराजांच्या मुलूखात धुमाकूळ घालून कारण नसताना संभाजीराजेंची काही ठाणी ताब्यात घेतली. तेव्हा प्रचंड नाराज होऊन राजेंनी शाहू महाराजांकडे त्यांच्या पेशव्याच्या कृत्याचा खुलासा मागितला. यावर दि. ९ नोव्हेंबर १७३९ रोजी महाराजांनी लिहून पाठविले की, " तुम्ही संदेह मानू नये. तुमची आमची भेट व्हावी. तुम्हापेक्षा आम्हास काय थोर आहे ? " महाराजांनी संभाजीराजेंना भेटीला बोलाविले आहे हे समजताच आपल्या हातचा प्रदेश जाणार असे वाटून तो प्रदेश आपल्या चिरंजीवाचे नावे करुन द्यावा अशी बाजीरावाने महाराजांकडे मागणी केली. पण बाजीरावाची मागणी धुडकावून संभाजीराजेंना भेटीस बोलावून बाजीराव पेशव्याने घेतलेली राजेंची सर्व ठाणी शाहू महाराजांनी राजेंना परत केली. "तुम्हापेक्षा आम्हास काय थोर आहे ?" अशी वाक्ये केवळ पत्रात लिहिण्यापुरती नव्हे तर महाराज मनापासून तसे मानित होते, हे यामधून सिद्ध होते. आपल्या आईचे संस्कार व रक्ताची नाती महाराज आयुष्यभर विसरले नाहीत. शिवरायांच्या स्वराज्याची जबाबदारी शाहू महाराजांनी समर्थपणे पेललीच पण त्याचबरोबर आपल्या धाकट्या बंधूप्रती असणारी थोरल्या भावाची जबाबदारी पार पाडण्यातही महाराज कुठेच कमी पडले नाहीत. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 || हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.|| *‼️वारसा हिंदवी स्वराज्याचा‼️* *‼️वसा गडकोट संवर्धनाचा*‼️ #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙂Positive Thought
See other profiles for amazing content