*🌺गुरुतत्व सेवा साधना आनंदकुटी अध्यात्मिक प्रचार प्रसार व धार्मिक धर्मादाय सामाजिक सेवाकार्य (मु.बोरिवली,नेरळ ता.कर्जत जि.रायगड🌺*
*🌺श्रीगुरुचरित्र विशेष गुरुतत्वाचार १,२.१.२०२६ 🌺*
*🌺🌿|| ॐ श्री सद्गुरू समर्थ दत्तानंद पाहिमाम् ॐ श्री सद्गुरू समर्थ दत्तानंद रक्षमाम् ||🌿🌺*
*_ॐ नमोजी विघ्नहरा । गजानना गिरिजाकुमारा ।_*
*_जय जय लंबोदरा । एकदंता शूर्पकर्णा ॥१॥_*
*_(श्री गुरूचरित्र अध्याय : १)_*
*▫️ गुरुतत्वसेवक यांची सहज मार्गदर्शन सत्संग सेवा श्रवण करण्यासाठी आपल्या गुरुतत्व यूट्यूब चॅनलची लिंक▫️*
*https://youtube.com/@GurutattvaEkMargdarshak?si=5vO2OzV5Fe0hB3D0
#🎼पारायण-किर्तन सोहळा🚩 #🌸राधा कृष्ण भजन 🎵 #🙏आई एकविरा 🙏 #🙏भक्तीमय सकाळ🎬 #👣गजानन महाराज🌺 *
*जय गुरुदेव.....*
*श्री गणेशाय नमः; ।। श्री गजाननाला नमस्कार करतो , तू सर्व गणाचा अधिपती आहेस आणि सर्व दिशांचा नायक आहेस, तुझ्या आशिर्वादाशिवाय कुठलेही कार्य प्रारंभ होऊ शकत नाही.आणि पूर्णत्वास जाऊ शकत नाही.तू चौदा विद्या व चौसष्ट कलांचा स्वामी आहेस. तुझे महात्म्य फार थोर आहे म्हणून प्रथम तुला नमस्कार करुन प्रार्थना करतो की श्री गुरुचरित्रामधील गुरूंची जी महती ओव्यामध्ये सांगितली आहे ती सोप्या भाषेत लिहिण्याचा संकल्प सोडला आहे तो पूर्णत्वास जावा.यासाठी तुझा आशिर्वाद असावा.*
*श्री गुरुचरित्र श्री नृसिंह सरस्वती महाराज यांचे शिष्य श्री सायंदेव साखरे यांचे पुत्र नागनाथ ,त्यांचे पुत्र देवराय व त्यांचे पुत्र गंगाधर आणि त्यांचे पुत्र सरस्वती गंगाधर असे नाम धारण करून हे गुरुचरित्राचे लिखाण श्री नृसिंह सरस्वती यांच्या आज्ञेने कडगंजी येथे केले.श्री सरस्वती गंगाधर यांनी नामधारक असा एक साधक आणि नृसिंह सरस्वती यांचे शिष्य सिद्धमुनि यांच्यातील संवाद रूपाने या ग्रंथाचे लिखाण केले आहे.*
*श्री नृसिंह सरस्वती (इ.स. १३७८-१४५९) हे कलियुगातील प्रथम अवतार श्रीपाद वल्लभ यांच्यानंतरचे दत्तात्रेयांचे दुसरे पूर्णावतार आहेत.*
*वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड) या* *गावी श्री नृसिंह सरस्वती यांचा जन्म इ. स. १३७८ पौष शुद्ध* *द्वितीयेला ,अंबाभवानी आणि माधव यांच्या पोटी झाला. त्यांचे मूळ नाव शालीग्राम देवमाधव काळे. परंतु त्यांना नरहरी नावानेच ओळखले जाई.वयाच्या आठव्या वर्षी माता-पित्यांचा आशिर्वाद घेऊन ते बद्रीकेदारला गेले. वाटेत काशी मुक्कामी त्यांची गाठ कृष्णसरस्वती या वृद्ध संन्याशाशी पडली. कृष्णसरस्वतींनी नरहरीला मठपरंपरेप्रमाणे संन्यास दिक्षा दिली. उत्तरेत शिक्षण पूर्ण केल्यावर नृसिंह सरस्वती दक्षिणेस प्रथम कारंजा येथे आले.* *माता-पित्यांना भेटले. त्यानंतर ते त्र्यंबकेश्वर, नाशिक, परळी वैजनाथ, औदुंबर, अमरापूर या गावी राहिले. अमरापूर हे गाव कृष्णा-पंचगंगा संगमावर आहे. तेथे इ.स. १३८८ ते १४२१ या काळात तीर्थयात्रेवर गेले. चातुर्मासात औदुंबर येथे. इ. स. १४२२ ते १४३४ या काळात नरसोबावाडीत व इ. स. १४३५ ते १४५८ या काळात गाणगापूर येथे राहिले.इ. स. १४५९ माघ कृष्ण प्रतिपदा दिवशी निजानंदनाला गेले.*
*नृसिंह सरस्वतींनी श्रीपाद वल्लभांचेच कार्य पुढे चालवले आणि दत्तभक्तीचा विस्तार केला. त्यांना दीर्घायुष्य लाभले. संपूर्ण भारतामध्ये त्यांनी संचार केला. त्यांच्याभोवती मोठा शिष्यवर्ग तयार झाला. त्यांचे प्रमुख सात शिष्य होते. माधवसरस्वती, कृष्ण सरस्वती, बाळकृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती आणि सिद्ध सरस्वती. या सर्वांनी दत्त परंपरेचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार केला. नृसिंह सरस्वतींनी जिथे जिथे तपश्चर्या केली ती ठिकाणे औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर ही आहेत.*
*🌺 गुरुतत्वसेवक 🌺*
*🌺गुरुतत्व सेवा साधना आनंदकुटी अध्यात्मिक प्रचार प्रसार व धार्मिक धर्मादाय सामाजिक सेवाकार्य (मु.बोरिवली,नेरळ ता.कर्जत जि.रायगड🌺*
*🌺श्रीगुरुचरित्र विशेष गुरुतत्वाचार ०२.०१.२०२६ 🌺*
*🌺🌿|| ॐ श्री सद्गुरू समर्थ दत्तानंद पाहिमाम् ॐ श्री सद्गुरू समर्थ दत्तानंद रक्षमाम् ||🌿🌺*
*चरित्र ऐसे गुरूंचे । वर्णू न शके मी वाचे ।*
*'आज्ञापन' असे श्री गुरूंचे । म्हणुनी वाचे बोलतसे ।।*
*( गुरुचरित्र अध्याय १- ओवी:५६)*
*जय गुरुदेव.....*
*गुरूंचे चरित्र मी काही सांगूच शकत नाही कारण त्यांच्याबद्दल सांगायला ना माझ्याकडे ज्ञान, ना बुद्धी , ना शब्दांचा संग्रह ना अलंकार,तरी मी प्रयत्न करीत आहे कारण ही गुरूंची आज्ञा आहे की त्यांच्या चरित्रा बद्दल बोलाव त्यांची आज्ञा असल्यामुळे तेच शब्द , ज्ञान व बुद्धी देणारे आहेत. म्हणून मी या मुखाने श्री गुरूंचे चरित्र आपणास सांगत आहे. असे गुरुचरित्रकार सांगत आहेत.*
*गुरु ही व्यक्ती नाही तर गुरु हे एक तत्त्व आहे.जे कायम राहणार आहे.कारण हे ब्रम्हांडच गुरुतत्त्वातून निर्माण झाले आहे. निर्गुण स्वरूपाच्या गुरुतत्त्वाने स्वतःतूनच उत्पत्ती , स्थिती आणि लय करण्यासाठी ब्रम्हा,विष्णू,आणि महेश यांची निर्मिती केली त्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्याकडून इतर देवतांची निर्मिती करून त्यांना मार्गदर्शन करण्यास सांगितले . अशाप्रकारे या ब्रम्हांडातील सर्व कार्य सुरु आहे. प्रत्येक देवता त्यांना केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे सेवा करीत आहेत म्हणूनच गुरूंचे स्वरूप हे सतत बदलत राहणार आहे पण तत्त्व मात्र कायम आहे. तेच तत्व वेगवेगळ्या स्वरूपात येऊन साधकांना, भक्तांना. प्रपंच्यातून परमार्थ कसा होईल. म्हणजेच आत्मा हा परमात्म्यात विलीन कसा होईल याचे मार्गदर्शन करीत असतात.म्हणूनच गुरूंना " गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर:I गुरुरेक: परब्रम्ह तस्माद गुरुमुपाश्रयेत I गुरु हा त्रिगुणात्मक आहे आणि तोच त्रिदेव आणि गुरुतत्त्व आहे.*
*व्यवहारातील साधी गोष्ट करण्यासाठी सुद्धा आपल्याला कोणाचे तरी मार्गदर्शन लागत तेव्हा आपण ते करू शकतो मग आनंद ही अवस्था प्राप्त करण्यासाठी ज्याने हा आनंद प्राप्त केला आहे. त्याचे मार्गदर्शन लागेलच.आनंदाची वाट त्यांना माहित आहे. त्यांनी दाखविलेल्या वाटेने जर आपण मार्गक्रमण केले तर नक्कीच आज ना उद्या कधीतरी आपल्याला आनंद अवस्था ही प्राप्त होऊ शकते.*
*ही आनंदाची वाट म्हटली तर फार सोपी आहे नाहीतर फारच कठीण आहे. या वाटेवरच्या वाटाड्या वर पुर्नविश्वास श्रद्धा ठेवून कुठल्याही प्रकारचा विकल्प, संशय मनामध्ये न आणता त्यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे शिकत गेलो आणि कृतीमध्ये आणत गेलो तर जीवनात नक्कीच आनंद मिळेल.ज्यांनी ज्यांनी हि आनंद अवस्था प्राप्त केली आहे ते याच मार्गाने आणि गुरूंच्या मार्गदर्शनाने गेले आहेत.*
*🌺 गुरुतत्वसेवक 🌺*
*▫️आपली प्रापंचिक आणि परमार्थिक उन्नती करण्यासाठी गुरुतत्व सेवाकार्यात आजच सहभागी व्हा▫️*
*🌼 पत्ताः-गुरुतत्व सेवा साधना आनंदकुटी विश्वात्मक विश्वशांती विश्वप्रेम विश्वसेवा साधनामार्ग बेल्लेझा साईट प्लॉट न. ०१ , अंजप फाटा, मु.बोरीवली गाव नेरळ ता .कर्जत जि.रायगड ४१०१०१*
*▫️गुरुतत्व सेवा साधना आनंदकुटी आध्यात्मिक प्रचार प्रसार धार्मिक धर्मादाय व सामाजिक सेवाकार्य नेरळ▫️*
🌹 *गुरुतत्वसेवक* 🌹
*अधिक माहितीसाठी संपर्क ;-*
*श्री सतीश सावंत (डोंबिवली)*
*09594146761*
*7977467990*
*श्री कारभारी चव्हाण (ठाणे)*
*9320178006*
*श्री विकास पांचाळ (ठाणे)*
*09029103259*
*श्री दत्तात्रेय पेडणेकर*
*9702222261*
*श्री ओंकार कामत (डोंबिवली)*
*9653306772*
*श्री अमित शेलार (बदलापूर)*
*08433618735*
*श्री निलेश पाचपुते (घाटकोपर मुंबई)*
*09967172418*
*श्री सिद्धांत तिखे (पुणे)*
*09967465889*
*श्री मिलिंद मोरे (जोगेश्वरी मुंबई)*
*09869275841*
*श्री संतोष सावंत (शहापूर)*
*07030875533*
*सावित्री धुरी (कांदिवली मुंबई)*
*09221281642*
*गुरुतत्व "एक मार्गदर्शक"*