फॉलो करा
राहुल बोराडे
@52312286
1,004
पोस्ट
2,338
फॉलोअर्स
राहुल बोराडे
586 जणांनी पाहिले
4 दिवसांपूर्वी
१८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात ज्या धैर्याने राणी लक्ष्मीबाई यांनी ब्रिटिश सत्तेला आव्हान दिले, तो भारतीय इतिहासातील सुवर्णक्षण आहे. स्वाभिमान, दूरदृष्टी, नेतृत्व आणि स्त्रीशक्तीचा अतुलनीय परिचय त्यांची जयंती म्हणजे शौर्याचा उत्सव. या रणरागिणीला विनम्र अभिवादन! #महान वीरांगना झाशीची राणी लक्ष्मीबाई जयंती💐
राहुल बोराडे
821 जणांनी पाहिले
8 दिवसांपूर्वी
बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आणि स्वाभिमानासाठी अखंड लढा दिला. न्याय, शोषण आणि विषमतेविरुद्ध आंदोलन छेडून आदिवासी समाजात जागृती व परिवर्तनाची ज्योत पेटवणाऱ्या थोर क्रांतिकारक जननायक बिरसा मुंडा यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन! #आदिवासी समाजाचे जननायक बिरसा मुंडा जयंती💐
राहुल बोराडे
540 जणांनी पाहिले
8 दिवसांपूर्वी
*आचार्य विनोबा भावे स्मृतिदिन !* 🙏🏻 भूदान चळवळीचे प्रवर्तक थोर समाजसुधारक आचार्य विनोबा भावे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !🙏🏻 #आचार्य विनोबा भावे स्मृतिदिन💐
राहुल बोराडे
634 जणांनी पाहिले
9 दिवसांपूर्वी
बालदिन (पंडित जवाहरलाल नेहरू जयंती) आपल्या भारत देशाचे पहिले पंतप्रधान_पंडित_जवाहरलाल_नेहरू यांचा आज जन्म दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. पंडित जवाहरलाल नेहरू यांना मुलांविषयी असलेल्या प्रेम आणि जिव्हाळ्याविषयी आदर व्यक्त करण्यासाठी १४ नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो. पंडित जवाहरलाल नेहरु जयंती तसेच बालदिनानिमित्त सर्वाना हार्दीक शुभेच्छा.!! #पंडित जवाहरलाल नेहरू जयंती बालदिन शुभेच्छा💐
राहुल बोराडे
604 जणांनी पाहिले
21 दिवसांपूर्वी
अंगणात तुळस आणि शिखरावर कळस हिच आहे महाराष्ट्राची खरी ओळख कपाळी कुंकू आणि डोक्यावर पदर हिच आहे सौभाग्याची ओळख माणसात जपतो माणुसकी आणि नात्यात जपतो नाती हीच सणांची ओळख..!! तुळशी विवाह निमित्त सर्वाना मंगलमय शुभेच्छा..!! #तुळशी विवाह शुभेच्छा
राहुल बोराडे
603 जणांनी पाहिले
23 दिवसांपूर्वी
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्योत्तर काळात देशाला एकसंध करण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिलेले योगदान देशासाठी अमूल्य आहे. देशाची राष्ट्रीय एकता टिकवण्यासाठी खंबीरपणे उभे राहिलेले भारताचे पहिले गृहमंत्री भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन! #भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल जयंती💐
राहुल बोराडे
2.6K जणांनी पाहिले
29 दिवसांपूर्वी
!! दिपोत्सवात दादा तुम्ही गेला सोडुनी आणि वाटले दुपारी अस्तास सुर्य गेला !! Bakti is a social Force भक्तीतून सामाजिक शक्ती उभी करणारे लाखो लोकांना जिवनदृष्टि देणारे स्वाध्याय परिवाराचे प्रर्वतक पद्मविभूषण परम पुजनीय पांडुरंग शास्त्री आठवले स्वाध्याय परिवाराचे पुजनीय दादाजी ८४ व्या वर्षी २५आॅक्टोंबर २००३ रोजी ब्रम्हनिर्वाहन लीन झाले. ज्यांनी जगभरातील १०४ हुन अधिक देशात श्रीमद्भगवद्गीतेचे तत्वज्ञान पोहोचवले... ६० लाखाहून अधिक लोकांना आपल्या सोबत जोडले... मच्छिमार, कोळी, आदिवासी, वनवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणले.. IT मधल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यापासून ते अगदी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत ज्यांनी ' माणुसकी ' पोहोचवली.. रेमन मॅगसेसे, 'टेम्पल्टन' असे मानाचे पुरस्कार देऊन ज्यांच्या कार्याची दखल संपूर्ण जगाने घेतली... असे थोर तत्वचिंतक... अध्यात्मिक मार्गदर्शक.. तत्वज्ञान विद्यापीठाचे संस्थापक आणि जगातील नामवंत अशा "स्वाध्याय परिवार" चे प्रणेते.. पद्मविभूषण... परम पूजनीय.पांडुरंगशास्त्री आठवले यांचा आज महानिर्वाण दिन त्या निमित्ताने त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र.....! !! जय योगेश्वर !! #स्वाध्याय परिवाराचे प्रर्वतक परम पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले महानिर्वाण दिन💐
राहुल बोराडे
743 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
सत्यशोधक समाज स्थापना दिन क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून समाजातील अंधश्रद्धा, अन्याय आणि विषमता याविरुद्ध लढ्याचा पाया रचला. आज त्यांच्या कार्याला वंदन करून सत्यशोधक समाज स्थापना दिनानिमित्त क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या कार्याला विनम्र अभिवादन! #सत्यशोधकसमाज #ज्योतिबाफुले #सत्यशोधक समाज स्थापना दिन💐
See other profiles for amazing content