⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 ११ नोव्हेंबर इ.स.१६५९ महाराज वाई येथे आले. महाराज अफझल खान वधाच्या दुसऱ्या दिवशी वाई येथे आले. नेताजी पालकरही वाईला महाराजांच्या फौजेत सामील झाले. वाईहुन महाराजांनी आक्रमक पवित्रा घेऊन खानाच्या पराभवामुळे मनोधैर्य खच्ची झालेल्या विजापुरी भागावर धडक मारली व थेट पन्हाळ्यापर्यंतचा भाग आपल्या अंमलाखाली आणण्याचे ठरवले. त्याचप्रमाणे प्रथम चंदन वंदन हे दोन गड काबीज झाले. याच सुमारास शिरवळ, सुपे, सासवड, पुणे या भागावर खानाने रवाना केलेले पांढरे कराटे जाधवराव हे आदिलशाही सरदार सिद्दी हिलालच्या मार्फत महाराजांना शरण आले. खानाचा अपेक्षित पराभव झाल्याने ते गर्भगळीत झालेले होते. या सर्वांनी महाराजांची चाकरी पत्करली. या सर्वासह महाराजांनी तुफानी घोडेदौड सुरू केली. व पाहता पाहता खटाव, मायनी, रामपुर, कोलढोण, वाळवे, हलजयंतिका, अष्टी, अष्टे, वडगाव, बेलापूर, औदुंबर, मसुर, कराड, सुपे, तांबे, पाली, नेरले, कामेरी, विसापुर, साबे, उरण, काळे आणि कोल्हापूर ही गावे महाराजांच्या ताब्यात आली. ११ नोव्हेंबर इ.स.१६७९ मराठ्यांनी खांदेरी येथील इंग्रजांविरूद्धचे युद्ध जिंकले. डोव्ह नावाचे इंग्रजी गलबत आणि अनेक देशीविदेशी कैदी म्हणून ताब्यात. इंग्रजांना मराठ्यांच्या सागरी आरमाराचे सामर्थ्य पटले आणि पुढे २४ नोव्हेंबरला त्यांनी मराठ्यांशी तह केला.
#🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती