फॉलो करा
ASHOK HASE...
@ashok_hase
8,729
पोस्ट
13,950
फॉलोअर्स
ASHOK HASE...
1.1K जणांनी पाहिले
13 तासांपूर्वी
साहा आयनीकरण समीकरण विकसित करणारे रॉयल सोसायटीचे फेलो (FRS) भारतीय खगोल भौतिकशास्त्रज्ञ व खासदार मेघनाद साहा... (६ ऑक्टोबर १८९३ – १६ फेब्रुवारी १९५६) विनम्र अभिवादन... 💐🙏 ⛔ २३ डिसेंबर १९९३ रोजी भारतीय टपाल विभागाने हे स्मारक टपाल तिकिट मेघनाद साहा यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या अनुषंगाने जारी केलं... #📢6 ऑक्टोबर अपडेट्स🔴 #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #दिनविशेष... ✍
ASHOK HASE...
561 जणांनी पाहिले
1 दिवसांपूर्वी
शिकवता शिकवता आपणास आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य देणारे आदराचे स्थान म्हणजे आपले शिक्षक. आपल्या आयुष्याच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा असतो. आई-वडिलांनंतर शिक्षक हेच आपले दुसरे गुरु असतात. जीवनात शिक्षणाचं किती महत्व आहे हे जगभरातील महापुरुषांनी दाखवून दिलं आहे. शिक्षक हे समाजाचे निर्माणकर्ता असून शिक्षकांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी ५ ऑक्टोबर या दिवशी जागतिक शिक्षक दिवस जगभरात साजरा केला जातो. जगाला ज्ञानाचं अमृत पाजणाऱ्या सर्व शिक्षकांना जागतिक शिक्षक दिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा... 🌹🙏 #जागतिक_शिक्षक_दिवस #जागतिक_शिक्षक_दिन #हार्दिक #शुभेच्छा #worldteachersday #Hardik #Shubhechha #📅जागतिक शिक्षक दिन🧑‍🏫 #📢5 ऑक्टोबर अपडेट्स🔴 #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #दिनविशेष... ✍ #अशोक हासे ग्राफिक आर्ट
ASHOK HASE...
934 जणांनी पाहिले
2 दिवसांपूर्वी
आपल्याला लहानपणापासूनच 'मुक्या प्राण्यांवर प्रेम करा' ही शिकवणी दिली जाते. अनेक साधू-संतांनीही आपल्या वाणीतून भूतदयेविषयी जनजागृती केली आहे. 'सर्व सृष्टीवर प्रेम करा’ हे भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारे सांगितले आहे. परंतु गेल्या काही दशकांत आपण त्यापासून दूर जाऊ लागलो आहोत आणि हे पूर्णपणे चुकीचे आहे. फक्त आपल्याकडेच नाही; तर जगात अनेक ठिकाणी सर्व प्रकारच्या प्राणीमात्रांना क्रूरपणे वागवले जाते किंवा त्यांच्याकडे दुर्लक्षच केले जाते. वास्तविक माणूस आणि इतर प्राण्यांची मैत्री जुनीच आहे, परंतु हे संबध आता अनेक कारणांनी ताणले जाऊ लागले आहेत. प्राण्यांचेही पर्यावरणासोबतच संरक्षण व्हावे यासाठी १९३१ मध्ये इटली देशातील फ्लाॅरेन्स शहरात एक पर्यावरण परिषद भरवण्यात आली होती. या परिषदेत लोकांमध्ये प्राण्यांविषयी संवेदनशीलता आणि आपुलकीची भावना निर्माण करण्यासाठी जनजागृती व्हावी यासाठी ४ ऑक्टोबर हा दिवस 'जागतिक प्राणी दिवस' म्हणून पाळला जावा, असे ठरवण्यात आले. जागतिक प्राणी दिनानिमित्त सर्व प्राणीप्रेमी व प्राणीमित्र संघटना यांना मनःपूर्वक शुभेच्छा... 🌹🙏 #जागतिक_प्राणी_दिवस #हार्दिक #शुभेच्छा #WorldAnimalDay #Hardik #Shubhechha #📢4 ऑक्टोबर अपडेट्स🔴 #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #दिनविशेष... ✍ #अशोक हासे ग्राफिक आर्ट
ASHOK HASE...
682 जणांनी पाहिले
3 दिवसांपूर्वी
मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अध्वर्यू स्वामी रामानंद तीर्थ यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन... 💐🙏 स्वामी रामानंद तीर्थ यांनी आपल्या कणखर नेतृत्वाने मराठवाडा मुक्ती संग्रामाला दिशा दिली. मराठवाड्यासह हैदराबादच्याही मुक्ती संग्रामात त्यांनी मोठी कामगिरी केली. हैदराबाद संस्थानातील जनतेत स्वातंत्र्याची संकल्पना रुजविण्यात आणि ती प्रत्यक्षात आणण्यात त्यांचा फार मोठा वाटा होता. संयुक्त महाराष्ट्राचा लढा, भूदान चळवळ यातील त्यांचे योगदान व त्यांच्या दिशादर्शक नेतृत्वाचा वारसा देशाला कायम प्रेरणा देत राहील. #स्वामी_रामानंद_तीर्थ #जयंती #विनम्र #अभिवादन #SwamiRamanandTirth #Jayanti #Vinamra #Abhiwadan #📢3 ऑक्टोबर अपडेट्स🔴 ##जयंती /श्रध्दांजली /स्मृतीदिन/ पुण्यतिथी /बर्थडे #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #दिनविशेष... ✍ #अशोक हासे ग्राफिक आर्ट
ASHOK HASE...
627 जणांनी पाहिले
4 दिवसांपूर्वी
विजयादशमी, दसरा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा... ☘️🌹🙏 हा दसरा तुम्हाला आनंदाचा, भरभराटीचा, वैभवाचा, आरोग्याचा आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना... 🙏 #विजयादशमी #दसरा #हार्दिक #शुभेच्छा #Vijayadashami #Dasara #dashehra #Hardik #Shubhechha #🤗दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा🌷 #📢2 ऑक्टोबर अपडेट्स🔴 #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #दिनविशेष... ✍ #अशोक हासे ग्राफिक आर्ट
ASHOK HASE...
712 जणांनी पाहिले
5 दिवसांपूर्वी
थोर साहित्यिक व आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन... 💐🙏 गदिमा म्हणजे विलक्षण काव्यप्रतिभा लाभलेले अजोड व्यक्तिमत्त्व. आधुनिक काळतील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक गदिमा यांनी गद्य व पद्य दोन्ही क्षेत्रांत अभूतपूर्व कामगिरी केली आहे. साक्षात सरस्वतीच्या वरदहस्तामुळे मिळालेल्या असामान्य प्रतिभेच्या बळावर एकाहून एक सरस काव्यं आणि गीतं त्यांनी रचली. त्यांच्या गीतरामायणाने अखिल महाराष्ट्राला भक्तिमय करून टाकले तर त्यांच्या इतर काव्य व साहित्य लेखनाने मराठी माणसाला समृद्ध बनवले. आजही त्यांच्या असंख्य गाण्यांतून, साहित्यातून, चित्रपटातून, गीतरामायणातून गदिमा मराठी रसिकांच्या ह्रदयात विराजमान आहेत. #ग_दि_माडगूळकर #गदिमाडगूळकर #गदिमा #जयंती #विनम्र #अभिवादन #GDMadgulkar #Jayanti #Vinamra #Abhiwadan #📢1 ऑक्टोबर अपडेट्स🔴 ##जयंती /श्रध्दांजली /स्मृतीदिन/ पुण्यतिथी /बर्थडे #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #दिनविशेष... ✍ #अशोक हासे ग्राफिक आर्ट
ASHOK HASE...
4K जणांनी पाहिले
7 दिवसांपूर्वी
सुदढ आणि निरोगी हृदयासाठी हृदयाची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. हे महत्त्व सर्वांना कळावे व हृदयरोगाविषयी जनजागृतीसाठी यासाठी दरवर्षी २९ सप्टेंबर हा दिवस जागतिक हृदय दिन ❤ म्हणून साजरा केला जातो. दररोजची धावपळ, चुकीची जीवनशैली, व्यायामाचा अभाव, अयोग्य व अनिश्चित आहार यामुळे अनेकांना आजकाल ह्रदयाच्या समस्या जाणवतात. आज जागतिक हृदय दिनानिमित्ताने आपले हृदय सुदृढ ठेवण्यासाठी रोज व्यायाम करा, रोज किमान तीस मिनिटे चालणे, अथवा पळणे हा व्यायाम हृदयासाठी महत्त्वाचा आहे. आहारात कडधान्ये व फळभाज्या खाणे उपयुक्त आहे आपले हृदय सांभाळा आयुष्य आनंदी घालवा. जागतिक हृदय दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा... 🌹🙏 #जागतिक_हृदय_दिन #जागतिक_हृदय_दिवस #हार्दिक #शुभेच्छा #WorldHeartDay #Hardik #Shubhechha #❤️जागतिक हृदय दिन❤️ #📢29 सप्टेंबर अपडेट्स🔴 #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #दिनविशेष... ✍ #अशोक हासे ग्राफिक आर्ट
ASHOK HASE...
1.6K जणांनी पाहिले
7 दिवसांपूर्वी
२९ सप्टेंबर, आंतरराष्ट्रीय अन्न नुकसान जागृती दिवस... अन्न हे पूर्णब्रह्म आहे. अन्नाची नासाडी होऊ नये यासाठी प्रयत्न करू आणि जागरूक होऊ... 🙏 #आंतरराष्ट्रीय_अन्न_नुकसान_जागृती_दिवस #📢29 सप्टेंबर अपडेट्स🔴 #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #दिनविशेष... ✍ #अशोक हासे ग्राफिक आर्ट
See other profiles for amazing content