Mr. Vik@s
ShareChat
click to see wallet page
@36832142
36832142
Mr. Vik@s
@36832142
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 २७ सप्टेंबर - स्मरण ही कृती आहे. 🌻🌹 गुरूने सर्व करावे ही गोष्ट सत्य आहे, आणि तो करतो ही ही गोष्ट तितकीच सत्य आहे. पण आपण खरोखर सच्छिष्य आहोत की नाही हे पाहावे. देहातीत व्हायला, गुरूआज्ञे प्रमाणे वागणे यापरते दुसरे काय आहे ? 'मी देही नाही' असे म्हणत राहिलो तर केव्हातरी देहातीत होईन. दुसरा मार्ग म्हणजे 'भगवंत माझा' म्हणावे, म्हणजे देहाचा विसर पडतो. समर्थांचे नाव घेऊन सांगतो की आपला नीतिधर्म सांभाळा, आणि कोणताही प्रसंग आला तरी नामाला विसरू नका. ' मी जे जे करतो ते ते भगवंताकरिता करतो' असे जो म्हणतो तो खरा आणि उत्तम भक्त होय. कर्तेपण घालवायला उत्तम भक्त व्हावे लागते. भक्ताचे लक्षण म्हणजे भगवंतप्राप्तीशिवाय दुसरे काही नको असे वाटणे. भगवंतापासून आपल्याला जे दूर सारते ते खरे संकट होय. तोच काळ सुखात जातो की जो भगवत्स्मरणात जातो. खरोखर, स्मरण ही कृती आहे आणि विस्मरण ही वृत्ती आहे. भगवंताचे स्मरण करणे म्हणजे हवन करणे होय, आणि अभिमान नष्ट करणे म्हणजे पूर्णाहुती देणेच होय. वृत्ती भगवंताकार झाली पाहिजे. आपल्याला ज्याची आवड असते त्याचे स्मरण आपोआप राहते. विषय अंगभूत झाले असल्याने त्यांचे स्मरण सहज राहते; पण भगवंताचे स्मरण आपण मुद्दाम करायला पाहिजे. हे करणे अगदीच सोपे नाही; परंतु ते फार कठीण देखील नाही. ते मनुष्याला करता येण्यासारखे आहे. भगवंताची भक्ती ही सहजसाध्य आहे. ती अनुसंधानाने साध्य होते. अनुसंधान समजून केले पाहिजे; तिथे अनुभव लवकर येईल. पहार्यावर शिपाई जसा जागृत राहतो, त्याप्रमाणे अनुसंधान जागृत् ठेवले तर विषयांच्या संकल्पाचे पाय मोडतील. चोर चोरी करायला केव्हा येईल हे ओळखून, अनुसंधान चुकू देऊ नये. ताप आला की तोंड कडू होते, मग जिभेवर साखर जरी चोळली तरी तोंड गोड होत नाही. त्यासाठी अंगातला ताप गेला पाहिजे. त्याप्रमाणे, वरवर क्रिया करून दुःख नाहीसे होणार नाही. त्यासाठी अनुसंधानच पाहिजे. एक मुलगा परीक्षेसाठी मुंबईला आला. परीक्षा होईपर्यंत तो अडकून होता. परीक्षा संपली तेव्हा तो म्हणाला, 'आता मी मोकळा झालो बाबा !' नंतर चार दिवस तो मजेत मुंबईत हिंडला. त्याप्रमाणे, आपण अनुसंधान ठेवून प्रपंचाच्या आसक्तीतून मोकळे व्हावे, आणि मग मजेने संसार करावा; आपल्याला अगदी आनंदच मिळेल. उंबरठ्यावर दिवा ठेवला असताना ज्याप्रमाणे दोन्ही बाजूला उजेड पडतो, त्याप्रमाणे भगवंताचे अनुसंधान हा उंबरठ्यावरचा दिवा आहे; त्याने परमार्थ आणि प्रपंच दोन्हीकडे उजेड पडेल. प्रपंचामध्ये वागताना मनाने थोडे लक्ष द्यावे लागते, याला भगवंताचे अधिष्ठान असणे म्हणजेच अनुसंधान ठेवणे म्हणतात. २७१. भगवंताच्या इच्छेने अकर्तेपणाने कर्म करणे, हेच अनुसंधान ठेवणे किंवा भक्ती करणे होय.
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - ShareChat
#🙏जय माता दी आदिशक्ती रेणूका मातेने श्री संत विष्णुकवी यांना मूळस्वरूपात दर्शन दिले त्यांनी .जसेच्या तसे स्वतः हाताने काढलेले रेणूका मातेचे चित्र (माहूर )*
🙏जय माता दी - ShareChat
#🙏जय माता दी सहावे रूप (६) || कात्यायनी ||  अस्त्र-शस्त्र : कमळ व तलवार वाहन : सिंह  मंत्र : 'या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:॥ दुर्गेचे हे सहावे रूप "कात्यायनी" या नावाने ओळखले जाते. दुर्गा पूजेच्या सहाव्या दिवशी या देवीची उपासना केली जाते. या दिवशी साधकाचे मन 'आज्ञा' या चक्रात स्थिर होते. योगसाधनेत या आज्ञा चक्राचे विशेष स्थान आहे. या चक्रात स्थिर झालेला साधक कात्यायनीच्या चरणी आपले सर्वस्व वाहून देतो. परिपूर्ण आत्मदान करणार्या भक्ताला देवी सहजपणे दर्शन देते. दुर्गेचे नाव कात्यायनी कसे पडले यामागे एक कथा आहे. कत नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते. त्यांना कात्य नावाचा पुत्र झाला. या कात्याच्या गोत्रात प्रसिद्ध महर्षी कात्यायनाचा जन्म झाला. त्यांनी अनेक वर्ष भगवतीची कठोर तपस्या केली. भगवतीने त्यांच्या घरी जन्म घ्यावा अशी त्यांची इच्छा होती. भगवतीने त्यांच्या या प्रार्थनेचा स्वीकार केला. काही काळानंतर जेव्हा महिषासुराचा अत्याचार पृथ्वीवर वाढला तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवतांनी आपल्या तेजाचा काही अंश देऊन महिषासुराच्या विनाशासाठी एका देवीला उत्पन्न केले. महर्षी कात्यायनाने या देवीची सर्वप्रथम पूजा केली म्हणून या देवीला कात्यायनी देवी असे नाव पडले. अश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी या देवीने महर्षी कात्यायनाच्या घरी जन्म घेतला होता. सप्तमी, अष्टमी आणि नवमी हे तीन दिवस महर्षी कात्यायन यांच्या घरी पूजा ग्रहण करून दशमीच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता. अशी ही कथा पुराणात आहे कात्यायनी अमाप फलदायक आहे. कालिंदीच्या यमुना किनारी भगवान कृष्णाला पती रूपात प्राप्त करण्यासाठी ब्रज गोपींनी या देवीची पूजा केली होती. ही देवी ब्रजमंडळाच्या अधिष्ठात्रीच्या रूपात प्रतिष्ठित आहे. कात्यायनीचे रूप अत्यंत तेजःपुंज आहे. तिला चार भुजा आहेत. देवीचा उजव्या बाजूकडील वरचा हातात अभयमुद्रा आणि खालच्या हातात वरमुद्रा आहे. डावीकडील वरच्या हातात तलवार आणि खालच्या हातात कमळाचे फूल आहे. तिचे वाहन सिंह आहे. कात्यायनीच्या उपासनेने मनुष्याला अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष या चार फळाची सहजतेने प्राप्ती होते. तो इहलोकात राहूनही त्याला अलौकीक तेज आणि प्रभाव प्राप्त होतो. जो व्यक्ती मातेची मनापासून पूजा करतो. तो रोग, भय, दु:ख आणि संतापापासून मुक्त होतो. सात जन्माचे पाप नष्ट करण्यासाठी मातेला शरण येऊन तिची उपासना करणे आवश्यक आहे. माहिती संकलन-: निखिल आघाडे
🙏जय माता दी - ೬ ೬ - ShareChat
#🙏जय माता दी जिल्ह्यात माहूरगडाची गडदुर्गा “माहूरची रेणुकामाता”...🙏🚩 सह्याद्रीच्या शिखरावर वसलेले रेणुकामातेचे माहूर हे स्थान म्हणजे धार्मिक, ऐतिहासिक, पौराणिक स्थळांसोबतच निसर्गाचे वरदान लाभलेला प्रदेश आहे देव, सिद्ध,ऋषी यांचे निवास असलेल्या भागीरथीच्या तीरावार कान्यकुब्ज नावाची प्रसिद्ध नगरी होती... त्या नगरीत धार्मिक सत्यवादी व सर्व शास्त्रांत प्रवीण असलेला इश्वाकू नावाचा राजा होता व इश्वाकू राजाच्या सद्गुणी मुलीचे नाव होते रेणू रेणू राजाने कन्याप्राप्तीसाठी शंकराची आराधना केली... शंकरपार्वतीला प्रसन्न करून त्यांच्या आशीर्वादाने कन्याप्राप्तीसाठी यज्ञ केला त्या यज्ञातून जी तेजस्विनी चंद्रिबबाप्रमाणे कन्या प्रगटली तीच एकवीरा अदिती म्हणजेच श्री रेणुका..रेणुकेचे आणखीन एक रूप प्रगट होते आणि ते म्हणजे ‘लज्जागौरी’चे... महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी रेणुकामातेचे हे मूळ पीठ अतिशय शुचिर्भूत भूमी श्री क्षेत्र माहूरगडची कोरी भूमी आहे... रेणुकेलाच मातंगी हेसुद्धा नाव आहे विष्णुरूप परशुरामाची माता व जगन्माता शिवपत्नी अनादी अनंत आहे व रेणुका हे तिचेच रूप आहे.. म्हणून श्री रेणुकेच्या रूपात शाक्त आणि वैष्णव या दोन्ही पंथांचा समन्वय आहे अशा तऱ्हेने समाजास आदर्श वाटणारे श्री रेणुकेचे महात्म्य आहे... शके १६९७ मध्ये लिहिल्या गेलेल्या ’श्री रेणुका महात्म्यम्’ या प्राचीन अप्रकाशित संस्कृत ग्रंथातील श्री रेणुकेचे महात्म्य आणि महत्त्व श्री रेणुकेचे महात्म्य जाणून घेताना सामाजिक जीवनातील त्याचे स्थान किती महत्त्वाचे आहे हे लक्षात येते माहूर हा महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे... “तू विश्वाची रचिली माया, तू शीतल छायेची काया तुझ्या दयेचा ओघ अखंडीत, दुरित लयाला नेई....” Whatsapp वरून
🙏जय माता दी - ShareChat
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 महाराजांनी आपल्या भक्तांच्या विश्वासाची परीक्षा अनेकदा पाहिलेली दिसून येते . दत्त माहात्म्यात याचे एक फार छान उदाहरण आहे .कार्तवीर्य हा गर्ग मुनींच्या मार्गदर्शनाने माहूर येथे आला . दत्त महाराजांचे दर्शन झाले . मात्र कार्तवीर्य तिथे राहू नये याकरिता दत्त महाराजांनी अनेकदा निर्भत्सना केली ,दम देखील देऊन पाहिला . दत्त म्हणे जा निघोन l नातरी करीन ताडन l इथून जा नाहीतर मार देईन ,पण कार्तवीर्याने दुर्लक्ष करीत सेवेला आरंभ केला . सेवा करताना एकदा कार्तवीर्याचे दोन्ही हात खांद्यापासून गळून पडले . हि दत्त महाराजांची लीला होती . हात गळून पडताच महाराज म्हणाले ,अरे राजा ,हे फार मोठे अरिष्ट आहे . जा ,पळ इथून ! हे अशुद्ध संगाचे फळ आहे ,माझ्यासारख्या अमंगळाशी संग केल्याने संसर्ग दोष तुला लागला आहे . मात्र यावेळी गर्ग मुनींनी केलेला उपदेश स्मरून कार्तवीर्य म्हणाला ,का बरं मनाला मोहवितोस ? ह्या तुझ्या लीला आहेत . तू सर्वात्मा पुरुष l घेशी मायेने हा वेष l असोनिया निर्विशेष l सविशेष भाससी ll यावर दत्त महाराज प्रसन्न झाले आणि त्यांनी केवळ बाहूच नव्हे तर अनेक वरदाने दिली अशी कथा आहे . गर्ग मुनींच्या मार्गदर्शनावर विश्वास किंवा अढळ श्रद्धा हा कार्तवीर्यावर झालेल्या दत्त महाराजांच्या कृपेचा पाया आहे . गुरुवचनावर विश्वास महत्वाचा आहे .विश्वास नसता तर कदाचित कार्तवीर्याची पुढील कथा वेगळी असती . विश्वासावर एक कथा आठवली ती सांगतो . काही गिर्यारोहक हिमालयात एका हिमाच्छादित पर्वतावर गिर्यारोहण करीत होते . या प्रवासात एके ठिकाणी एक सरळसोट कडा आला . सर्व गिर्यारोहक दोरीच्या साहाय्याने कडा चढले . शेवटचा गिर्यारोहक चढायला लागेस्तोवर अंधार पडला . पुढे गेलेल्या गिर्यारोहकात आणि ह्या शेवटच्या माणसात खूप अंतर पडले . निर्मनुष्य परिसर ,अंधार आणि कडा चढणारा हा एकटा . दोरीच्या साहाय्याने कडा चढताना शेवटच्या टप्प्यावर दोरी तुटून त्याचा तोल गेला आणि तो खाली पडू लागला . पडताना त्याने अनन्य भावाने देवाचा धावा केला आणि म्हणाला ,वाचव ,आता तूच रक्षक आहेस . तितक्यात तूटलेल्या दोरीचा भाग त्याच्या हाताला लागला आणि तो एके ठिकाणी अडकला ,त्याचा धावा ऐकून भगवान प्रकट झाले , म्हणाले ," तुझा माझ्यावर विश्वास आहे ना ? मग ह्या हाती आलेल्या दोरीचे टोक सोडून दे . तुला काही होणार नाही ." हे ऐकून हाती आलेल्या दोरीकडे पाहत त्याने विचार केला ,खाली अजून किती खोल आहे कोणास ठाऊक ? आणि त्याने दोरी सोडली नाही . त्याचा आपल्यावर विश्वास नाही हे पाहून भगवान अदृश्य झाले . अधांतरी बर्फात लोंबकळत राहिल्याने त्याची शुद्ध हरपली . सकाळी उजाडताच पुढे गेलेले गिर्यारोहक त्याचा शोध घेत आले आणि त्यांनी पाहिले कि जमिनीपासून अवघ्या आठ फुटांवर लोंबकळत बर्फात त्याचा मृत्यू झाला होता . गुरु किंवा आपले उपास्य दैवत यांच्या वचनावर विश्वास श्रद्धा असणे फार गरजेचे आहे ,तेव्हा गर्ग मुनी असोत किंवा वेदधर्मा मुनी असोत . यांचे मार्गदर्शन वेगळे वाटले तरी विश्वासाने आचरण करताच भगवंताचे दर्शन ,सान्निध्य आदी निश्चित आहे . श्रीगुरुदेव दत्त !!!--- अभय आचार्य
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - Cdes l3@8@ 80[ UII 1 दिगंबरा दिगबरा श्रीपाद वल्लभ दिगबरा Cdes l3@8@ 80[ UII 1 दिगंबरा दिगबरा श्रीपाद वल्लभ दिगबरा - ShareChat
#🙏जय माता दी माता दुर्गा देवीचे प्रभावी मंत्र💎🌹⚜️🚩 🚩 पौराणिक मान्यतेनुसार, नवरात्रीच्या दिवसांमध्ये, माता दुर्गा स्वतः भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी आणि त्यांचे सर्व संकट दूर करण्यासाठी पृथ्वीवर येतात. नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची पूजा पूर्ण भक्तिभावाने आणि शुद्ध मनाने केल्यास कुटुंबात सुख-शांती नांदते. माता लक्ष्मी घरात वास करते आणि भरपूर संपत्ती देते. देवी दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचा आशीर्वाद मिळविण्यासाठी काही मंत्रांचा जप करणे खूप फायदेशीर आहे. माँ दुर्गेचे हे मंत्र खूप प्रभावी आहेत. या मंत्रांचा जप केल्याने जीवनातील सर्व दोष आणि अडथळे दूर होतात. नवरात्री व्यतिरिक्त या मंत्रांचा रोज जप करणे खूप फायदेशीर आहे. 🚩⚜️🌹 देवीचे प्रभावी मंत्र 🌹⚜️🚩 🚩 नवरात्रीच्या ९ दिवसांत या मंत्रांचा जप करावा. मंत्र म्हणण्यापूर्वी दिवा लावणे आणि मंत्राचा किमान ११ वेळा जप करणे चांगले. 🔹१. ॐ जयन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी। दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते।। 🔹२. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।। 🔹३. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।। 🔹४. या देवी सर्वभूतेषु तुष्टिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।। 🔹५. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।। 🔹६. या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।। 🔹७. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।। 🔹८. या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।। 🔹९. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोऽस्तुते।। 🔹१०. नवार्ण मंत्र ‘ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चै’ कार्य सिद्धीसाठी या मंत्राचा जाप करा. 🔹११. पिण्डज प्रवरा चण्डकोपास्त्रुता। प्रसीदम तनुते महिं चंद्रघण्टातिरुता।। पिंडज प्रवररुधा चन्दकपास्कर्युत । प्रसिदं तनुते महयम चंद्रघंतेति विश्रुत।। शुभम् भवतू.. पांडुरंग चरणरज rajushewalkar@yahoo.com 🙏🏻🌹😊
🙏जय माता दी - ShareChat
#कुंकुमार्चन म्हणजे काय व ते कसे करतात ??!! ========= ◆ कुंकुमार्चन करणे म्हणजे काय ? इच्छित देवी देवतांचा नामजप करत एक-एक चिमूटभर कुंकू मूर्ती अथवा तस्वीरीमधील चरणां पासून प्रारंभ करून तिच्या डोक्या पर्यंत वहावे अथवा इच्छित देवी देवतांचा नामजप करत कुंकवाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन होय. ◆ देवीला कुंकुमार्चन करणे म्हणजे काय ? देवीचा नामजप करत एक-एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणां पासून प्रारंभ करून तिच्या डोक्या पर्यंत वहावे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकवाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन होय. ◆ त्या संबधी कोणती काळजी घ्यावी ? कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा अथवा श्री यंत्र अथवा प्रतिकात्मक वस्तु (सुपारी, यंत्र, ताम्रपट, सुवर्णपट ) पात्रात घेऊन सुचिर्भुत करुन घ्यावे. त्यानंतर करंगळी व चाफेकळी बोटाचा स्पर्श न करता केवल अंगठा तर्जनी व मधील बोट यानीच कुंकुम घेऊन देवीच्या चरणा पासून मस्तका पर्यंत वाहावे अथवा कुंकवाने स्नान घालावे. ◆ कुंकुमार्चनाचे शास्त्र कुंकवात शक्तीतत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्ती तील शक्ती तत्त्व कुंकवात येते नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते कुंकुमार्चन करण्या साठी विषेश दिवसाची जसे पोर्णिमा अमावस्या गुरु पुष्यामृत योग लक्ष्मी पुजन मंगळवार शुक्रवार निवड करावी मूळ कार्यरत शक्‍ती तत्त्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशा तून झाली अाहे. शक्‍ती तत्त्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात. कुंकवातून प्रक्षेपित होणार्‍या गंध लहरींच्या सुवासा कडे ब्रह्मांडातील शक्‍ती तत्त्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्ती तील सगुण तत्त्वाला जागृत करण्या साठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्त्वाला प्रसन्न करणार्‍या गंध लहरींचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवी पूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे. मूळ शक्‍ती तत्त्वाच्या बिजाचा गंध हाही कुंकवातून दरवळणार्‍या सुवासाशी साधर्म्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते. ◆ फलश्रुती :- अशा प्रकारे कुंकुमार्चन करुन अर्पण केलेले साठलेले कुंकु एका डबीत ठेवावे अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्य सिध्दी साठी याची सहायता होते. परमेश्वरावर असलेली श्रद्धा व गुरूंवर असलेली अपार भक्ती यामुळे माणूस आयुष्यात असाध्यही साध्य करू शकतो..! #🌹देवी देवता🙏
🌹देवी देवता🙏 - ShareChat
#🙏जय माता दी ललिता पंचमी माहिती पंचमीचे दिवशी व्रत ते *उपांगललिता हो* *अर्ध्यपाद्यपूजनें तुजला भवानी रतविती हो ॥* *रात्रीचे समयी करिती जागरण हरिकथा हो* *आनंदे प्रेम तें आले सद्‌भावे क्रीडतां हो ।।उदो।। हे काम्य व्रत आहे. ललिता देवी ही या व्रताची देवता आहे. एखाद्या करंडकाचे झाकण हे हिचे प्रतीक मानून पूजेला घेतात. सकाळी आघाड्याच्या काडीने दंतधावन करतात. केळीचे खांब आणि पुष्पमाला यांनी देवीसाठी मखर बांधतात. ललितादेवीचे ध्यानमंत्र असे आहेत- *नील कौशेयवसनां हेमाभं कमलासनाम।* *भक्तांना वरदां नित्यं ललितां चिन्तयाम्यहम्।।* '' कमलावर अधिष्ठित, निळे, रेशमी वस्त्र परिधान करणारी, सुवर्णकांतीची, भक्तांना नित्य वर देणारी अशा ललितेचे मी चिंतन करतो.'' या पूजाविधानात पुष्पांजली समर्पण झाल्यावर गंधाक्षता युक्त व साग्र अशा ४८ दुर्वा ललितेला वाहतात. नैवैद्यासाठी लाडू, वडे, घारगे वगैरे पदार्थ करतात. पूजेच्या शेवटी घारग्यांचे वायन (वाण) देतात. रात्री जागरण व कथा श्रवण करतात. दुसऱ्या दिवशी ललितादेवीचे विसर्जन करतात.
🙏जय माता दी - ShareChat
#🙏जय माता दी रूप (५) || स्कंदमाता ||  अस्त्र-शस्त्र : कमळ  वाहन : सिंह  मंत्र : या देवी सर्वभू‍तेषु माँ स्कंदमाता रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।। (हा मंत्र ५ व्या दिवशी जाप करावा) दुर्गेचे पाचवे रूप ' स्कंदमाता' या नावाने ओळखले जाते. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन 'विशुद्ध' चक्रात स्थिर झालेले असते. भगवान स्कंद लहानपणी या देवीच्या काखेत बसले होते. भगवान स्कंद 'कुमार कार्तिकेय' नावानेही ओळखले जातात. ते देवासूर संग्रामात देवतांचे सेनापती बनले होते. पुराणात त्यांना कुमार आणि शक्ती म्हणून त्यांचा महिमा वर्णन केलेला आहे. भगवान स्कंदची आई असल्यामुळे दुर्गाच्या या रूपाला स्कंदमाता म्हणून ओळखले जाते. स्कंदमाता चारभुजाधारी आहे. तिच्या उजव्या बाजूकडील खालील भुजा, जी वर उचललेली आहे, त्या हातात कमळाचे फूल आहे. डावीकडील वरच्या हातात वरमुद्रा तसेच खालील भुजा वरच्या बाजुला उचललेली आहे त्यामध्ये कमळाचे फूल घेतलेले आहे. या देवीचा रंग पूर्णत: शुभ्र आहे. ही देवी कमळाच्या आसनावर विराजमान असते. यामुळे या देवीला पद्मासना असेही म्हटले जाते. तिचे वाहन सिंह आहे. नवरात्रीतील पाचव्या दिवसाचे शास्त्रात विशेष महत्त्व सांगितले आहे. यावेळी चक्रात स्थिर झालेल्या साधकांची चित्तवृत्ती लोप पावते. सर्व बंधनातून साधकाचे मन मुक्त होऊन पदमासना स्कंदमातेच्या रूपात तल्लीन होते. यादरम्यान साधकाला पूर्ण सावधगिरीने उपासना करणे आवश्यक आहे. सर्वतोपरी एकाग्र होऊन साधनेच्या मार्गावर जायला पाहिजे. स्कंदमातेच्या उपासनेने भक्ताची इच्छा पूर्ण होते. मृत्यूलोकातच त्याला परम शांती आणि सुखाचा अनुभव मिळतो. त्याच्यासाठी मोक्षाचा मार्ग सोपा होतो. स्कंदमातेच्या उपासनेने भगवान स्कंदाची उपासनाही सफल होते. सूर्यमंडळाची अधिष्ठात्री देवी असल्यामुळे तिच्या भक्ताला अलौकीक तेज प्राप्त होते. आपण एकाग्र मनाने पवित्र होवून मातेला शरण येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या भवसागरात दु:खापासून मुक्ती मिळवून मोक्षाचा मार्ग सुलभ करण्यासाठी यापेक्षा चांगला पर्याय दुसरा नाही. माहिती संकलन-:निखिल आघाडे.
🙏जय माता दी - ukmha ~ ukmha ~ - ShareChat
२६ सप्टेंबर भगवंताला विसरणे ही आत्महत्याच. एकदा एका माणसाने पक्वान्ने कशी तयार करावी हे शिकविण्याची शाळा काढली. त्या शाळेमध्ये तो मनुष्य शब्दांच्या साहाय्याने, निरनिराळी पक्वान्ने कशी तयार करायची, हे आपल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगे. पण त्या विद्यार्थ्यांना घरी भाकरी करून खाण्यापुरते पीठ देखीलमिळत नसे; त्यांना त्या पक्वान्नांच्या ज्ञानाचा काय उपयोग होईल बरे ?* *त्याचप्रमाणे वेदांताच्या गोष्टी किंवा ज्ञान हे पक्वान्नांच्या ज्ञानासारखे आहे. जो मनुष्य वेदांताचा नुसताच अभ्यास करतो, त्याला त्यापासून तसा काही फायदा होत नाही. जे ज्ञान व्यवहाराला लागू पडत नाही, ते ज्ञान खरे असले तरी आपल्याला उपयोगाचे नाही.* *आपल्यात आणि संतांमध्ये फरक हाच की, आपण जगतासाठी देव मानतो, तर् संत देवासाठी जगत मानतात.* *खरे म्हणजे, जी गोष्ट आचरायला अतिसुलभ असते, ती समजावून सांगायला फार कठीण असते; ती खरी अनुभवानेच जाणायची असते.* *ज्याचा अनुभव दुसर्यावर अवलंबून आहेतो अपूर्ण समजावा; म्हणजेच, जेव्हा मिश्रणाने पदार्थाला चव येते तेव्हा ते दोन्ही पदार्थ अपूर्णच समजावेत. या जगात सर्व दॄष्टीने पूर्ण असा एक भगवंतच आहे; त्याला विसरणे ही आत्महत्याच आहे. तेव्हा नेहमी त्याच्या सान्निध्यात,म्हणजेच त्याच्या नामात, राहाण्याचा प्रयत्न करावा.* *सर्व कीर्तनांचे सार हेच असते. फक्त मांडणी निराळी.* *रामरायांनी सर्व वानरांना सीतामाईचा शोध करायला सांगितले. जो तो 'हूं, हूं' करून शोधासाठी निघून गेला. परंतु मारूती अती बुद्धीमान्; त्याने 'सीतेला कसे ओळखायचे' म्हणून विचारले. त्यावर श्रीरामांनी तिचे पुष्कळ वर्णन केले. ती सुंदर आहे म्हणून सांगितले. परंतु स्त्री कशी दिसते हेच त्याला माहिती नाही !* *तेव्हा श्रीरामप्रभू त्याला म्हणाले, "तुला मी काय सांगतो हे कळलेले दिसत नाही; तू आता एकच गोष्ट लक्षात ठेव, जिथे तुला* *रामनामाचा सारखा ध्वनी ऐकू येईल तिथे ती आहे म्हणून समज." तेव्हा ती खूण मारुतिरायाला पटली.* *ज्याला भगवंताच्या नामाची खूण मनापासून समजली त्याच्या जन्माचे सार्थक झाले, त्याचा परमार्थ सफल झाला, आणि त्याला जगात मिळवायचे बाकी असे काही राहिलेच नाही.* *मारुतिरायाची भक्ती फार मोठी. श्रीरामाला वाटले, याला आता काहीतरी 'चिरंजीव' असे दिल्याशिवाय याचे समाधान होणार नाही;* *म्हणून चिरंजीव असे हे आपले नाम त्याला त्याने दिले. त्यामुळे त्या नामाबरोबर मारुतीही चिरंजीव झाला.* 🌹 *२७०. सर्व संतांचे सांगणे आहे की, मनापासून भगवंताचे नामघ्या आणि आपले कर्तव्यकर्म करा.* 🙏🌹 *श्रीराम जय राम जय जय राम* 🌹🙏 #🙏श्री गुरुदेव दत्त💐
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - இலலட5 இலலட5 - ShareChat