#🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏श्री स्वामी समर्थ📿 वयस्कर आजींची स्वामी समर्थांवर निस्सीम भक्ती होती. त्या रोज स्वामींच्या मूर्तीला दूध पाणी घालून, स्वच्छ धूवून पूसून, गंध, अक्षता, फुलं वाहून खडिसाखरेचा नेवैद्य दाखवत. मगच त्या स्वतः चहा घेत. वर्षानूवर्ष त्यांच्या या नियमात कधिच खंड पडला नाही. थकत्या वयात आजींचे हात थरथरत, पाय लटपटत तरिही त्या निग्रहाने आपला नेम बरोबर न चुकता करत. एकदा त्या अंगणात फुलं आणायला गेल्या, फुलं आणून देवघरात पाटावर येऊन बसल्या तसं त्यांना हात थरथर कापतोय असं जाणवलं. तरी स्वामींची मूर्ती उचलून ताम्हणात ठेवायचा प्रयत्न केला, पण हातातुन निसटून ती जमीनीवर पडली. ठण्णकन् आवाज ऐकून सुन धावतच आली. तर आजी ओक्साबोक्शी रडत होत्या. तिला वाटलं ताम्हण पायावर पडलं की काय, पण पहाते तर स्वामींची चांदिची मूर्ती जमीनीवर पडलेली. तिने मुर्ती ऊचलून कपाळी लावली अन् ताम्हणात ठेवली. आजींचा गोंधळ सुरूच होता, स्वामी पडले गं, असं कसं झालं. मी गाफिल राहिले, हातून निसटले, पडले गं पडले. केवढं टेंगूळ आलंय बघ. कसे कासावीस झालेत. चल चल लवकर डॉक्टरला फोन कर, बोलव लवकर. आजींनी सुनेच्या मागे हट्टच लावला. शेवटी तिने फोन केला. तिचा भाचा डॉक्टर असल्याने तो म्हणाला, पेशंट्स आटपून येतोच तासाभरात. तेवढा वेळ आजी गप्प बसेनात, असं कर तू स्कूटिवर स्वामींना घेऊन जा. लवकर औषध पाणी केलं पाहिजे. सुनेला रहावेना, असं कसं लोक काय म्हणतील. म्हातारी एक ठिकंय पण सुन ही नादिष्टपणा करतेय. सुन म्हणाली येतायत ना डॉक्टर तोपर्यंत आपण थांबु, काहितरी करू दरम्यान आजींनी फ्रिजमधून बर्फ मागीतला. स्वामींना बर्फाचा शेक दिला डबीतून हळद काढून लेप लावला. तो पर्यंत डॉक्टर आले, सुनेने देवखोलीत प्रवेश करण्या आधी डॉक्टरांना हात पाय धूवायला नेताना सर्व सविस्तर संगीतलं. त्या तरूण डॉक्टरला गंमत वाटली. देवघरात येऊन मोठ्या गांभीर्याने तो स्वामींना तपासत असताना त्याला एक जाणवलं हि हि मूर्ती गरम कशी.. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघत आजी म्हणाल्या ताप आहे का रे ? तपास बाबा नीट, डॉक्टरांनी आजींच्या समाधानासाठी मुर्तीला स्टेथोस्कोप लावला अन् काय आश्चर्य.
त्या मूर्तीमधून हार्ट बिट्स ऐकू येत होते.. तो चमकला, भांबावून गेला. सुनेला म्हणाला आत्या खऱंच आजींची श्रद्धा खूप मोठी आहे.. ऐक त्यांनी स्टेथोस्कोप सुनेला ऐकवला, तिचेहि डोळे भरून आले. डॉक्टरांनी मुर्तीला सतत गार पाण्याचा अभिषेक करायला संगीतला. अन खरोखरच आराम पडला स्वामींना आणि आजींना..
श्री स्वामी समर्थ
#🌹देवी देवता🙏 म्हणतात "आपल्या देहाला होणारे रोग व मनाला होणारे दुखः हे आपल्याच कर्माचे फळ असते पण ते अमुक कर्माचे फळ आहे असे कळत नसल्याने आपण त्याला प्रारब्ध असे नाव देतो् आयुष्यातील सर्व गोष्टी प्रारब्धाने चालतात ,आपल्यावर येणाऱ्या आपत्ती आपल्या प्रारब्धाच्या असतात त्या भगवंताच्या नसतात, संताना देखील त्यांचे प्रारब्ध भोगावे लागते पण ते देहाला विसरलेले असल्याने देहाचे भोग भोगणे आणि न भोगणे या दोन्हीची त्यांना फिकीर नसते म्हणून ते भोग टाळीत नाहीत. महाभारताचे युद्ध संपल्यावर कृष्ण पांडवांचा निरोप घ्यायला येतो व प्रत्येकाला हवे ते वरदान मागायला सांगतो सर्वांचे मागून झाल्यावर कृष्णाने कुंतीला काय हवे ते विचारल्यावर कुंती म्हणाली " भगवंता प्रारब्धाने आलेल्या दुखाचा दोष तुझ्याकडे नाही,पण जर त्या दुःखात मला सारखी तुझी आठवण येवून तुझे अनुसंधान टिकत असेल, तर मला जन्मभर दुःखामध्येच ठेव " असे म्हणून कुंतीने तिला देवाची आठवण सतत व्हावी; म्हणून देवाकडे केवळ दुःखच मागितले होते. सर्व सामान्य माणसाची एक प्रवृत्ती असते कि जेव्हा आपण दुखःद स्थितीत असतो तेव्हा तळमळीने व आर्ततेने देवाची प्रार्थना करतो याउलट सुखाच्या व आनंदाच्या स्थितीत आपल्याला देवाचा विसर पडतो ,म्हणून सुखात अनावधानाने देवाचा विसर पडू नये म्हणून कुंतीने देवाकडे असीम दुखः मागितले होते आपली योग्यता तशी नाही हे खरे, म्हणून आपण भगवंताला अशी प्रार्थना करावी की, "भगवंता प्रारब्धाने आलेले भोग येवू देत पण त्यामध्ये तुझा विसर कधीही पडू देवू नकोस" .आणि काहीही करून भगवंताच्या अनुसंधानात राहण्याचा नेहमी प्रयत्न करावा.
कॉपी पेस्ट पोस्ट
कर्माचा प्रभाव अत्यंत सूक्ष्म रितीने काम करीत असतो. ह्या सत्याची जाणिव होऊन जीवाने सदैव सत्कर्मच करावे. दुष्कर्मच कधीही करू नये. मानव आपण केलेल्या पापपुण्याचे गाठोडे घेऊन जन्मजन्मांतराच्या कर्म प्रवाहात वाहत जात असतो. मरतेवेळी ज्या संकल्पाने प्राणत्याग होतो त्याला अनुसरून त्याला दुसरा जन्म मिळतो. या जगातील लोकांनी संकल्प रूपाने पापकर्म केल्यास पापांचे फळच प्राप्त होते. संकल्पाने पुण्यकर्म केल्यास पुण्यकर्माचे फळ प्राप्त होते.
ज्या ठिकाणी त्यांचे नामस्मरण, भजन, किर्तन होते, त्या ठिकाणी श्रीपाद प्रभू सूक्ष्म रूपाने संचरण करीत असतात, हे अक्षर सत्य आहे. भाजलेल्या बीजांचे पुनरंकुरित न होणे हा सृष्टीचा धर्म आहे. भाजलेल्या बीजांना पुनरंकुरित करणे हे सृष्टिकर्त्याचे शक्तिसामर्थ्य आहे.
मी दत्त आहे. कोट्यानुकोटी ब्रह्मांडात व्याप्त असलेले एकमेव तत्वमीच आहे. दिग हेच वस्त्र म्हणून दिगंबर आहे. जे कोणी त्रिकरणशुध्दीने दत्त दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा नरसिंहसरस्वती दिगंबरा म्हणून भजन, कीर्तन करतात येथे मी सूक्ष्म रूपाने असतो.
सत्पुरूषांस, योगीयास दान-धर्म केल्याने, दैवी कृपेमुळे पाप कर्मांचा क्षय होतो. देवतामूर्ती पुण्यस्वरूप असून त्यांच्या ठाई करूणा असल्या कारणाने आपले पाप कर्मफल त्यांच्याकडे ओढून घेतात व त्यांचे पुण्य आपणास देतात.
अवतारी पुरूष जन्माला यायचे म्हणजे त्या वंशात पूर्वीच्या ऎंशी पिढ्यांनी पुण्य संचय केलेला असतो. तसेच अवतारी पुरूषाचे गुरू होणा-या व्यक्तिचा वंश परम पवित्र पुण्यवान असावा लागतो. या सृष्टीमध्ये प्रत्येकजण हा सेवकच असतो. मी जेव्हा प्रसन्न होतो तेव्हा त्या सेवकाला सेवेचे जास्ती फळ प्रदान करतो. परंतु अप्रसन्न झाल्यास सेवेचे कमी फळ देतो.
ब्रह्मदेवाने लिहिलेल्या प्रारब्धास कोणी बदलू शकत नाहीत. परंतु श्रीदत्त प्रभूंच्या भक्तांसाठी मात्र श्रीदत्त ब्रह्मदेवाला आदेश देऊ शकतात.
श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो🙏💐🌸
श्रीपाद श्रीवल्लभ चरणी कोटी कोटी नमन🙏💐🌸 #🙏श्री गुरुदेव दत्त💐
काषाय म्हणजे मातकट ,हा रंग भगवा नाही . संन्यासी जन घेतात ती छाटी मातकट किंवा गेरू रंगाची का ? तर हा मातकट रंग वैराग्याचा दर्शक आहे . छाटी हि मातकट रंगात तयार केली जाते आणि त्यासाठी गेरू ,तुरटी आणि लिंबाचा वापर केला जातो . आता तुरटी का तर हा मातकट रंग पक्का व्हावा किंवा उत्तम रीतीने बसावा म्हणून .
नृसिंहवाडीच्या रविवारी म्हटल्या जाणाऱ्या आरतीत एक उल्लेख आहे , काषायांबर खंडन निर्मित कौपीनम् ll श्रीगुरुमहाराजांनी छाटी फाडून लंगोट्या तयार केल्या . कौपीन म्हणजे लंगोटी .
लंगोटी देखील तयार स्वरूपात नाही ,ती छाटी फाडून तयार केलेली .वस्त्र आणि उपवस्त्र ह्या प्रकारात ह्या लंगोटी आणि छाटी ह्या गुरुमहाराजांच्या दोन वस्त्रांचा अनेकदा उल्लेख आहे . नित्य म्हटल्या जाणाऱ्या आरत्यात तर अनेकवार हे आले आहे . शनिवारी म्हटल्या जाणाऱ्या आरतीत काषायांबर युग्म करिचर्म वसन l दंड कमंडलू भस्म लेपन ll युग्म अर्थात दोन ,गुरुमहाराजांनी दोन वस्त्रे परिधान करून हत्तीच्या कातड्याचे आसन घेतले आहे .
श्रीकृष्णा तट निकटे यत्पाद युगलं --- या नृसिंहवाडीतील नित्य पदात काय उल्लेख आहे ? वामेदक्षिण भागेदण्डपात्र स्थितीः l काषायांबर युग्म परितो दधाति ॥ ७ ॥
डाव्या हाताला दंड तर उजव्या हाताला कमंडलू आहे ,दोन काषाय वस्त्रे धारण केली आहेत .
हे सर्व झाले छाटी आणि कौपीन बद्दल पण सप्तशती गुरुचरित्रात थोरल्या महाराजांनी दत्त महाराजांना काय म्हटले आहे ,नमः श्रीदत्त गुरवे हृव्दासोधौतिकारवे ll दत्त महाराज हे हृदयरुपी वस्त्र धुवून स्वच्छ करणारे ----
. लज्जारक्षणार्थ धारण केलेले वस्त्र स्वच्छ आहे अथवा कसे ? यापेक्षा आपले हृदयरुपी वस्त्र स्वच्छ असणे गरजेचे नाही का ??? .श्रीगुरुदेव दत्त !!!---अभय आचार्य #🌹देवी देवता🙏
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 ऑक्टोबर❗
‼️श्री गुरुदेव दत्त‼️
🌹प्रवचनाचा विषय🌹
🟫🟩🟫परनिंदा व विद्येचा अभिमान माणसाला भगवंतापासून दूर नेतात.🟫🟩🟫
⭕परनिंदा करण्यासारखे पाप नाही. निंदेची सवय फार वाईट असते; तिच्यामुळे आपले स्वतःचेच नुकसान होते.⭕
🌀दुसर्याला दुःख व्हावे म्हणून माणूस परनिंदा करतो, पण ती ऐकायला तो हजरच कुठे असतो❓म्हणजे मग आपण यात काय साधले❓निंदेमुळे आपलेच मन दूषित होते. दूषित मन किंवा दुष्कर्म हे माणसाला परनिंदेला प्रवृत्त करते.🌀
⭕️ज्याला परनिंदा गोड वाटते, त्याने समजावे की आपल्याला भगवंत अजून फार दूर राहिला आहे.⭕️
💮तिखट तिखटाप्रमाणे लागू लागणे ही जशी सापाचे विष उतरल्याची खूण आहे, त्याचप्रमाणे परनिंदा गोड वाटेनाशी झाली की देव जवळ येत चालला असे समजावे. म्हणून, ज्याला स्वतःचे हित करून घ्यायचे असेल त्याने परनिंदा सोडून द्यावी आणि जिव्हा नामाला वाहावी.💮
🏵भगवंताच्या मार्गाने जाणार्याने, दुसर्याच्या ठिकाणी दिसणार्या दोषांचे बीज आपल्यामध्ये आहे हे ध्यानात ठेवून वागावे, आणि अवगुणाचे तण आपल्या अंतःकरणातून काढून टाकून तिथे भगवंताच्या नामाचे बीज पेरावे.🏵
♦पुष्कळ वेळा आपले दोष आपल्याला कळतात, ते भगवंताचा आड येतात हे देखील कळते, पण त्याला आपला इलाज नसतो. उदाहरणार्थ, काही लोकांची दृष्टी फारच बाधक असते. एखादी चांगली वस्तू किंवा गोष्ट त्यांनी बघितली की ती बिघडते. असे दोष पुष्कळ वेळा ज्याचे त्याला सुधारता येत नाहीत. पण सत्संगती जर लाभली तर मात्र असले दोषदेखील सुधारतात. हाच संतांच्या संगतीचा महिमा आहे.♦
❄मनुष्य स्वभावतः आपले दोष वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे त्याचे जीवन सुखमय होत नाही. तो दुसर्याला त्याचा दोष दाखवून देईल, पण त्याला स्वतःला आपला दोष कळणार नाही.❄
🔸️विद्या ही बरेच वेळा मनुष्याला भगवंतापासून दूर नेते. वारकरी पंथातले अडाणी लोक 'विठ्ठल विठ्ठल' म्हणता म्हणता भगवंताला ओळखतात, पण शहाणे लोक परमार्थाची पुस्तके वाचूनही त्याला ओळखीत नाहीत.🔸️
🔹️घरात बदाम आणि खारका यांची पोती भरून ठेवली, तरी ते पदार्थ जोपर्यंत हाडामांसात जाऊन रक्तांत मिसळत नाहीत तोपर्यंत त्यांचा उपयोग नाही. त्याचप्रमाणे, पुस्तकीज्ञानाचे पर्यवसान आचरणात झाले नाही तर ते व्यर्थ जाते.🔹️
💢भगवंताकरिता कुणीही कष्ट करून नका; कष्टाने साध्य होणारी ती वस्तू नव्हे. ती वस्तू सात्त्विक प्रेमाने साध्य होणारी आहे; आणि प्रेमामध्ये झालेले कष्ट मनुष्य चटकन विसरून जातो.💢
🛟तुम्ही भगवंताच्या प्रेमाने अगदी भरून जा, आपापसांत प्रेम वाढवा, म्हणजे मग सर्व जग आनंदमय, प्रेममय दिसू लागेल, आणि शेवटी तुम्हाला स्वतःचा विसर पडेल.🛟
🌷#बोधवचन :निंदा ही आपल्या साधनाची होळी करते.🌷
🌲#प्रवचने :श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज🌲
🚩🚩श्री राम जय राम जय जय राम🚩🚩
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 प्रभाव अत्यंत सूक्ष्म रितीने काम करीत असतो. ह्या सत्याची जाणिव होऊन जीवाने सदैव सत्कर्मच करावे. दुष्कर्मच कधीही करू नये. मानव आपण केलेल्या पापपुण्याचे गाठोडे घेऊन जन्मजन्मांतराच्या कर्म प्रवाहात वाहत जात असतो. मरतेवेळी ज्या संकल्पाने प्राणत्याग होतो त्याला अनुसरून त्याला दुसरा जन्म मिळतो. या जगातील लोकांनी संकल्प रूपाने पापकर्म केल्यास पापांचे फळच प्राप्त होते. संकल्पाने पुण्यकर्म केल्यास पुण्यकर्माचे फळ प्राप्त होते.
ज्या ठिकाणी त्यांचे नामस्मरण, भजन, किर्तन होते, त्या ठिकाणी श्रीपाद प्रभू सूक्ष्म रूपाने संचरण करीत असतात, हे अक्षर सत्य आहे. भाजलेल्या बीजांचे पुनरंकुरित न होणे हा सृष्टीचा धर्म आहे. भाजलेल्या बीजांना पुनरंकुरित करणे हे सृष्टिकर्त्याचे शक्तिसामर्थ्य आहे.
मी दत्त आहे. कोट्यानुकोटी ब्रह्मांडात व्याप्त असलेले एकमेव तत्वमीच आहे. दिग हेच वस्त्र म्हणून दिगंबर आहे. जे कोणी त्रिकरणशुध्दीने दत्त दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा नरसिंहसरस्वती दिगंबरा म्हणून भजन, कीर्तन करतात येथे मी सूक्ष्म रूपाने असतो.
सत्पुरूषांस, योगीयास दान-धर्म केल्याने, दैवी कृपेमुळे पाप कर्मांचा क्षय होतो. देवतामूर्ती पुण्यस्वरूप असून त्यांच्या ठाई करूणा असल्या कारणाने आपले पाप कर्मफल त्यांच्याकडे ओढून घेतात व त्यांचे पुण्य आपणास देतात.
अवतारी पुरूष जन्माला यायचे म्हणजे त्या वंशात पूर्वीच्या ऎंशी पिढ्यांनी पुण्य संचय केलेला असतो. तसेच अवतारी पुरूषाचे गुरू होणा-या व्यक्तिचा वंश परम पवित्र पुण्यवान असावा लागतो. या सृष्टीमध्ये प्रत्येकजण हा सेवकच असतो. मी जेव्हा प्रसन्न होतो तेव्हा त्या सेवकाला सेवेचे जास्ती फळ प्रदान करतो. परंतु अप्रसन्न झाल्यास सेवेचे कमी फळ देतो.
ब्रह्मदेवाने लिहिलेल्या प्रारब्धास कोणी बदलू शकत नाहीत. परंतु श्रीदत्त प्रभूंच्या भक्तांसाठी मात्र श्रीदत्त ब्रह्मदेवाला आदेश देऊ शकतात.
श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो🙏💐🌸
श्रीपाद श्रीवल्लभ चरणी कोटी कोटी नमन🙏💐🌸
#🌹देवी देवता🙏
एकदा भगवान विष्णूंनी ठरविले की, आज जो जे मागेल ते त्याला द्यायचे. सर्वांच्या इच्छा पूर्ण करावयाच्या. सर्व याचक एका ओळीत उभे राहून आपली पाळी आली की आपल्याला हवे ते मागून घेत होते. कोणी धन, कोणी संतान, कोणी स्वास्थ्य तर कोणी वैभव मागत होते.
विष्णू दोन्ही हातांनी भरभरून देत होते. लक्ष्मीने पाहिले की, हळूहळू विष्णूचे भांडार रिकामे होत चालले आहे. तेव्हा विष्णूचा हात धरत ती म्हणाली, अशा रीतीने देत राहिलात तर वैकुंठाचे सर्व वैभव काही क्षणातच नाहीसे होईल. मग आपण काय करायचे?
सस्मित चेहर्याने विष्णूंनी उत्तर दिले, 'तू अजिबात चिंता करू नकोस. मजजवळ अजून एक संपत्ती सुरक्षित आहे. ती मानव, गंधर्व, किन्नर या पैकी कोणीच अजून मागितलेली नाही. ती संपत्ती जोपर्यंत आपल्याजवळ आहे तोपर्यंत तू दुसरे काहीही द्यावे लागले तरी काळजी करू नकोस.'
लक्ष्मीने विचारले, 'सांगा बघू अशी कोणती अजब गोष्ट आपल्याजवळ आहे. माझ्या तर काही लक्षात येत नाही.' विष्णू म्हणाले, 'तिचं नाव आहे शांती' जर मनःशांती नसेल तर विश्वातील सारी संपत्ती जरी माणसाला प्राप्त झाली तरी ती आपत्तीच ठरते. म्हणून मी शांती सांभाळून ठेवली आहे.
Facebook साभार
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 गेलो आणि देवासमोर जाताच मांडी ठोकून बसलो . काढली वही बॅगेतून . बापू म्हणाले ,अहो आचार्य ,काय करताय ? म्हणालो अहो ,मला येताना दोनशे चौतीस जणांनी सांगितले आहे कि आमचा नमस्कार सांगा . मी सांगतोय महाराजांना . वाचता वाचता दम लागला इतकी नाव होती ,बापूंसहित अनेकांनी हे पाहून डोक्याला हात लावला . प्रसादालयात गेलो आणि ताट समोर ठेवताच हाती फोन घेतला ,समोरच्या रांगेतील काही जण, हा काय प्रकार ? या आविर्भावात पाहू लागले . त्यांना उद्देशून म्हणालो ,अहो प्रसादाच्या ताटाचा फोटो फेसबुकवर पाठवायचा आहे . तसं शास्त्र असत . दोनदा रांग लाऊन तट्ट होत मी बाहेर आलो .
तितक्यात एक प्रसिद्ध व्यक्ती मला दिसली ,धावत जाऊन त्यांना गाठले आणि बकोटी पकडून म्हणालो दादा ,एक सेल्फी ,प्लिज नाही म्हणू नका . अगदी नाईलाजाने त्यांनी हो म्हटले . सेल्फी काढताना म्हणालो ,अहो दोन बोटं दाखवा कि ,त्यांनी विचारले का हो ? यावर मी म्हणालो ,शास्त्र असतंय तस ,अगदी वैतागून त्यांनी बोटे दाखवली आणि कृतकृत्य होत मी सेल्फी घेतली .
जरा घाटावर विसावलो तो समोर एक बोट दिसली ,तिथे फलक होता --नौका विहार . म्हटलं ,फोटो तो बनता हि है l पायऱ्या उतरून पुढे जात मी दोघांना पकडत म्हणालो ,मी बोटीत बसताना एक फोटो काढा . हे ऐकून नौका हाकणारा मनुष्य म्हणाला ,अहो ,एव्हढ्यात नाही जाणार . मी म्हणालो मला जायचं नाहीये ,फक्त बोटीत टेकतांना फोटो हावाय .--- काय माणसं असतात ? अशा आविर्भावात त्याने पाहिलं मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करत मी फोटोसेशन उरकले .
आसपास काय काय प्रसिद्ध आहे ? पुजारी काकांना विचारताच ते म्हणाले ,अरे वाह ,अहो आचार्य या खेपेस दौरा मोठा दिसतोय ,त्यांना थांबवत म्हणालो ,अहो काका ,मला फक्त माहिती द्यायची आहे ,मी उद्या लगेच निघणार आहे . एक छान पोस्ट तयार होत असल्याच्या आनंदात मी निद्राधीन झालो . उद्या सकाळी माझी पोस्ट पहालच ,लाईक करायला विसरू नका ---श्रीगुरुदेव दत्त !!!---अभय आचार्य
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 हि अलर्काची आई .अलर्काला राज्याभिषेक झाल्यावर आई वानप्रस्थात चालल्याचे पाहून अलर्काला फार वाईट वाटले . हे पाहून मदालसा म्हणाली ,सदा एकत्र सहवास l न घडे नित्य जीवास l कर्माधीन खास l असे निवास जाण बा ll अलर्का अरे कायम एकत्र राहणे शक्य नाही ,आपापल्या कर्माप्रमाणे जाणे येणे होत असते . मात्र निघताना मदालसेने अलर्काला भविष्याबाबत सावध केले आणि वानप्रस्थाला जाताना तिने अलर्काला एक बंदिस्त पेटी@ दिली ,जाताना ती म्हणाली अलर्का, धर्माने राज्य करून पुत्राप्रमाणे प्रजेचे पालन कर . सहासष्ठ हजार वर्षे राज्य केल्यावर तुझ्यावर शत्रूचे आक्रमण होईल त्यावेळी हे पेटीतील लिखित काढून वाच . ते वाचून त्याप्रमाणे आचरण केल्यास शत्रू मित्र होतील आणि साम्राज्य मिळून सुखी होशील .
पुढे आईने सांगितल्याप्रमाणे सहासष्ठ हजार वर्षांनंतर शत्रूचे आक्रमण झाले आणि राजधानी शत्रू हाती गेल्यावर अत्यंत दुःखाने रात्री अलर्क घोड्यावर बसून निघून गेला . त्या वेळी त्याला आईने दिलेल्या पेटीची आणि भविष्य सांगितल्याची आठवण झाली . आपल्या आईला आपला भविष्यकाळ माहीत होता हे पाहून त्याला अत्यंत आश्चर्य वाटले . प्रातःकाळी ती पेटी काढून त्याचे पूजन करून आत पाहताच त्यात एक लिखित होते आणि त्यावर दोन श्लोक लिहिले होते .
त्याज्यः सर्वात्मना संगः स चेत्त्यक्तुं न शक्यते ll सद्भिः सह स कर्तव्यः संतो दुःसंगभेषजम् ll
कामः सर्वात्मना हेयो हातुं चेच्छक्यते न सः ll मुमुक्षां प्रति कर्तव्यः सैव कामार्तिभेषजम् ll
याचा अर्थ थोरल्या महाराजांनी असा सांगितला आहे ,
संग सोडावा सर्वथा l हे न घडे तत्त्वता l तरी साधूचा संग धरीता l भवव्यथा नासेल ll
टाकावा सर्वथा काम l हे न करवे जरी काम l मुमुक्षेचा करावा काम l मिळेल धाम अनायासे ll
कोणाचाही संग करू नये मात्र हे न जमल्यास साधूचा संग करावा ,पुढील श्लोकात काम हा शब्द इच्छा किंवा आशा या अर्थी वापरला आहे . कशाचीही इच्छा असू नये मात्र हे न जमल्यास मुमुक्षेची इच्छा करावी ,मुमुक्षेची इच्छा म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटावे हि तळमळीची इच्छा .
मदालसा हि भगवान महादेवांच्या आशीर्वादाने पुन्हा त्याच देहाने अवतरली होती आणि यामागे नागदेवतांचे मागणे होते , व्हावी योगिनी योगमाता ll तेव्हा मदालसेने असा उपदेश केल्यास आश्चर्य वाटावयास नको .पुढे एका आश्रमात जाऊन अलर्क विचारू लागला इथे संत कोठे आहेत ? तेव्हा त्या आश्रमातील ऋषींनी अलर्काला माहूर इथे जायला सांगितले . तिथे शिखरावर दत्त महाराज आहेत आणि त्यांचा महिमा असा आहे कि दर्शनाने भवसागर नष्ट होतो . हे ऐकून अलर्काला आनंद झाला आणि त्याने माहूर येथे प्रस्थान केले . पुढे दत्त महाराज त्याला भेटले आणि त्यांची त्याच्यावर पूर्ण कृपा झाली अशी कथा आहे . श्री गुरुदेव दत्त !!! --- अभय आचार्य
@(चपटी डबी .पेटी हा शब्द थोरल्या महाराजांनी दत्त माहात्म्यात वापरला आहे. )
❗१५ ऑक्टोबर❗
‼️श्री गुरुदेव दत्त ‼
🌹प्रवचनाचा विषय🌹
🟪🟥🟪लीन माणसाला भगवंत लवकर साधेल.🟪🟥🟪
🔸️नामस्मरण करायचे ते अभिमान टाकून करीत जावे. परमेश्वराला अनन्यशरण जाऊनच त्याचे नाम घेत जावे. पुष्कळ वेळा, आपण साधन करू लागलो म्हणजे आपल्याला अभिमान चढू लागतो, आणि त्यामुळे साधन व्यर्थ होते.🔸️
🔹️संताकडे जाताना आपण मनामध्ये काही एक बरोबर घेऊन जाऊ नये; किंवा काही नेलेच तर भगवंताचे प्रेम न्यावे.🔹️
💠आपण प्रपंचाचे प्रेम आणि अभिमान बरोबर घेऊन जातो आणि मग,एकावर एक लिहिलेले जसे वाचता येत नाही तशी अवस्था होते.💠
❄एखादी वस्तू आपल्याला हवी असे वाटल्यावर आपण तिच्या प्राप्तीविषयी विचार करू लागतो. म्हणूनच पहिल्याने, भगवंत हवा असे आपल्याला वाटले पाहिजे. त्यानंतर त्याच्या प्राप्तीच्या साधनांचा अभ्यास करायला पाहिजे. हा अभ्यास मनाच्या कष्टाचा आहे.❄
💮 क्रोधाला बाहेर येऊ देण्यापेक्षा, क्रोध गिळणे यात जास्त श्रम आहेत. असे करण्यामध्ये आज कष्ट आहेत हे खरे, पण पुढे मात्र सुख आहे हे निश्चित.💮
🛟वागण्यात आणि चालण्यात आपण सावधगिरी बाळगावी; नको ते टाळावे.🛟
🏵अनन्यतेला पैसा लागत नाही, विद्या लागत नाही; त्याला फक्त आपली अभिमानवृत्ती बाजूला ठेवावी लागते. भगवंताचे होण्यासाठी अंगी लीनता आलीच पाहिजे. लीन माणसाला भगवंत लवकर साधेल. लीनतेमध्ये बाकीचा विसर पडून भगवंत तेवढा शिल्लक राहतो.🏵
♦जो वृत्तीने लहान आहे त्याला भगवंत लवकर वश होतो. मनुष्य मोठा असून लहानासारखा वागला तर ते फार चांगले असते. मनाने मात्र आपण बळकट बनले पाहिजे.♦
🪞आपण स्वतःशी चोवीस तास उघडा व्यवहार करावा. भगवंताने आपल्याला केव्हाही जरी पाहिले तरी आपल्याला लाज वाटता कामा नये.🪞
⭕आपले वागणे असे असावे की भगवंताची आस मनामध्ये वाढत जाऊन, तिचे पर्यवसान ध्यासामध्ये व्हावे. रात्री जे स्वप्न पडावेसे वाटते ते दिवसभर करावे. यासाठी आपली वृत्ती नामामध्ये गुंतवून ठेवावी.⭕
💢'असावे सर्वांत पण नसावे कोणाचे' अशा वृत्तीने जो राहील त्याला लवकर परमार्थ साधेल. देहाच्या उपचारांना जो भुलतो तो भगवंताला अगदी विसरलेला असतो. पण ज्याचे अनुसंधान मजबूत असते त्याला जगातल्या ऐश्वर्याची किंमत नसते.💢
🌀पैशाची वासना आणि लौकिकाची लालसा माणसाल भगवंतापासून दूर नेतात. त्यांच्या तावडीत सापडता कामा नये.🌀
🔷लोकेषणा आणि धनेच्छा या दोन्ही गोष्टींचा संबंध प्रपंचात वावरत असताना येणारच. तो टाळता येणे कठीण आहे. पण ज्याला भगवंताचे प्रेम पाहिजे आहे त्याने त्यांचा गुणधर्म ओळखून त्यांना वापरावे, म्हणजे त्यांच्यापासून उत्पन्न होणारे दोष त्याला बाधणार नाहीत.🔷
🌲#बोधवचन 🌲
अभिमानरहित जावे रामाला शरण ।
त्यानेच राम आपला होईल जाण ॥
🌷#प्रवचने:श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज🌷
🍁श्री राम जय राम जय जय राम🍁 #🙏श्री गुरुदेव दत्त💐