Ashish
ShareChat
click to see wallet page
@harshaish
harshaish
Ashish
@harshaish
💓💛💓💛
1) एक मुलाने २० वर्षानंतर त्याच्या एका मित्राला मर्सिडीज चालवताना पाहिलं. त्याला स्वतःबद्दल खुप वाईट वाटलं, की तो आयुष्यात नापास झाला आहे. पण त्याला हे माहित नव्हतं की तो मित्र त्या गाडीवर ड्रायव्हर होता व तो त्याच्या बॉस ला घ्यायला निघाला होता. 2) एक स्त्री तिच्या नवऱ्यावर नाराज होती की तो अजिबात रोमॅन्टिक नाही, त्याने गाडीतून उतरताना तिच्यासाठी दरवाजा उघडावा जसा तिच्या मैत्रीणीचा नवरा उघडतो. पण तिला हे माहीत नव्हतं की मैत्रीणीच्या गाडीचा दरवाजा खराब आहे व तो फक्त बाहेरूनच उघडला जातो. 3) एक व्यक्ती शेजारील घरातील तीन मुले खेळताना बघून नाराज होत होता की त्याला फक्त एकच मुलगा आहे. पण त्याला हे माहीत नव्हतं की त्या तीन मुलांपैकी एक दुर्धर रोगाने आजारी आहे व बाकीची दोन मुले दत्तक घेतलेली आहेत. आयुष्यात प्रत्येक गोष्ट एकाच तराजूत मोजली नाही जाऊ शकत. म्हणून बाकीच्या लोकांकडे बघून तुमच्या आयुष्याबद्दल तक्रार करू नका. कारण तुम्हास हे माहीत नसेल की इतरांपेक्षा तुम्हीच जास्त नशीबवान असू शकता. तुम्ही जसे आहात तसेच आयुष्य मजेत घालवा कारण तुमच्याकडे फक्त एकच आयुष्य आहे. आनंद हा *माझ्याकडे सर्वकाही आहे* यातून येत नसून, *माझ्याकडे जे आहे त्यातून सर्वोत्तम काय मिळेल* यामध्ये आहे...😊 #☺️सकारात्मक विचार #💭माझे विचार #🙂Motivation
भुसावळ–मुंबई पॅसेंजर : एक युग संपलं, पण आठवणी कायम रेल्वे हा भारतीय जनतेच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. गाड्या म्हणजे फक्त लोखंडी डबे नाहीत, तर त्या असतात माणसांच्या भावना, स्वप्नं आणि आठवणींचे वाहक. अशीच एक गाडी होती – भुसावळ–मुंबई पॅसेंजर. आज ही गाडी धावणे थांबली असली, तरी खानदेशातील असंख्य लोकांच्या जीवनात ती कायम जिवंत आहे. --- खान्देश ते मुंबईचा दुवा भुसावळ, जलगाव, चोपडा, फैजपूर, धुळे या भागातील हजारो लोकांना कामानिमित्त, नोकरीनिमित्त किंवा नातेवाईकांकडे जायचं असेल तर सर्वात प्रथम आठवण यायची ती या पॅसेंजरची. सकाळी लवकर भुसावळवरून निघून ही गाडी मुंबईकडे रवाना व्हायची. प्रत्येक स्टेशनवर थांबत ती प्रवाशांना उचलत नेई. नाशिकसारख्या ठिकाणी काम असलं, तरीही लोक हीच गाडी पकडायचे. स्वस्त तिकीट, दररोज धावणारी सेवा आणि सुरक्षित प्रवास या सगळ्यांमुळे ही गाडी म्हणजे सामान्य माणसासाठी वरदान होती. --- प्रवासाची मजा – आठवणींची शिदोरी आज वेगवान एक्सप्रेस आणि बुलेट ट्रेनबद्दल बोललं जातं, पण भुसावळ–मुंबई पॅसेंजरच्या प्रवासातला आनंद वेगळाच होता. १२ तासांचा प्रवास असूनही कधी कंटाळा येत नसे. प्रवासासाठी घरातून पोळ्या–भाजी, भाकरी–थालिपीठ, भजी, लाडू घेऊन जायची तयारी असायची. प्रत्येक स्टेशनवर चहा–भजी, कचोरी, शेंगदाणे घेणं हा अनुभव वेगळाच होता. गाडीत चढणारे–उतरनारे नवे प्रवासी म्हणजे नवी मैफिल. “कुठून आलात? मुंबईत काय करता? कामधंदा कसा आहे?” अशा गप्पा रंगायच्या. मोबाईल नव्हते, टीव्ही नव्हता, पण हसरे चेहरे आणि दिलखुलास संवाद यामुळे प्रवास उत्साहात जायचा. --- बालपणीची धडपड लहानपणी घरात मुंबईला जाण्याची बातमी झाली की आनंद साजरा व्हायचा. लवकर उठून स्टेशनवर जाण्याची धावपळ व्हायची. हातातल्या पिशवीत खाण्याचे डबे, पाण्याच्या बाटल्या आणि बरोबर उत्साह घेऊन प्रवास सुरू व्हायचा. खिडकीजवळ बसण्यासाठी मुलांचा झगडा, बाहेर दिसणाऱ्या डोंगर–नद्या–गावं पाहण्याचा आनंद— ही पॅसेंजर म्हणजे बालपणीच्या सुट्टीसारखी गोड आठवण होती. --- माणुसकीची शिदोरी या गाडीत प्रवास करताना एक गोष्ट नेहमी जाणवायची—माणुसकीची उब. कुणाकडे खाऊ कमी पडला तर शेजारी आपला डबा पुढे करायचे. पाणी संपलं तर दुसरा बाटली पुढे करायचा. ओळख नसली तरी प्रवास संपेपर्यंत नवी मैत्री व्हायची. या पॅसेंजरने खानदेशातील अनेक कुटुंबांना जोडून ठेवलं. --- आज फक्त आठवण काळ बदलला. लोक एक्सप्रेस, सुपरफास्ट, विमान अशा झपाट्याच्या साधनांचा वापर करू लागले. गावोगावी थांबणारी, हळूहळू प्रवास घडवणारी पॅसेंजर थांबली. आज ती गाडी चालत नाही. पण जेव्हा जुने स्टेशन दिसतात, रेल्वेची शिट्टी कानावर येते, तेव्हा भुसावळ–मुंबई पॅसेंजरची आठवण हळवी करून जाते. --- शेवटचं पान भुसावळ–मुंबई पॅसेंजर ही फक्त एक गाडी नव्हती. ती होती— खानदेशाच्या लोकांचा प्रवास साथीदार स्वप्नांच्या मुंबईकडे नेणारा पूल कुटुंबाच्या आनंदाचा भाग आणि आठवणींचा खजिना आज ती थांबली असली, तरी आठवणींच्या रेल्वेत ती अजूनही धावत आहे… 🚂♥️🌹 #🎑जीवन प्रवास #प्रवास #आमची #आमची पेसेंजर पॅसेंजर
🎑जीवन प्रवास - सतासोगारऊी S7 513761 5//54 5153 भुसावल+ मुँब्ड मुसावदू CC.4.T. सतासोगारऊी S7 513761 5//54 5153 भुसावल+ मुँब्ड मुसावदू CC.4.T. - ShareChat
4,85,56,75,90,000.00/- ₹ चार ट्रिलीयनची मालमत्ता असलेल्या राकेश झुनझुनवाला (बिगबुल/स्टॉक व्यापारी) यांच्या निधनापूर्वीचे शेवटचे शब्द..... * मी व्यवसाय विश्वातील यशाचे शिखर गाठले आहे. माझे आयुष्य हे दुसऱ्याच्या नजरेत मिळणारे कर्तुत्व आहे. मात्र मला कामाशिवाय दुसरे सुख नव्हते. पैसा हेच सत्य आहे मी वापरतो. सध्या हॉस्पिटलच्या बेडवर पडून आयुष्यभर आठवून लक्षात येते की ओळख कशाचा अभिमान वाटला आणि पैसा खोटारडा झाला मरेपर्यंत. तुम्ही तुमची कार चालवण्यासाठी किंवा पैसे कमवण्यासाठी कुणालातरी भाड्याने घेऊ शकता. पण, तुम्ही कोणालाही त्रास सहन करण्यासाठी आणि मरण्यासाठी कामावर घेऊ शकत नाही. हरवलेल्या भौतिक वस्तू सापडतील. पण एक गोष्ट आहे, जी हरवल्यावर कधीच सापडत नाही - आणि ती म्हणजे "आयुष्य". आपण आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर असलो तरी काळानुसार ज्या दिवशी हृदय थांबेल त्या दिवसाचा सामना करावा लागतो. प्रेम करा आपल्या परिवारावर, जीवनसाथीवर आणि मित्रांवर... त्यांना चांगले वागवा, फसवू नका, बेईमानी किंवा विश्वासघात करू नका. जस जसजसे वयस्कर होत जातो आणि जसजसे शहाणे होत जातो, आपल्याला हळूहळू लक्षात येते की 300 रुपये किंवा 3000 रुपये किंवा 2-4 लाख रुपये ची घड्याळ घातलेली प्रत्येक गोष्ट एकाच वेळी प्रतिबिंबीत आपल्याकडे 100 किंवा 500 ची पर्स असो - आतमध्ये सगळं सारखंच आहे. आपण 5 लाखाची गाडी चालवू किंवा 50 लाखाची गाडी चालवू. मार्ग आणि अंतर एकच असतात आणि आपण त्याच गंतव्ये गाठतो. आपण ज्या घरात राहतो ते 300 sq फूट असो किंवा 3000 sq फूट - एकांत सर्वत्र एकच आहे. तुम्हाला लक्षात येईल की तुमचा खरा आंतरिक आनंद या जगाच्या भौतिक गोष्टीतून मिळत नाही. तुम्ही फर्स्ट क्लास किंवा इकोनॉमी क्लास उडाल, विमान कोसळलं तर बरोबर खाली जाल. म्हणून तर.. मला आशा आहे की तुम्हाला लक्षात येईल की, तुमचे मित्र, भाऊ आणि बहिणी आहेत, ज्यांच्याशी तुम्ही बोलता, हसता, गाता, चढ-उतारांबद्दल बोलता... हा खरा आनंद आहे !! जीवनाचे एक निर्विवाद सत्य : आपल्या मुलांना फक्त श्रीमंत होण्यासाठी शिकवू नका. त्यांना आनंदी राहायला शिकवा. मोठे झाल्यावर त्यांना किंमत कळते, किंमत नाही. आयुष्य म्हणजे काय❓ आयुष्य चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तीन जागा आहेत: - हॉस्पिटल - जेल - स्मशानभूमी आरोग्यापेक्षा चांगलं काहीच नाही हे हॉस्पिटलमध्ये समजेल. तुरुंगातून कळेल स्वातंत्र्य किती मौल्यवान आहे. आणि स्मशानभूमीत आयुष्य काही नाही हे लक्षात येईल. आज आपण ज्या जमिनीवर चालतो उद्या आपली नसणार. चला यापुढे नम्र होऊया आणि आपल्याला जे मिळाले त्याबद्दल आपल्या आई-वडिलांचे आभार मानूया. #🙂Motivation #🎑जीवन प्रवास #☺️सकारात्मक विचार #आयुष्य
🙂Motivation - ShareChat
मार्मिक प्रश्न! “योनी” ही केवळ समाधान देण्याचा अवयव नाही तर आनंदाच्या परमोच्च उत्कटतेची देवाणघेवाण करण्याचे एकाकडचे जैविक साधन आहे. मात्र “शिश्नालाच आनंद मिळतो, मला काहीच फायदा नाही” असे म्हणून वैवाहिक लैंगिकतेला देखिल आता आत्मकेंद्रित महिलांद्वारे पुरुषांवर उपकार केल्यासारखे दर्शवण्यात येते. दुर्दैवाची बाब म्हणजे अशा नात्यात अडकलेल्या - तारण झालेल्या विवाहीत पुरुषांची भयंकर अवस्था झाली आहे - लैंगिक सुखाची मागणीच नव्हे तर नुसती अपेक्षा जरी व्यक्त केली तरी “तुम्ही इंद्रियदमण शिकला नाहीत” हे आत्मिक ज्ञान ऐकवण्यात येते, अन त्या सुखाशिवाय राहणे म्हणजे “व्यभिचार व इतर मानसिक आजारांना आमंत्रण देणे होय! मंडळीच्या पाळकाकडे तक्रार केली तर त्यांचे एकच उत्तर, “मी प्रार्थना करतो तुमच्यासाठी” कारण पाळक देखिल पुरुष आहेत, त्यांना देखिल यातून सुटका - शेवटी घरोघरी मातीच्या चुली! बरं सासूला सांगितलं तर, “ लेकरं झालींत ना, आता काय गरज आहे?” “तो काय खाऊचा डब्बा आहे का? पाहीजे तेव्हा उघडला व खाल्ला?” असा प्रतिसाद! पुरुषांचे पुरुषत्व नष्ट करणे हेच ध्येय अनेक आत्मकेंद्रीत स्त्रिया सध्या बाळगत आहेत. मंडळीची उपासना व उपदेश, प्रवचने ही केवळ महीला व मुले यांच्यावरच भर देत आहे. पुरुषांच्या आत्मिक संगोपणासाठीच बोलतात मात्र त्यांच्या भावनिक गरजांसाठी व शारीरिक इच्छांसाठी तेथे तोडके उपाय राबवण्यात येत आहेत. तारण पावलेले ख्रिस्ती पुरुष विवाहीत नपुंसक तयार होत आहेत. म्हणून अनेक पुरुष व्यसनाधीन होतात तर काही वर्कोहोलीक होतात तर काहीच निराशेत जगतात. त्यमुळे व्यभिचार, मानसिक विकार, वाद टाळण्यासाठी मंडळीतील वयोवृद्ध स्त्रियांवरच जबाबदारी देण्यात आली आहे. तरुणींनी आपल्या नवऱ्यावर कशी “प्रीती” करावी हे त्यांनीच - वृद्ध महीलानीच - विवाहीत तरुणींना शिकवावे अशी आज्ञा पौलाने तिमथ्याला पवित्र शास्त्रात दिली ती यासाठीच! सध्या केवळ पवित्र शास्त्र वाचन वाढले आहे, ज्ञान वाढले आहे. सर्व ॲक्टीव्हीटी चर्च केंद्रीत झाली आहे आता ती कुटुंब केंद्रित व्हावी हे महत्त्वाचे आहे. कुटुंबाचा प्रमुख-सेवक पुरुष आहे. त्याने त्याची जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी यासाठी त्याच्या आंतरीक गरजांची अवहेलना सबबींच्या नावाखाली देणे बंद व्हावे. तारुण्याचा पुरेपूर आनंद दोघांनी सोबत घ्यावा. मनमुराद द्यावा व घ्यावा. “लेकरं झालीत आता काय गरज?” असे म्हणून त्यांचे पुरुषत्व नियंत्रित करण्याची जबरदस्ती करण्यात येवू नये. जेव्हा तुम्हाला एखादा आजार, व्याधी व शारीरिक थकवा येतो तेव्हा पुरुष देखील स्वतः तुम्हाला शांत वाटेल, विसावा घेता येईल अशी तुमची सेवा प्रेमाने करतातच ना? मग तुम्ही आठवड्यातून एक दिवस - दोव दिवस - योजना करुन वैवाहिक लैंगिक जबाबदारी पुर्ण करावी. पुरुष जर लिंगपिसाट असता तर त्याने रु २०० ते रु १००० मध्ये “भाड्याची योनी” द्वारे आपली गरज भागवली असती. तुमच्यावर प्रेम करुन पुर्ण कुटुंबाची जबाबदारी डोक्यावर घेत पुरुषांनी आपले आयुष्य व जीवन अवघड केले नसते. मात्र योनी विकत घेणे व त्यातून क्षणिक समाधान मिळणे हा त्यांचा उद्देश नसतो. विवाह करुन, जोडीदाराचा आदर करणे व सहमतीने एकमेकांच्या गरजा पुर्ण करणे हा तारुण्यात आनंद घेता येईल अशी नैसर्गिक देणगी परमेश्वराने दिली आहे. “एकमेकांची वंचना करु नका” असे प्रेषित पौल त्याच्या पत्रातून लिहीतो. तसेच पाॅर्न व्हिडीओ पाहून पत्नीवर तशीच अपेक्षा लादणे, किंवा तसलेच करण्याची मनात इच्छा बाळगणे, ह्या गोष्टी पुरुषांनी टाळल्याने बरे होईल. त्या व्हिडीओत कलाकार असतात, ते नशेत सर्व करतात व अंमली पदार्थाच्या प्रभावात करतात. वेदनाशामक औषधी घेऊन ते शूट करतात. अनेकदा रि-शूट करतात. तेव्हा स्वतःचेच समाधान होईल असे करणे, घाई-घाईने, गडबडीने करणे हे टाळावे. सहमती, तयारी व वैयक्तिक वेळ काढणे हे दांपत्याच्या एकता व समाजाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. आपल्या पतीला पाॅर्न व्हिडोओ पाहून हस्तमैथून करणे, परस्त्री सोबत भूक भागवणे, वैश्यागमन किंवा पुरुषत्व गुंडाळून नपुंसकासारखे दमन करत जीवन जगणारे विकारग्रस्त नामर्द बनू देवू नका. त्यात तुमचे व तुमच्या मुलांचे खुप नुकसान आहे. पुरुषांना तुमच्या योनीपेक्षा जास्त आवड तुमच्या वक्षस्थळांविषयी असते म्हणजेच तुमच्या प्रेमळ मिठीची असते. सर्वप्रथम सन्मान-आदर, आपुलकी, जिव्हाळा, प्रेम आणि मग शेवटी स्पर्श असा क्रम असला तरीही पुरुषांना काहीच हरकत नाही. प्रेम व स्पर्श कमी असला तरीही सन्मान पुर्ण असला की पुरुष जग जिंकून दाखवतो. तुमच्याशिवाय इतर कोणालाही तुमच्या नवऱ्याचा अपमान करण्याची धमक नाही. तो त्याचे थोबाड फोडून काढेल. मात्र तुमच्यावर तो हात उचलू इच्छित नाही. तेव्हा जास्त रुसून बसू नका, खूप शक्ती तुम्हाला मनवण्यातच गेली तर अनेक युद्धे जिंकणे अवघड होते. #💭माझे विचार #🙂Motivation
( मन प्रफुल्लित करणारा लेख...) *....त्या शिवाय " पोरगी दाखवायचा कार्यक्रम " होऊच शकत नव्हता !* 🙄 🫣 🤓 🤫 🥰 आमच्या लहानपणी इंग्रजीचं फॅड अजिबातच नव्हतं! ABCD ....... XYZ याचा संबंध फक्त शाळेत गेल्यावर, ते ही इंग्रजीच्या तासालाच! आणि आता ABP माझा, CID, MRI, X-ray, Blood, Star TV, Z-TV विचारूच नका . आमच्या लहानपणी , *This is Gopal. आणि That is Seeta .* ही दोन वाक्य पाचवीत गेल्यावर वाचता यायचे तरी घरी जबरदस्त कौतुक व्हायचं! आई लाडानं जवळ घ्यायची आणि मायेनं मुका घ्यायची. आई लेकराकडे इतक्या कौतुकाने पहायची की, त्या पोराला एकदम कंडक्टर झाल्या सारखंच वाटायचं ! अहो कंडक्टर याच्यामुळे की, आमच्या लहानपणी एखाद्या पोराला मोठ्या माणसाने विचारले, हं ss काय रे बाळा, मोठेपणी तू काय होणार? असा प्रश्न विचारला की ते पोट्टं हमखास म्हणायचं: मी मोठेपणी कंडक्टर होणार किंवा पोलीस होणार ! तुम्हाला खोटं वाटेल मॅट्रिकचा निकाल लागल्यावर तुला किती परसेंटेज मिळाले असा प्रश्न कोणीही कुणाला विचारत नव्हतं. फक्त एवढंच विचारायचे .... *पहिल्या झटक्यात पास झालास ना ?* आणि आपण हो म्हणताच अख्ख्या गांवाला आनंद व्हायचा ! म्हणजे पहा सुखाच्या, आनंदाच्या, मोठं होण्याच्या कल्पना किती छोट्या होत्या ! *लक्षात घ्या ज्या ज्या गोष्टीचा विस्तार होतो, त्या त्या गोष्टीतून दुःखच होतं.* तुम्ही बघा पूर्वी.. गाव छोटं, घर छोटं, घरात वस्तू कमी, पगार कमी, त्याच्यामुळे शेवटचा आठवडा हमखास तंगी. उसनंपासनं केल्या शिवाय प्रपंच होऊच शकत नव्हता, *तरीही मजा खूप होती!* *तुम्ही आठवून पहा गल्लीतली एकही बाई किंवा माणूस हिरमुसलेलं किंवा आंबट चेहऱ्याचं नव्हतं !* उसनंपासनं करावंच लागायचं ... साखर, चायपत्ती, गोडेतेल, कणिक, कोथिंबीर, मिरची या गोष्टी गल्लीत एकमेकांना उसन्या मागणे हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्कच होता. त्यामुळे कोणाकडे "हात पसरणे" म्हणजे काहीतरी गैर आहे असं आम्हाला कधी वाटलंच नाही . उलट या गोष्टींची इतकी सवय होती की कोणत्याच गोष्टींचा "कमीपणा" वाटत नव्हता ! डोकं दुखल्यावर *शेजाऱ्याकडे "अमृतांजनचं एक बोट" उसन मागायला सुद्धा* अजिबात लाज वाटली नाही. घरातल्या वडील माणसासाठी १० पैश्याच्या तीन बिड्या किंवा १५ पैशाचा तंबाखूचा पुडा आणतानाही मान कशी ताठ असायची ! कोणतीच गोष्ट कोणापासून लपून रहातही नव्हती आणि तसा प्रयत्नही फारसा कुणी करत नव्हतं ! गल्लीत एखाद्या पोरीला पाहुणे पहायला येणार ही बातमी लपून राहूच शकत नव्हती, कारण शेजाऱ्या-पाजाऱ्या कडून पोह्याच्या प्लेट, चमचे, बेडशीट, तक्के, उषा, दांडी असलेले कप आदी साहित्य मागून आणल्या शिवाय "पोरगी दाखवायचा कार्यक्रम" होऊच शकत नव्हता ! *आणि मित्र हो हीच खरी श्रीमंती होती, ते आत्ता कळतंय !* आणि हल्ली शेजाऱ्याच्या मुलीचं लग्न होऊन जातं तरीही कळत नाही ! जेंव्हा *Status वर* डान्सचा व्हिडीओ येतो तेंव्हा कळतं, अरे लग्न झालं वाटतं ! हे सगळं लिहिण्या मागचा एकच उद्देश आहे. भेटत रहा, बोलत रहा , जाणे-येणे ठेवा, विचारपूस करा .. जेवलास का ? झोपलास का ? काही दुखतंय का ? असे प्रश्न विचारतांना लागलेला मायेचा, काळजीचा, आपुलकीचा कोमल स्वरच जगण्याचं बळ देत असतो ! माणसा शिवाय, गाठीभेटी शिवाय, संवादा शिवाय कांssही खरं नाही ! ------🙏 ^^^^^ 🙏------ मला वाटत वरील गोड आठवणीशी तुम्ही नक्कीच सहमत असाल. काल माझ्या वाचनात एक पुस्तक आलं, त्यात असे लिहिले होते की, जर तुम्ही बालपणीच्या रम्य गोड आठवणी सतत आठवू लागल्या त्यात रममाण होऊ लागलात तर तुमचं वयस्कर होण्याची प्रक्रियेवर परिणाम न होता तुम्ही वयाने कमी दिसू लागता. तरुण दिसू लागता.. *चला तर सुरुवात करू या आणि जाऊ त्या सुंदर जगात भूतकाळात....* #🎑जीवन प्रवास #🙂Positive Thought #💭माझे विचार #🙂माणुसकीच नात #☺️सकारात्मक विचार
दारू… नाव ऐकताच मनात दोन चित्रं उभी राहतात. एकीकडे मित्रांच्या गप्पा, हास्य, आणि तात्पुरती मजा, तर दुसरीकडे घर उध्वस्त करणारी वेदना, अश्रू आणि तुटलेली नाती. सुरुवातीला ती छोट्या आनंदासाठी घेतली जाते. "फक्त थोडीशी," असं म्हणत माणूस स्वतःलाच फसवतो. पण हळूहळू ती सवय बनते, आणि सवयीचं व्यसन. ज्या हातांनी कुटुंबासाठी कष्ट करायचे होते, तेच हात रिकामे ग्लास भरू लागतात. ज्या डोळ्यांत स्वप्नं होती, ते डोळे आता फक्त नशेत बुडून जातात. दारूमुळे शरीराचं नुकसान तर होतंच, पण त्यापेक्षा जास्त नुकसान होतं ते कुटुंबाचं. आई-वडिलांच्या डोळ्यातला विश्वास मरतो, बायकोच्या चेहऱ्यावरचं हास्य हरवतं, मुलांच्या मनातला बापाविषयीचा अभिमान तुटून जातो. घरातला दिवा पेटलेला असतो, पण त्या दिव्याखाली फक्त अंधार असतो. दारू काही क्षणाचा विसर देते, पण कायमचा आनंद हिरावून घेते. ती वेदना दाबते, पण दु:ख दुप्पट करून परत आणते. खरं तर जीवनातली खरी ताकद ही बाटलीत नाही, तर आपल्या मनात आहे. नशा जर करायचीच असेल, तर ती कष्टाची, आपल्या स्वप्नांची, आपल्या मुलांच्या भवितव्याची असावी. आजही अनेक घरी आई देवाला प्रार्थना करते, "माझ्या लेकराच्या बापाला दारूचं व्यसन सुटू दे." कदाचित त्या प्रार्थनेतूनच कुणाचं आयुष्य वाचेल. कारण दारूची खरी बाजू ही आनंदाची नाही, तर वेदनेची आहे. ती कित्येक घरं उद्ध्वस्त करते, नाती तोडते, आणि आयुष्य अंधारात ढकलते. म्हणूनच आज ही नकारात्मक पण सत्य बाजू तुमच्यासमोर शेअर करत आहे.😢 धन्यवाद 🙏 #🙂Motivation #🎑जीवन प्रवास
तळाशी जाता जाता आधी अंगावर लाभलेली कौतुकाची निर्माल्य उतरवून ठेवायची... मग अपेक्षांचा अबीर बुक्का तरंगू द्यायचा... पाण्यावर अलंकाराचे ओझ हलकं करायचं... कालांतराने स्वतःला गोंडस बनवणारे रंगाचे थर विरघळू द्यायचे .... इतरांनी आपल्यावर चढवलेल्या *श्रद्धेच्या पताका* , दैवत्वाची झालर सोडून द्यायची.... आणि त्याच मातीचा भाग व्हायचं जिथून आपण आलो होतो.... पुन्हा एकदा तितकच गोंडस रूप घेऊन येण्यासाठी .... बाप्पा जाता जाता बरच काही शिकवून जातो.. *विसर्जन* 🙏🙏🙏🌸🌼🌸 #गणपती विसर्जन 2025
गणपती विसर्जन 2025 - ShareChat
*सत्य घटना* ********************************** मदत करणाऱ्या व्यक्तीचे नाव वाचून आश्चर्यचकित व्हाल! अहमदाबादच्या व्यापारधंद्याच्या भागातील स्टेट बँकेत श्री. अरूण त्रिवेदी कार्यरत होते. बँकेत साडेदहानंतर व्यापाऱ्यांचे मुनीम भरणा करण्यासाठी येत. रोजचे येणे असल्याने एकमेकांना ओळखत होते. रामशंकर नावाचे एक मुनीम होते. मितभाषी! एक दिवस रामशंकरजीनी अरूणभाईना विचारलेत, की, "दोन मिनिटं वेळ असेल, तर थोडं बोलायचं होतं. त्यानंतर दोघे प्रतीक्षा कक्षेत सोफ्यावर बसले. रामशंकरानी त्यांना विचारले की," साहेब, तुम्ही कधी पक्ष्यांना दाणे टाकलेत ? " अरूणभाई" नाही" म्हणाले. " साहेब, मी कैक वर्षांपासून टाकतो आहे. काही फायदा दिसत नव्हता. पण सवय झालीय. असं म्हणाना, की व्यसनच जडले होते मला त्याचे! पण त्या मुक्या पाखरांनी आज मला निहाल करून दिले." अरूणभाई म्हणाले," समजलो नाही " त्यानंतर रामशंकरांनी आपबिती सांगण्यास सुरुवात केली. दोन मिनिटांचा तास कधी झाला समजलेच नाही. रामशंकर गरीब होते. एका पेढीत तीस वर्षापासून नोकरी करत होते. पगार जेमतेम. कुटुंबात पती पत्नी व मुलगा मनन. एका छोटेखानी घरात गुजराण चालू होती. सर्व संतोषी जीव! मनन अभ्यासात हुशार! बारावीत सायन्स घेतले. ट्युशन्स तर शक्यच नव्हती. शाळेत मुख्याध्यापकांनी फी माफ करून दिली. एवढ्या अडचणीतही बारावीत चांगले टक्के मिळाले. पण प्रत्येक ठिकाणी वेटींग लिस्ट! फी साठी पैसे नाहीत! डोनेशन तर दूरची गोष्ट! मननला आय. आय.टीत प्रवेश हवा होता. पण निराशाच! त्यात एक आशेचा किरण चमकला. बेंगळुरूत nitte संस्थेत फार्म भरलेला तेथे प्रवेश मिळण्याची संधी मिळाली. ती एक नामांकित संस्था आहे. बातमी चांगलीच होती, पण रामशंकरसाठी चादरीपेक्षा पाय लांबच होते. तरीही, बापलेकांनी बेंगलोरला जाण्याचे नक्की केले. करूणातर ही होती की फी तर राहिली बाजूला, भाड्याचेसुध्दा पैसे नव्हते. रामशंकरने शेठजींकडून उचल घेऊन टिकीट आरक्षित केले, व बापलेक संस्थेत पोहचले. मननने फार्म भरल्या वर त्याला एक ब्राऊचर मिळाले. रामशंकरचे डोळे एका टर्मची व होस्टलची फी वाचूनच पांढरे झाले. काऊंटरवरचा क्लार्क दोघांची घालमेल बघत होता. त्याने मननला बोलवले, आणि इंग्रजीत विचारले, "काही अडचण आहे का? मनन म्हणाला," नाही. आम्ही मॅनेज करू. फी भरायची शेवटची तारीख काय आहे ? " " उद्याची! "क्लार्क म्हणाला. मननला चक्कर आल्या सारखे झाले. तो पित्याजवळ जाऊन बसला आणि रडू लागला. क्लार्क जागेवरून ऊठून पाणी घेऊन मननजवळ आला. त्याला पाणी दिले. भाषेचे बंधन होते. त्याने रामशंकरला कन्नड भाषेत काहीतरी सांगीतले. रामशंकरला काय समजले माहीत नाही. ते म्हणाले, "नो मनी". क्लार्क मननजवळ बसला आणि त्याने मननला काहीतरी सांगीतलं. मनन थोडा सावरला मग वडडिलांना म्हणाला, की, "हे भाऊ म्हणतात की संध्याकाळपर्यंत थांबा. ते म्हणतायत," ते आपल्याला एके ठिकाणी घेवून जातील. मग आपल नशिब! आपलं टिकीट दुसर्‍या दिवशीचे आहे. " ते दोघे गुजराथी समाजाच्या धर्मशाळेत उतरले होते. क्लार्कने एका स्वस्त पण स्वादिष्ट हॉटेलचा पत्ता लिहून दिला. दोघेही भुकेले झालेच होते. जेवण करून एका बागेत संध्याकाळपर्यंत टाईम पास करून सहा वाजता संस्थेत परत आले. पाच मिनिटात क्लार्क त्याचे काम पूर्ण करून त्यांना घेऊन रिक्षाने बरेच अंतर पार करून मोठ्या बंगल्यासमोर रिक्षा उभी राहिली. भाडे झाले अडीचशे रुपये रामशंकरने खिशात हात टाकला पण क्लार्कने रिक्षाचालकाला कन्नड भाषेत काहीतरी सांगून बंगल्यात प्रवेश केला. तेथील वैभव पाहून डोळे दिपले. पण त्याचबरोबर इंचा इंचामध्ये तेथे रहाणार्‍यांचे संस्कारीपणा दिसत होते. तिघेही मोठ्या ड्रॉईंग रूममध्ये बसले. थोड्या वेळेत एक वयस्कर व आपसूकच वंदन करावेसे वाटेल, अशी प्रतिभाशाली महिला त्यांच्या समोर येऊन बसली. क्लार्कने बापलेकाचा परिचय करून दिला. मग त्या दोघात कन्नडमध्ये संभाषण झाले. तेवढ्यात चहानास्ता आला. त्यांना चहानास्ता घेण्यास सांगून ती महिला आतमध्ये गेली. थोड्यावेळेत ते महान व्यक्तीमत्व असलेली महिला हातात चेकबुक घेवून बाहेर आली. क्लार्कला काही विचारून चेक लिहिला. क्लार्कने तोडक्यामोडक्या हिंदीत मननला सांगीतले की, "एक सिमीस्टरची व होस्टेलची फीची रक्कम मिळाली आहे." मननला अत्यानंद झाला. तो सरळ त्या देवीच्या पाया पडला. वातावरण भारावून गेले. बाहेर रिक्षा उभीच होती. तिघे रिक्षात बसले. मननने व्याकुळतेने विचारले, की " ह्या देवीसमान आजी कोण आहेत आणि त्यांनी आमच्यासाठी एवढी तसदी कां घेतली? " उत्तर ऐकून बापलेक तर स्तब्धच झाले. त्या होत्या भारतीय क्रिकेट टीमचा एक जगतविख्यात नामांकित खेळाडू अनिल कुंबळेच्या मातोश्री! क्लार्कला त्यांची महती माहीत होती. म्हणून तो गरजू व योग्य विद्यार्थ्यांना त्यांच्याकडे घेऊन जात असे. दान सत्पात्री पडण्यास तो फक्त निमित्त होत असे.. तरी एक यक्षप्रश्न समोर होताच! दुसर्‍या सेमीस्टरचे काय? पण आता 'सर दिया ऊखळीमे, तर फुटनेसे क्या डरना?' ह्या उक्तिप्रमाणे, 'जो होगा वो देखा जायगा! " असा विचार करून दुसर्‍या दिवशी प्रवेशाचे सोपस्कार पार पाडले. मननचे शिक्षण सुरु झाले. एके दिवशी अचानक मननचा फोन आला, की" संस्थेत पालकदिन आहे तुम्हाला यावे लागेल." मालकांकडून तिकिटांसाठी आधीच घेतलेली उचल अजून फेडली गेली नव्हती. तेव्हा नविनचा प्रश्नच नव्हता. शेठजींनी सुध्दा तीस वर्षाच्या चाकरीचा विचार न करता, "ऐपत नसेल, तर मुलाला इतक महागड शिक्षण देऊच नये", असा टोला दिला. रामशंकरने हा कडू घोट गिळुन टाकला. आणि मित्रांकडून उसनवारी केली. पण रात्रीच मननचा फोन आला. आणि रामशंकर सरळ पक्ष्यांना दाणे टाकायचे, त्या ठिकाणी गेले. आणि त्यांना रडू आले. हेअश्रु आनंदाचे होते. रात्र होती म्हणून तिथे पक्षी नव्हते.. रामशंकर टिकीट आरक्षित करण्यास निघाले, तेंव्हा शेजारी राहणाऱ्या पक्याने हाक मारली. "रामकाका, मननचा फोन आहे." मनन म्हणाला, "आता तुम्हाला इथे येण्याची गरज नाही. कारण स्वतः अनिल कुबंळे त्याचे पालक म्हणून कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. कोणास ठाऊक कोणत्या जन्माचे ऋणानुबंध असतील! नाहीतर कुठे बंगलोरचे अनिल कुंबळे आणि कुठे अहमदाबादचा मनन रामशंकर ठाकर! घडले असे, की, काॅलेज सुरू झाल्या नंतर मननला त्या देवदूताला (अनिल कुंबळे) भेटण्याची उत्कट इच्छा झाली. फोन करुन मुलाखतीची वेळ घेऊन मनन पोहचला. त्याच्या अपेक्षेपेक्षा वेगळेच वर्तन त्याला अनुभवात आले. एवढा महान खेळाडू इतका नम्र आणि विनयशील असेल, अशी कल्पनासुद्धा नव्हती. अनिलने त्याची पूर्ण कहाणी एकून त्याला आश्वासन दिले, की "मी तुझे शिक्षण पूर्ण होईपर्यंतचा सर्व खर्च तो करीन. चिंता करू नकोस." पेरेंट डेची गोष्ट मननने त्याला सांगीतली. अनिलने आपली डायरी बघून त्याचे पालक म्हणून उपस्थित राहण्याचे आश्वासन सुध्दा दिले. मनन खूप खुश झाला. !. ही खुशी त्याला मनात जिरवणे शक्य झाले नाही. त्याने ही गोष्ट प्रिन्सिपॉलना सांगून टाकली. बस! काॅलेजमध्ये ही गोष्ट व्हायरससारखी पसरली. मननचा मान वाढला. मनन पण जबाबदारीने मेहनत करू लागला. कोणीतरी त्याच्यावर दाखवलेल्या विश्वासाचे चीज करायचे होते. झालेही तसेच! त्याने फायनलमध्ये distinction सहित यश मिळवले. अहमदाबादहून परत जाण्याची वेळ आली. जाण्या आधी मनन अनिल आणि त्याच्या मातोश्रीना भेटण्यास गेला. आभार व्यक्त करण्यास शब्दच नव्हते! ते काम अश्रुंनी केले. अनिल आणि त्याच्या मातोश्रीपण सद्गदित झाल्या. *bravo anil kumble!* जीवनात अमीरीचा अभिमान सोडून, जास्त नाही, पण आपल्या जवळच्या हितचिंतकांचे तरी भले करण्यात खर्च करावा. लग्नप्रसंगी दिखावा करण्यात लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा चांगल्या कार्यात त्याचा उपयोग करणे हीच खरी श्रीमंती! #🎑जीवन प्रवास #🙂Motivation
🎑जीवन प्रवास - ShareChat
"तीन उपदेश" एक गरीब माणूस आपल्या पत्नीसोबत एका छोट्या गावात राहात होता. जीवन इतकं कठीण होतं की अनेक वेळा खायला देखील काहीच नसायचं. एक दिवस त्याने कामाच्या शोधात गाव सोडायचं ठरवलं. जाताना तो आपल्या पत्नीला म्हणाला, "मी आता लांब प्रवासावर चाललो आहे. मी सदैव तुझ्या प्रती निष्ठावान राहिलो आहे. माझ्या अनुपस्थितीत तू देखील माझ्या प्रती निष्ठावान राहशील का?" पत्नीने मानेने होकार दिला. तो माणूस खूप दूर गेला आणि एका व्यापाऱ्याच्या घरात नोकरीला लागला. पण अट अशी होती.. त्याचा सगळा पगार व्यापाऱ्याच्या जवळ साठवला जाईल आणि काम सोडताना एकदम मिळेल. २० वर्षे उलटून गेली. एक दिवस तो व्यापाऱ्याला म्हणाला, "मालक, आता मी घरी परत जायचं ठरवलं आहे. कृपया माझं सगळं साठवलेलं वेतन मला द्या." मालक म्हणाला, "तुला दोन पर्याय आहेत... एकतर तुझं संपूर्ण वेतन घे, किंवा माझ्याकडून तीन महत्त्वाचे उपदेश घे. पण दोन्हीपैकी एकच गोष्ट मिळेल." त्या माणसाने दोन दिवस विचार केला आणि म्हणाला, "मालक, मला तुमचे तीन उपदेश द्या. मला पैसे नकोत." मालक हसत म्हणाला, "मग लक्षपूर्वक ऐक: पहिला उपदेश: कधीही शॉर्टकट निवडू नकोस, तो कितीही सोपा वाटला तरी. लांबचा मार्ग अनेकदा अधिक सुरक्षित आणि लाभदायक असतो. दुसरा उपदेश: कधीही घाई करू नकोस. पूर्ण गोष्ट समजून घे, मग निर्णय घे. तिसरा उपदेश: एखाद्या व्यक्तीबद्दल मत बनवण्याआधी सर्व सत्य जाणून घे." मालकाने त्याला तीन पोळ्या दिल्या.. दोन प्रवासात खाण्यासाठी आणि एक मोठी पोळी घरी पोहोचल्यावर पत्नीबरोबर वाटून खाण्यासाठी. आता तो माणूस लांब प्रवासासाठी निघाला. रस्त्यात एकाने त्याला सांगितलं की एक छोटा मार्ग आहे ज्याने तो लवकर घरी पोहोचू शकतो. त्याला पहिला उपदेश आठवला... त्याने लांबचा आणि सुरक्षित मार्ग निवडला. नंतर समजलं की त्या छोट्या मार्गावर एक हिंस्र प्राणी होता, जो त्याला मारू शकला असता. रात्री एका अज्ञात व्यक्तीने त्याला घरात आसरा दिला. मध्यरात्री घरात काही आवाज आले. तो उठून पाहायला गेला, पण त्याला दुसरा उपदेश आठवला... "घाई करू नकोस". तो थांबला. सकाळी कळलं की रात्री घरात वाघ घुसला होता. त्याच्या न बघण्यामुळेच त्याचा जीव वाचला. शेवटी तो आपल्या गावात पोहोचला. घराजवळच्या खिडकीतून बघितलं तर त्याला दिसलं की त्याची पत्नी एका पुरुषाला मिठी मारतेय आणि त्याच्या गालाचं चुंबन घेत आहे. तो खूप संतापला, निराश झाला आणि थकल्यासारखा तसाच निघून गेला. मग त्याला तिसरा उपदेश आठवला.. "पूर्ण सत्य जाणण्याआधी मत बनवू नकोस." तो परत गेला आणि दरवाजावर टकटक केली. पत्नीने त्याला पाहून आनंदाने धावत येऊन मिठी मारायला लागली पण तो थांबला आणि विचारलं, "तू माझ्या अनुपस्थितीत दुसऱ्या पुरुषाला का मिठी मारलीस आणि चुंबन घेतलंस? तू वचन दिलं होतंस!" पत्नी हसून म्हणाली, "आधी घरात या, मी सर्व काही सांगते." "नाही, मला आत्ता सगळं सांग!" त्याने ठामपणे सांगितलं. पत्नी म्हणाली, "जेव्हा तुम्ही गेलात, तेव्हा मी गरोदर होते. आपला आता वीस वर्षांचा मुलगा आहे. तोच मुलगा होता, ज्याला तुम्ही खिडकीत पाहिलंत. मी त्याला कामावर जाण्यापूर्वी गालावर चुंबन घेतलं, अगदी तसंच जसं तुम्ही जाताना माझं चुंबन घेतलं होतं." त्या माणसाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते दोघं घरात गेले आणि मग एकत्र जेवायला बसले.. आता त्याने ती तिसऱ्या पोळीची पिशवी उघडली जी मालकाने पत्नीसोबत खायला संगीतली होती. जशी त्याने पिशवी उघडली, त्यामधून त्याच्या वीस वर्षांची संपूर्ण जमा केलेली रक्कम बाहेर आली.. जी त्याच्या मालकाने प्रेमाने लपवून ठेवली होती. शिकवण: प्रत्येक सोपा मार्ग योग्यच असेल असं नाही. घाईत घेतलेले निर्णय अनेकदा तोट्याचे असतात. प्रत्येक गोष्ट जशी दिसते तशीच असेल असं नाही. पूर्ण सत्य जाणल्याशिवाय निर्णय घेऊ नका. #☺️सकारात्मक विचार #🙂Motivation #🎑जीवन प्रवास