@lata954
@lata954

Mrs.Lata

👌सगळ्या पेक्षा वेगळा आणि सुंदर तु नक्कीच आहेस .पण ...त्याही पेक्षा सुंदर तुझ माझ्या सोबत असन आहे

*पोळ्या झाल्या की भाकरी* *अन भाकरी झाली की भाजी* *स्वयंपाक करता करताच* *बायको होईल आजी* 💗🙆🏻💗 *गुडघे लागतील दुखायला* *तडकून जातील वाट्या* *दोघांच्याही हातात येतील* *म्हातारपणाच्या काठ्या* 💗🤦🏻‍♀💗 *जोरजोरात बोलावं लागेल* *होशील ठार बहिरा* *मसणात गवऱ्या गेल्यावर* *आणतो का तिला गजरा ?* 💗👌💗 *तोंडात कवळी बसवल्यावर* *कणीस खाता येईल का ?* *चालतांना दम लागल्यावर* *डोंगर चढता येईल का ?* 💗🤷🏻‍♀💗 *अरे बाबा जागा हो* *टाक दोन दिवस रजा* *हसी मजाक करत करत* *मस्तपैकी जगा* 💗👌💗 *दाल-बाटी,भेळपुरी* *आईस्क्रीम सुद्धा खा* *आरोग्य उत्तम राहण्यासाठी* *शहरा बाहेर फिरायला जा* 💗👍💗 *Busy Busy काय करता* *वेळ काढा थोडा* *आयुष्यभर चालूच असतो* *संसाराचा गाडा....* 💗🤷🏻‍♀🙆🏻🤦🏻‍♀💗👍🌹 🌹शुभ रात्री🌹 #😴शुभ रात्री
#

😴शुभ रात्री

😴शुभ रात्री - ShareChat
152 जणांनी पाहिले
16 तासांपूर्वी
मी हल्ली पुस्तकं नाही, माणसंच वाचतेय ! पुस्तकं महाग झालीयत, माणसं स्वस्त. शिवाय, सहज सगळीकडे उपलब्ध असतात माणसं. बरीचशी चट्कन वाचून होतात, कधी कधी मात्र खूप वेळ लागतो समजायला. काही तर आयुष्यभर कळत नाहीत ! सगळ्या साईजची सगळ्या विषयांची. छोटी माणसं, मोठी माणसं, चांगली माणसं, खोटी माणसं. आपली माणसं, दूरची माणसं, दूर गेलेली माणसं, जवळची माणसं. दु:खी माणसं, कष्टी माणसं कोरडी माणसं, उष्टी माणसं बोलकी बडबडी, बोलघेवडी माणसं निमग्न, तिरसट, मूडी माणसं. पाठीवर थाप मारणारी, हातावर टाळ्या मागणारी, थरथरत्या हाताने, घट्ट धरून ठेवणारी. मोजकं बोलणारी कविता-माणसं, कादंबरीभर व्यथा माणसं. सतत माईक घेऊन ओरडणारी माणसं, डोळ्यांनी मौन सोलणारी माणसं. काहींच्या वेष्टनात मजकूरच नाही, काहींच्या मजकुरात विषयच नाही, वर्षामागे वर्ष पानं जातात गळत, काहींची प्रस्तावनाच संपत नाही ! पुस्तकांचं एक बरं असतं, कितीही काळ गेला तरी, मजकूर कधी बदलत नाही, माणसांचं काय सांगू, वेष्टन, आकार, विषय, मजकूर सारंच बदलत बदलत शेवटी वाचायला माणूसच उरत नाही. तरीही शब्द शब्द वाचते मी माणसं, पानापानातून #💭माझे विचार
#

💭माझे विचार

💭माझे विचार - 真 - ShareChat
144 जणांनी पाहिले
1 दिवसांपूर्वी
✅ *बायकोनं घरात मांजर पाळलेलं .. तिचं ते खूप लाडकं.. ती जेवायला बसली की तिलाही घेवून बसायची... एका वाटीत दूध भाकर कुस्करुन द्यायची... पण नवऱ्याला ते मांजर अजिबात आवडायचं नाही... उघडं दिसेल त्या भांड्यात तोंड घालायची त्याला सवय... त्याचा त्याला प्रचंड राग यायचा...* एकदा नवरा जेवायला बसलेला आणि नेमकं मांजर त्याच्या ताटात तोंड घालतं... नवरा चिडतो आणि रागारागाने शेजारी असलेला ठोंब्या त्याच्या डोक्यात घालतो.. घाव वर्मी बसल्याने मांजर बराच वेळ निपचित पडून राहतं... मेलं की काय अशी शंका येत असतानाच ते अंग झटकून उठून बसतं... हळूच नवऱ्याकडे हसून बघतं... आणि चक्क 'शॉरी यार, मी मघाशी तुझ्या ताटात तोंड घातलं... क्या करे आदत से मजबूर हूँ... पुन्हा नाही असं करणार..'असं माणसासारखं बोलतं... नवरा वेडा व्हायचाच बाकी... त्यानंतर मांजर नम्र आणि आज्ञाधारक होतं.. ताटात तोंड घालणे तर सोडाच दारातला पेपर आणून दे.. टी पॉय वरचा चष्मा आणून दे अशी बारीकसारीक कामं ते करू लागतं... मग काय नवऱ्याची आणि त्याची छान गट्टी जमते...ऑफिस मधून येताच मांजर दिसलं नाही की तो अस्वस्थ व्हायचा..'अग मन्या दिसत नाही ग कुठं..?' बायकोला सतत विचारत राहायचा.. असेच काही दिवस गेल्यावर एकेदिवशी सोसायटीच्या दारात बेवारस कुत्रीआणि मांजरं पकडून नेणारी महानगरपालिकेची व्हॅन येवून थांबते..मन्या खिडकीतून ती व्हॅन बघतो.. त्याच्या मनात काय येतं कोण जाणे पण धावत जावून तो व्हॅन मधे बसतो... नवरा हे बघतो.. हातातला पेपर पटकन बाजूला टाकून तो मन्यामागे धावतो... मन्या व्हॅनमध्ये निवांत बसलेला... नवरा म्हणतो "मन्या, अरे इथं गाडीत का बसलायस? ही गाडी बेवारस मांजरासाठी आहे..तुझ्यासाठी नाही " 'मला माहितीय... पण मला जायचंय आता' मन्या शांतपणे बोलतो.. 'मन्या,अरे असं काय करतोस? तू किती लाडका आहेस आम्हा दोघांचाही.. माझं तर पानही हालत नाही तुझ्याशिवाय... तू क्षणभर नजरेआड गेलास तरी मला करमत नाही... मी इतकं प्रेम करतो तुझ्यावर आणि तू खुशाल मला सोडून निघालास.. ए प्लिज...प्लिज उतर रे आता ' काकुळतीला येवून तो बोलतो मन्या गोड हसतो आणि बोलतो 'तू माझ्यावर प्रेम करतोस?.....माझ्यावर?' ' म्हणजे काय शंकाय का तुला?' 'मित्रा,अरे मी जेंव्हा माझ्या मनासारखं वागत होतो, हवं तिथं हवं तेंव्हा तोंड घालत होतो तेंव्हा मी तुझा नावडता होतो.. सतत रागवायचास माझ्यावर...अगदी माझ्या जीवावर उठला होतास तू एकदा... .पण जेंव्हा मी तुझ्या मनासारखं वागू लागलो... तुला हवं तसं करू लागलो.. तेंव्हा तुला आवडू लागलो... तू माझ्यावर प्रेम करू लागलास यात नवल ते काय? नॉट सो स्ट्रेंज यार...!! वपुंची ही कथा खूप काही सांगून जाते... जेंव्हा आपण एखाद्यावर प्रेम करतो तेंव्हा ते खरंच त्याला बरं वाटावं म्हणून की स्वतःला बरं वाटावं म्हणून करतो ? समोरचा जो पर्यंत आपल्या मनासारखं वागत असतो तोपर्यंत त्याच्यावर आपलं प्रचंड प्रेम असतं.. कारण त्याचं वागणं आपल्याला सुखावणारं असतं...पण जेंव्हा तो आपलं ऐकत नाही... आपल्याला हवं तसं वागत नाही... तेंव्हा त्याचं आपल्या सोबत असणही आता नकोसं वाटतं...त्याला टाळत राहतो...भेटलाच कधी तर त्याच्यावर चिडतो, रागावतो....त्यानं नाहीच ऐकलं की मग वर्मी घाव घालून नातंच संपवून टाकतो...ज्याच्यावर जीवापाड प्रेम असतं त्याला क्षणात परकं करून टाकतो .. आश्चर्य आहे ? का वागतो असं आपण ? त्याच्यावर खरंच आपलं प्रेम असतं की निव्वळ time pass म्हणून केलेली खोटी भावनिक गुंतवणूक? *आपल्या मनासारखं वागणाऱ्या माणसावर कुणीही प्रेम करतं... अवघड असतं त्याच्यावर प्रेम करणं,त्याला समजून घेणं जेंव्हा तो आपल्या मनासारखं वागत नसतो..!!* #🙏प्रेरणादायक / सुविचार
#

🙏प्रेरणादायक / सुविचार

🙏प्रेरणादायक / सुविचार - ShareChat
241 जणांनी पाहिले
4 दिवसांपूर्वी
*स्त्रीवर केलेले सुंदर लिखाण....कोणी लिहिले माहिती नाही पण अफलातून वर्णन.....* *लेखक माहीत नाही. कुणाला तरी एका प्रवासात एकाने दिलेल्या मासिकातील पद्य* *बाई शिकली म्हणून शहाणी झाली नाही.* *ती शहाणीच होती... आधीपासून. आजही आहे.* *उंबरठ्याच्या आत गुलाम असली तरी सलामाची मानकरी होती ती, आजही आहे.* *ओझी वाढलीत तिच्या पाठीवरची. तरीही वाकली नव्हती ती. आजही नाही.* *ती माऊली होती, सावली होती. आजही आहे. पण बाहुली कधीच नव्हती. आजही नाही.* *ती होती कणा. नसून 'मी' पणा. ती होती जिद्द. सांभाळून हद्द. आजही आहे.* *ती नुसती अय्या - बय्या नव्हे, छय्या - पिय्या नव्हे, नुसती शय्या तर नव्हेच नव्हे. ती मनाचा हिय्या. होती आणि आहे.* *ती पणती, तीच तेल, वात, ज्योत. तीच तेज, प्रकाश. जळणारी आणि उजळणारी. तेव्हा आणि आताही.* *मार्ग खडतर. आयुष्य दुस्तर. मात्र ती कणखर. सुख कणभर, दु:ख मणभर. तरी ती घरभर. आभाळ जशी.* *आता ती उत्क्रांत. नाना क्षेत्रे पादाक्रांत. खांद्याला खांदा. पावलासोबत पाऊल. उज्वल उद्याची चाहूल..* मी खरच नतमस्तक🙏........ #📝कविता / शायरी/ चारोळी
#

📝कविता / शायरी/ चारोळी

📝कविता / शायरी/ चारोळी - ShareChat
161 जणांनी पाहिले
4 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..