उद्या ख्रिस्ती बांधवांचा सण, ख्रिस्तमास आहे.
गेला आठवडाभर, सिग्नलवर या लाल टोप्या विकून, अनेक गरीब पोटं भरत आहेत. त्या सोबतच आपल्या अनेक भगिनी घरगुती केक बनवून विक्री करीत आहेत. सजावट साहित्य, मिठाई याचा व्यवसाय होत आहे.
आपल्या देशात वर्षभरात, प्रत्येक धर्माचे सार्वजनिक उत्सव होतं असतात. हे उत्सव, म्हणजे गरिबांना मिळकतीचं साधन असते. व्यापार होतो आणि आनंद वाटला जातो. मात्र, इतर धर्माच्या सणाचा आनंद घेऊन, लगेच कुणी त्या धर्मात परिवर्तीत झालेलं ऐकिंवात नाही. अनेक लोक, इतरांचे सण साजरे करतात, पण आपल्या धर्माला विसरत नाहीत. तरीही, धर्म सोडून कुणी गेलं असेल, तर, त्यामागची कारणे शोधावीत. वास्तविक आपला धर्म, इतका महान असावा, सर्व समाविष्ट असावा, की इतरांना त्याचं आकर्षण वाटावं. सध्या जे धर्मात आहेत, त्याना समान हक्क असावेत, सुरक्षित वाटावे.
सण, उत्सव, हे आनंद देण्याची गोष्ट आहे. एकत्र येण्याची, प्रेम देण्याघेण्याची गोष्ट आहे.
द्वेष पसरवू नये.
#🎅🌲ख्रिसमस नाताळ शुभेच्छा🌲🎅 #⛄🎅🎄नाताळ स्पेशल 🎄🎅⛄ #नाताळ #नाताळ च्या शुभेच्छा