Kyc करूनही 'लाडकी बहीण'चा हप्ता का रखडला? 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता अनेक महिलांच्या खात्यात अद्याप जमा झालेला नाही. विशेष म्हणजे, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही पैसे न मिळाल्याने लाभार्थी महिलांमध्ये गोंधळ आहे. प्रशासकीय सूत्रांनुसार, केवळ ई-केवायसी पुरेशी नसून कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास अशा महिलांना अपात्र ठरवण्यात आलेय. ३१ डिसेंबरपर्यंत केवायसी करणे अनिवार्य होते. या प्रक्रियेत उत्पन्नाचे निकष न पाळणाऱ्या महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आलीत. ज्या महिला निकषांत बसतात, त्यांना मकरसंक्रांतीला हप्ता मिळालाय. मात्र, अपात्र ठरलेल्यांचे पैसे कायमचे रोखले जाण्याची शक्यता आहे. आता पात्र महिलांचे लक्ष आगामी जानेवारी महिन्याच्या हप्त्याकडे लागलेय.
#🤷♀️या लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही #मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना 2024 #माझी लाडकी बहीण योजना #मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना #📄सरकारी योजना