🌺 आज पाचवी माळ रंग हिरवा 🌺
37 Posts • 225K views
Santosh D.Kolte Patil
658 views 1 months ago
शारदीय नवरात्र ॥ उत्सव नवरात्रीचा जागर आदिशक्तीचा ।। माळ - पाचवी रंग-हिरवा जागर नवरात्री चा !! देवीच्या प्रत्येक रुपात संदेश आहे. ॐ देवी स्कन्दमातायै नमः ।। सिंहासनगता नित्यं पद्माञ्चित करद्वया। शुभदास्तु सदा देवी स्कन्दमाता यशस्विनी ।। स्‍कंदमाता :- दुर्गेचे पाचवे रूप ‘स्कंदमाता’ या नावाने ओळखले जाते. माता पार्वतीचे प्रथम पुत्र कार्तिकेय चे नाव स्कंद आहे, म्हणूनच स्कंद ची माता स्कंदमाता. या रुपात या देवीने आपल्या पुत्राला म्हणजेच स्कंदला स्वत:च्या मांडीवर घेतलेले आहे. देवीला चार भुजा असून डाव्या बाजूच्या एका भुजेने स्कंदला मांडीवर पकडून ठेवलेले. देवीचा रंग पूर्णतः हिरवा आहे. ही देवी कमळाच्या आसनावर विराजमान असते. यामुळे या देवीला पद्मासना असेही म्हणतात. वाहन सिंह आहे. या देवीच्या उपासनेने भक्ताची इच्छा पूर्ण होते. हिरवा रंग परिधान केल्यास अतुलनीय आशावाद आणि आनंदाने नवरात्री परंपरांचा आनंद घेण्यास मदत होईल. आज पाचवी माळ.. रंग - हिरवा देवीचे रूप - #स्कंदमाता #🌺 आज पाचवी माळ रंग हिरवा 🌺 ##शारदीय नवरात्रौत्सव #शारदीय नवरात्रौत्सव -2025 घट स्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏 #🙏🌹देवी स्कंदमाता🌹🙏 #देवी स्कंदमाता #🌸 देवी स्कंदमाता 🙏
7 likes
10 shares