29 सप्टेंबर ला खैरलांजी घटनेला -20 वर्ष
पूर्ण होतील तसें प्रत्येक हत्याकांड भयंकरच
असतात. परंतू खैरलांजी हत्त्याकांड
महाभंयकर निर्घृण, करूण आणि दारुण
असे होते.
कारण या घटनेत केवळ हत्त्या केल्या
नाहीत तर छळून छळून राक्षसी क्रूरतेचा
आस्वाद घेत घेत 4 जणांची हत्त्या केली
गेली, भोतमांगे कुटुंबातल्या तरुण मुलांना
नग्न करून त्यांचे लिंग खेचून पिरगळून मरण
यातना देण्यात आल्या, मग फूटबॉल सारखे
हवेत वर उसळवून आपटून आपटून ठार
मारले.
आई आणि मुलीची गावात नग्न धिंड
काढली मग् इतक्या क्रूरतेंने त्यांची हत्त्या
केली की क्रॉऊंर्य देखील लाजेल. पंधरा
विस लोकांनी बलात्कार केले नंतर मुलीच्या
योनीत ( शिवळ ) बैलदांडा टाकून मारले..
आणि आईला लोखंडी हाफस्यावर डोके
आदळून आदळून ठार केले. जातीयता
माणसाला किती सळाळून पिसाळून टाकते,
याचे विखारी घंनघोर उदाहरण म्हणजे
खैरलांजी घटना!
अशा या घटनेला आज विस वर्ष पूर्ण होऊन ही आरोपीला फाशीची शिक्षा झालेली नाही
आहे. फाशी द्या फाशी द्या आरोपीना फाशी
द्या..
भोतमांगे परिवाराला भावपूर्ण आदरांजली...!! 🥹
🕯️🙇♀️💐
#भावपूर्ण श्रद्धांजली