चालू घडामोडी
207 Posts • 757K views
#🤔एकनाथ शिंदें अचानक दिल्लीत दाखल🔴 मोठी बातमी! एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, महायुतीत नेमकं काय घडतंय? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मध्यरात्री दिल्लीकडे कूच केली. त्यांच्या या दौऱ्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. सध्या ठाण्यासह मुंबईत भाजपसोबत शिंदे सेनेच्या कुरबुरी वाढल्या आहेत. त्यामुळे या दौऱ्याला महत्त्व आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची नांदी आली आहे. त्याचवेळेस भाजपमध्ये इनकमिंग वाढले आहे. त्यात शिंदे सेना आणि अजितदादांच्या जुन्या-जाणत्या लोकांचाही समावेश असल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे नाराजी पसरली आहे. तर अनेक ठिकाणी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. ठाण्यासह इतर भागात दोन्ही पक्षात धुसफुस चव्हाट्यावर आली आहे. निधी वाटपावरूनही सध्या नाराजी नाट्य असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यात नेमके कोणत्या विषयावर चर्चा होणार हे अजून समोर आलेले नाही. #📢25 ऑक्टोबर अपडेट्स🔴 #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #चालू घडामोडी
14 likes
11 shares
*GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले* या सर्व वस्तूंसाठी बदललेले दर २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होतील, तंबाखूजन्य वस्तूंचा अपवाद वगळता. "हे सर्व २२ सप्टेंबर २०२५ रोजी, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी लागू होतील... पाप वस्तू वगळता सर्व उत्पादनांच्या जीएसटीवरील बदल २२ सप्टेंबरपासून लागू होतील..." जीएसटीमधील १२ आणि २८ टक्क्यांचा स्लॅब संपविण्यात आला असून आता सर्व वस्तू या ५ टक्के आणि १८ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये आणण्यात आल्या आहेत. या नव्या जीएसटी रचनेची आज घोषणा करण्यात आली असून येत्या २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी रचना लागू होणार आहे. आज जीएसटी परिषदेची बैठक सुरु होती. पहिल्याच दिवशी ही घोषणा करण्यात आली आहे. आलिशान गाड्या, साखरेचे पेये, फास्ट फूड महागणार आहेत. काही वस्तूंवरील कर हा १२ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे. तसेच लक्झरी वस्तूंसाठी ४० टक्के कर लागणार आहे. पान मसाला, गुटखा, दारू इत्यादी वस्तूंवर ४० टक्के जीएसटी लागणार आहे. वैयक्तिक विमा पॉलिसी आणि आरोग्य विमा पॉलिसी जीएसटीमुक्त करण्यात आल्या आहेत. यामुळे विमा खरेदी आता स्वस्त झाली आहे. सिमेंटवरील जीएसटी देखील २८% वरून १८% पर्यंत कमी झाला आहे, यामुळे लोकांचे घरांचे स्वप्न स्वस्त झाले आहे. अनेक औषधांवरील जीएसटी शून्यावर आणण्यात आला आहे. छोट्या कार आणि मोटारसायकली (३५० सीसी), टीव्ही आदी गोष्टी २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आणण्यात आल्या आहेत. पिझ्झा,ब्रेड, दूध आणि चीजवर जीएसटी लागणार नाही. २५०० रुपयांपर्यंतच्या शूज आणि कपड्यांवरील जीएसटी दर ५% टक्के करण्यात आला आहे. शाम्पू, साबण, तेल आणि दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या इतर घरगुती वस्तूंव्यतिरिक्त, नमकीन, पास्ता, कॉफी, नूडल्सवर आता 5% GST आकारण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले. 33 जीवनरक्षक औषधे GST च्या कक्षेबाहेर ठेवण्यात आली आहेत. यामध्ये तीन कर्करोगाच्या औषधांचाही समावेश आहे. #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #ब्रेकिंग न्यूज #जीएसटी #चालू घडामोडी #ताज्या बातम्या
533 likes
6 comments 695 shares