🏏भारताचा ऑस्ट्रेलियावर 48 धावांनी दणदणीत विजय!
61 Posts • 237K views
ᴍᴀʀᴏᴛɪsʜɪʀᴀʟᴇ45
8K views 2 months ago
🏏 भारताचा चौथ्या टी20 सामन्यात शानदार विजय! 🇮🇳 गोल्डकोस्टमध्ये झालेल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 48 धावांनी मात करत मालिकेत 2-1 अशी आघाडी मिळवली. या सामन्यात अप्रतिम गोलंदाजी करत वॉशिंग्टन सुंदरने फक्त 3 धावा देत 3 विकेट्स घेतल्या आणि सामना भारताच्या बाजूने फिरवला. या ३ विकेट मध्ये सर्वात महत्वाची विकेट होती ती म्हणजे मार्कस स्टोइनीसची. जर तो टिकला असता तर सामना भारताच्या हातून निसटला असता, मात्र सुंदरने अचूक गोलंदाजी करत त्याला LBW बाद केले. त्याच्या या कामगिरीमुळे भारताने पुन्हा एकदा आपल्या बळावर विजय मिळवला आहे. भारताने पहिले फलंदाजी करत 167 धावा केल्या, तर ऑस्ट्रेलियाचा डाव 119 धावांत संपला. आता 8 नोव्हेंबरला ब्रिस्बेनमध्ये होणारा शेवटचा सामना मालिकेचा निकाल ठरवेल..!🔥 #⚾वॉशिंग्टन सुंदर #🏏भारताचा ऑस्ट्रेलियावर 48 धावांनी दणदणीत विजय! #🇮🇳टीम इंडिया🤩 #📣T20 अपडेट्स🏏
37 likes
30 shares