#भन्नाट विनोद #विनोद 😂 #विनोद #चावट विनोद #बरोबर आहे ना मित्रांनो लाखात एक सत्य💯🔥☝🏻
💥जशास तसे 💥
नवरा फोनवर म्हणाला:
"आज संध्याकाळी घरचे येणार आहेत. काहीतरी छान बनवून ठेव."
बायकोला प्रचंड राग आला ती म्हणाली
" मला नको सांगू काही, मी काही करनार नाही, मी एकटीने काय काय करायचं ! तू त्यांना कुठल्यातरी हॉटेलमध्ये घेऊन जा काय खाऊ घालायचे ते घाल आणि तिकडून च त्यांना निरोप दे ."
नवरा म्हणाला:
"अग ते काय नेहमी येतात का आपल्या कडे ,आणि मला ही तू तिकडे जाऊ देत नाहीस पण निदान वर्षातून एकदा त्यांना सहन तरी करशील."
बायको शांत राहिली विचार केला जाऊ दे येऊ दे घरी मी काही करनार च नाही येतील आणि करतील काय करायचं ते … काहीच उत्तर दिलं नाही.
रात्री आठ वाजता घराची बेल वाजली.
जेव्हा बायकोने दरवाजा उघडला, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर आश्चर्याचा धक्का बसला!
दारात तिचे आई-वडील, भावंडं आणि त्यांची मुलं उभी होती.
तिने काहीच जेवण बनवलं नव्हतं आजारी असल्याच नाटक करून डोक्याला ओढणी घट्ट बांधून झोपली होती … कारण तिला वाटलं होतं की नवर्याचे नातेवाईक येणार आहेत!
ती घाबरून नवर्याला फोन करते –
"कुठे आहेस? अजून ड्युटीवरून का आला नाहीस? आधी का नाही सांगितलंस की माझे घरचे येणार आहेत?
आता काय बनवू त्यांच्या जेवणासाठी? मी तर बाजारातून काहीच आणलेलं नाही! तू कायम असंच करतोस – स्वतः मात्र हॉटेलमध्ये आरामात जातोस!"
नवरा हसून म्हणाला:
"जे आहे घरात, तेच खाऊ घाल. मी शहरातच नाहीये.
मी आणि माझे घरचे सर्वांनी मिळून चार दिवस हिल स्टेशनची ट्रिप प्लॅन केलिये.
मीच तुझ्या घरच्यांना सरप्राइज पार्टीसाठी बोलावलं – तुला एक धडा शिकवण्यासाठी.
त्यांना जास्त काही सांगू नकोस, नाहीतर मी सगळं उघड करून टाकीन.
तुझ्या घरच्यांसोबत मजा कर... मीही माझ्यां घरच्या सोबत करतोय.
आणि एक गोष्ट लक्षात ठेव –
"जोपर्यंत तू माझ्या घरच्यांना 'आपले' मानत नाहीस, तोपर्यंत मी तुझ्या घरच्यांना 'आपले' मानणार नाही!"
चार दिवसांनी भेटू, बाय....!!