*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*२५ जानेवारी इ.स.१६६४*
सुरतेच्या या लुटीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रचंड दरारा निर्माण झाला. सुरतेच्या लुटीचे खरे फलित हेच आहे. लूट किती मिळाली, याचे आकडे भिन्न आहेत; परंतु राजांचा दरारा काय होता त्याचे चित्र इंग्रजी पत्रव्यवहारात मिळते. 'Surat trembles at the name obsevagee.' हे वाक्य बर्याच वेळा त्या पत्रव्यवहारात वाचावयास मिळते. 'शिवाजीराजांचे नाव काढताच सुरत भीतीने थरथरावयास लागते.' 'त्या' दरार्याचे अचूक वर्णन आहे. २५ जानेवारी १६६४ रोजी सुरतेच्या इंग्रजी वखारीतील एक फॅक्टर हेन्री गॅरी याने अर्ल ऑफ मार्लबरोला लिहिलेले एक पत्र फार बोलके आहे. त्यात गॅरी लिहितो, ''.. Savagee the grand rebell to the king of Deccan came here the 6th of this instant with considerable army, entering the town before the governor scarce had any notice of his aproche. He made a great destruction of houses by fire, upwards of 3000, and carried a vast treasure away with him. It is credibly reported near unto ten million of ruppees.''
मुघलांनी सुरतेच्या या लुटीची हाय खाल्ली. ही बातमी ऐकून अनेक जण दिड्मूढ झाले. औरंगजेब सुन्न झाला. पोतरुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच यांनी मोठमोठी बातमीपत्रे आपापल्या राजांकडे पाठवून दिली.
*२५ जानेवारी इ.स.१६६५*
छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळातील एक रत्न, राजनैतिक सल्लागार व विश्वासू सेवक सोनोपंत तथा सोनोजी विश्वनाथ डबीर यांचे निधन.
*२५ जानेवारी इ.स.१६७३*
शिवरायांनी कैदेतील इंग्रज कैद्यांची सुटका केली.
*२५ जानेवारी इ.स.१६८४*
छत्रपती संभाजी महाराजांची पोर्तुगीजांनी एवढी दहशत घेतली होती की त्यांनी गोव्याची राजधानी मुरगाव बंदरात नेण्याचे ठरवले होते . २५ जानेवारी १६८४ रोजी विसेरई गोव्याच्या दयनीय अवस्थेचे वर्णन करताना पोर्तुगालच्या राजाला लिहतो ….
"आमच्या राज्याची अवस्था शोचनीय आहे. मोग्लांमुळे आमचे रक्षण झाले परंतु त्यांनी हे राज्य घेण्याचे ठरवले तर आमची अवस्था अतिशय वाईट होईल ,मोगल निघून गेले तरी देखील संभाजीच्या स्वारीचा धोका पुन्हा आहेच. आमच्या आरमारात माणसे नाहीत. विश्वासू अधिकारी नाहीत,किल्ले निरुपयोगी झालेत,गोलंदाजाची आणि दारूगोल्याची कमतरता आहे.द्रव्याची टंचाई आहेच,हे राज्य आमच्या हातून निसटण्याची भीती आहे ….
#शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय