फॉलो करा
Devendra Fadnavis
@devendrafadnavis
11,146
पोस्ट
309,402
फॉलोअर्स
Devendra Fadnavis
510 जणांनी पाहिले
9 तासांपूर्वी
व्यक्ती, राष्ट्र आणि चारित्र्य निर्माणाची अविरत 100 वर्षे! राष्ट्रसेवेसाठी समर्पित, जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्षांच्या गौरवशाली प्रवासाच्या स्मृतीनिमित्त मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आज नवी दिल्ली येथे विशेष टपाल तिकीट आणि ₹100 स्मृतिचिन्ह नाण्याचे प्रकाशन केले. आपल्या भारतमातेला परमवैभवाच्या सर्वोच्च शिखरावर आरुढ करण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या संघ आणि अगणित स्वयंसेवकांचा हा विशेष गौरव आहे..! #महाराष्ट्र #देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis
585 जणांनी पाहिले
22 तासांपूर्वी
आधुनिक वाल्मिकी, गीतरामायणकार, प्रतिभासंंपन्न मराठी साहित्यिक, पद्मश्री ग. दि. माडगुळकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! #ग दि माडगूळकर जयंती #महाराष्ट्र #अभिवादन
Devendra Fadnavis
591 जणांनी पाहिले
22 तासांपूर्वी
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी । अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥ सर्वांना महानवमीच्या मंगलमय शुभेच्छा! #नवरात्री #महानवमी #महाराष्ट्र
Devendra Fadnavis
1.6K जणांनी पाहिले
1 दिवसांपूर्वी
श्वेते वृषे समारूढा श्वेताम्बरधरा शुचिः। महागौरी शुभं दद्यान्महादेवप्रमोददा॥ महाअष्टमीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! #🌷महागौरी🙏 #🌷अष्टमीच्या शुभेच्छा🪔 #🙏🏵️ देवी महागौरी 🏵️🙏 #नवरात्री #महाराष्ट्र
Devendra Fadnavis
589 जणांनी पाहिले
2 दिवसांपूर्वी
यवतमाळ दौर्‍यावर असताना बैलगाडी हाकण्याची संधी मिळाली! शेतकऱ्यांची बैलगाडी म्हणजे त्याच्या जीवनाची ओळख... शेतकऱ्यांच्या मेहनत, धैर्य आणि निष्ठेची साक्षीदार... #महाराष्ट्र #यवतमाळ #देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis
2.2K जणांनी पाहिले
2 दिवसांपूर्वी
नवरात्रोत्सवानिमित्त काल मूल, चंद्रपूर येथील माझ्या वडिलोपार्जित घरी भेट दिली. यावेळी घरी विराजमान माता जगदंबा देवीचे दर्शन घेऊन आशिर्वाद प्राप्त केले. देवीचे आशिर्वाद आणि घराची आत्मीयता प्रत्येक संघर्षात माझी ताकद राहिली आहे. यावेळी शोभाताई फडणवीस व संपूर्ण परिवारासमवेत व्यतीत केलेले क्षण माझ्यासाठी खरोखर अविस्मरणीय आहेत. या भूमीचे ऋण मी कधीही फेडू शकणार नाही. (२८-९-२०२५मूल, चंद्रपूर.) #महाराष्ट्र #चंद्रपूर #देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis
586 जणांनी पाहिले
4 दिवसांपूर्वी
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे.. 🚩प. पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत जी यांच्या प्रमुख उपस्थितित राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पथसंचलन - नागपूर महानगर 🕗 संध्या. ७.४५ वा. | २७-९-२०२५📍नागपूर. #नागपूर #महाराष्ट्र #मुख्यमंत्री #आरएसएस #देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis
631 जणांनी पाहिले
4 दिवसांपूर्वी
सामान्य भाजी विक्रेत्याचं असामान्य दान! पुण्यातील भाजी विक्रेते चरण वणवे यांनी आज 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'साठी तब्बल ₹1,13,724 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी आमदार हेमंत रासने उपस्थित होते. संकट काळात नागरिकांना मदत करण्यासाठी चरण वणवे आपल्या घरातील सद्गुरू शंकर महाराज यांच्या पादुकांपुढील पेटीत दररोज ₹100 जमा करतात. कोविड काळातही त्यांनी याच संकल्प पेटीतून मोठी मदत केली होती. सोलापूरसह मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांवर मोठं संकट आले आहे. अशा वेळी मदतीचा हात पुढे करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. याच भावनेतून चरण वणवे यांनी दाखवलेलं माणुसकीचं उदाहरण प्रेरणादायी आहे. #महाराष्ट्र #पुणे #देवेंद्र फडणवीस
See other profiles for amazing content