फॉलो करा
❤🚩शिवभक्त🚩❤
@mangesh5663
2,088
पोस्ट
12,360
फॉलोअर्स
❤🚩शिवभक्त🚩❤
2.4K जणांनी पाहिले
⛳स्वराज्यभूमी ⛳ *महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *२८ जानेवारी इ.स‌.१६४५* *छञपती शिवरायांनी "शिवगंगा" खोऱ्यातील "रांझे" गावचा पाटील "बाबाजी भिकाजी गुजर" याचे दोन्ही हात-पाय कापुन टाकण्याची शिक्षा सुनावली व त्याची पाटीलकी जप्त केली. कारण त्या पाटलाने गावातल्या एका गरीब शेतकऱ्याच्या तरुण मुलीला दिवसाढवळ्या सर्वांसमक्ष पळवुन तिच्यावर बलात्कार केला, अब्रुच्या भितीने तिने जिव दिला. सारा गाव हळहळला पण मुका राहीला. शिवरायांच्या कानी ही गोष्ट आली ते साल होतं १६४५ आणि महाराजांचं वय होत १५. या वयात महाराजांनी मुजोर बाबाजीला पकडुन आणले व खटला चालवुन त्याचा चौरंगा(दोन्ही हात-पाय तोडणे) केला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२८ जानेवारी इ.स.१६६०* *२८ जानेवारी १६६० या दिवशी खान औरंगाबादहून निघाला. खानासोबत ७७००० घोडदळ, हत्ती बकसर, तिरंदाज, बरखंदाज, आड़हत्यारी, बाजारबुणगे, दारूगोळा, बाणांच्या भांडत्या, आरबा, उंटांचा तोफखाना, पायदळाची तर गणतीच नाही! असे अमर्याद सैन्य, बेमोहिन रुपे, होन, मोहरा, ऐसे ३२ कोटी द्रव्य घेऊन खान रजियावारी चालून आला, खानची स्वारी म्हणजे जणू कलयुगाच्या रावणाचीच खानासोबत असलेले उत्तम आघाडीचे पदाती घेऊन सरदार अंबिकानगर वरून पुरंदर ,शिरवळ कडे निघाला. एवढं सैन्य घेऊन येतोय म्हणजे तो शांततेत आला नाही. नासधूस करतच चाललेला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२८ जानेवारी इ.स.१६६४* *मुघलांनी सुरतेच्या या लुटीची हाय खाल्ली. ही बातमी ऐकून अनेक जण दिड्मूढ झाले. औरंगजेब सुन्न झाला. पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच यांनी मोठमोठी बातमीपत्रे आपापल्या राजांकडे पाठवून दिली. रेव्ह. जॉन एस्कॅलियट याने २८ जानेवारी १६६४ रोजी सर टॉमस ब्राऊन यांना लिहिलेल्या एका पत्रात शिवाजी महाराजांचे वर्णन आले आहे. पत्रात लिहिले आहे,* *kk .., His person is decribed by them who have seen him to bee of meane stature, lower some what then I am, errect and of an excellent proportion, active in excerisise, and when ever hee speaks seems to smile, a quicke and peercing eye, and whitter than any of his people...!ll* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२८जानेवारी इ.स.१६८१* *बुऱ्हाणपूरवर छापा...* *छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर दोनदा छापा टाकला हे आपल्याला माहित आहे. त्याच प्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या बाहेर जावून मध्य प्रदेशातल्या बुऱ्हाणपूर वर छापा टाकला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२८ जानेवारी इ.स.१८५१* *दुसरा बाजीराव पेशवे यांचे कानपूरजवळ ब्रम्हावर्त येथे निधन झाले. (जन्म: १० जानेवारी १७७५)* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🙏शिवदिनविशेष📜 #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🙏 शिवराय स्टेटस #🚩छत्रपति शिवाजी महाराज #📜इतिहास शिवरायांचा
❤🚩शिवभक्त🚩❤
2.7K जणांनी पाहिले
⛳स्वराज्यभूमी ⛳ *महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *२७ जानेवारी इ.स.१६५८* *छत्रपती शिवरायांनी "माहुलीचा किल्ला उर्फ भंडारगड" जिंकून स्वराज्यात आणला.* *ठाणे जिल्ह्यात आसनगावजवळ एक गडाचे त्रिकुट आहे (माहुली, पळसगड आणि भंडारगड). १४८५ च्या सुमारास हे ठिकाण नगरच्या निजामशाहीचा संस्थापक मलिक अहमद याच्याकडे आले. नंतर शहाजी राजे निजामशाहीचे संचालक झाल्यावर मुघल सेना आणि आदिलशाही संयुक्तपणे निजामशाही बुडवण्याचा प्रयत्न करत होत्या. १६३५ च्या सुमारास शहाजीराजेंनी कठीण परिस्थितीत बळकट आश्रयस्थान म्हणून शिवनेरी, जुन्नर-पुणेहून जिजाबाई राणी आणि बाल शिवबासह माहुलीला मुक्काम हलवला. खानजमानने त्यावेळी माहुलीला वेढा दिला. शहाजीराजेंनी पोर्तुगीजांकडे मदत मागितली पण त्यांनी नकार दिला. त्यावेळी शहाजीराजेंनी शरणागती पत्करली. शिवाजी महाराजांनी हा किल्ला २७ जानेवारी१६५८ ला मोघलाकडून परत मिळवला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२७ जानेवारी इ.स.१६६७* *छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल २७ जानेवारी १६६७ च्या एका पत्रात पोर्तुगीज व्हॉइसरॉय लिहतो :* *"धुर्तपणा, चातुर्य, पराक्रम, चपलता आणि लष्करी बुध्दी ह्या बाबतीत शिवाजीची तुलना करायची झाल्यास ती सिझर आणि सिकंदर ह्याच्याशी करावी लागेल. तो नाही अशी एकही जागा नाही तो सबंध आशियाशी युध्द करीत आहे."* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२७ जानेवारी इ.स.१६८०* *(माघ शुद्ध ६, षष्ठी, शके १६०१, संवत्सर सिद्धार्थी, वार मंगळवार)* *उंदेरीवर पुन्हा आरमारी युद्ध!* *पहाटे छत्रपती शिवरायांच्या आरमारी तुकडीने पुन्हा उंदेरीसाठी सिद्धी बरोबर तुंबळ युद्ध आरंभले. दौलतखानाच्या नेतृत्वात सुमारे ३० जहाजे व शेकडो सैनिकांनी उंदेरीवर पुन्हा एकदा एल्गार मांडला. या युद्धात सिद्धीचे तसेच मराठ्यांच्या आरमाराचेही बरेच नुकसान झाले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२७ जानेवारी इ.स.१६८४* *सुमारास क्रृष्णा नदीच्या काठावर मराठे सैनिकांच्या एका तुकडीची युद्ध करण्याची तयारी चालू होती. अचानकपणे खानजान बहादूर व त्याचा मुलगा हे मराठ्यांवर तुटून पडले. अनेक लोक मारले गेले. बायकामाणसे कैद झाली. अखबारात खोट्या बातम्या दिल्या जात असत ह्याचे हे एक उदाहरण आहे. "मराठे सैनिक लढाईवर आपल्या बायकांना कधीही येत नसत."* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏 शिवराय स्टेटस
❤🚩शिवभक्त🚩❤
2.8K जणांनी पाहिले
⛳स्वराज्यभूमी ⛳ *महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *२६ जानेवारी इ.स.१६४५* *आजपासून ३७५ वर्षापूर्वी एक अशी घटना घडली कि पुन्हा कोणाचीही हिम्मत झाली नाही कुठल्याही आई-बहिणीकडे नजर वाकडी करून पाहण्याची ....... पण आज आमच्याकडे आज कुठलीही आई, बहिण, मुलगी, पत्नी हि सुरक्षित नाही. खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावर घेऊन नाचू नका, पण त्यांचे विचार डोक्यात घेऊन कार्य करण्याचा प्रयत्न करा.* *!! २६ जाने १६४५ !!* *!! रांझ्याच्या पाटलाची गोष्ट ही सर्वश्रुत आहे. रांझे गावचा पाटील बाबाजी गुजर याने गावकीतल्याच एका गरीब शेतकऱ्याच्या तरूण मुलीला दिवसाढवळय़ा सर्वासमक्ष पळवून तिच्यावर बलात्कार केला, अब्रुच्या भीतीने तीने जीव दिला! सारा गांव हळहळता पण मुकाच राहिला!.. पण छत्रपती शिवरायांच्या कानी ही गोष्ट आली. ते सालं होतं १६४५ आणि शिवरायाचं वय होत केवळ पंधरा वर्षे परंतु या वयातही छत्रपती शिवरायांनी मुजोर बाबाजी गुजरला पकडून आणले. खटला चालवून बाबाजी गुजर या पाटलांचा चौरंगा केला. चौरंगा करणे एक हात पाय कलम करणे, विचार करा ही शिक्षा जर आजच्या काळात अमंलात आणली तर काय होईल! परंतु याच शिक्षेमुळे साऱ्याच मावळ खोऱ्यावर एक प्रकारची दहशत बसली. रयत लहानग्या छत्रपती शिवरायांवर अक्षरश: खुश झाली. स्त्रियांच्या अब्रु रक्षणाबाबत जर छत्रपती शिवराय असे धोरण अवलंबत असेल तर त्यांच शिवबांसाठी रयत काहीही करायला तयार झाली. छत्रपती शिवरायांचे वय १५ वर्षांचे पण त्यांच्या याच न्याय स्वभावामुळे अनेक मराठे त्यांच्या फौजेत नुसते सामीलच झाले नाही तर मरायला सिद्ध झाले. कारण ज्यांच्या पाठबळावर राजांनी राज्य करायचं त्या वतनदार, पाटील, देशमुख आदी मंडळीची सुद्धा गय न करता त्यांना शिक्षा करायची धमक शिवरायांच्या ठायी होती. याच दिवशी रांझ्याच्या पाटलाला शिक्षा दिली गेली आणि इथूनच एका क्रांतीची सुरूवात झाली.. !!* *!! चला तर मग छत्रपती शिवरायांना मानाचा त्रिवार मुजरा करत आपणा सर्वांना ७१ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२६ जानेवारी इ.स.१६६२* *शाहीस्तेखान सोबत आलेल्या मुघल फौजेने पवन मावळातील लोहगड, विसापूर, तिकोना या किल्ल्यांच्या भागात चढाया केल्या.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२६ जानेवारी इ.स.१६७१* *छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स. १६७० पासून संभाजीराजांस राज्यकारभारांत गुंतविले. ह्या वेळपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गैरहजेरीत राजधानी रायगडावर मुखत्यारीने राज्यकारभार पाहणाऱ्या राजमाता जिजाबाई वृद्ध झाल्याने राज्याचा कारभार २६ जानेवारी १६७१ रोजी महाराजांनी युवराज संभाजीराजांस सांगितला. संभाजीराजांस कारभार मिळण्यापूर्वी ते महाराजांच्या दरबारांत बसत व शिष्टाचार घेत असत. त्यांच्यावर आपल्या गैरहजेरीत राज्यकारभार सोपविल्यावर महादजी यमाजी नावाच्या कारकुनांची नेमणूक सालींना १०० होनावर करून त्यांस संभाजी महाराजांकडे लावून दिले. युवराज संभाजीराजांवर आपल्या अनुपस्थितीत राज्याचा कारभार सोपविल्यानंतर युवराज संभाजीराजे रायगडी बसून महाराजांच्या अनुपस्थितीत राज्यकारभार पाहू लागले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२६ जानेवारी इ.स.१६७४* *"शहजादा अकबर" आजच्या दिवशी आसदखानसोबत काबुलच्या स्वारीवर गेला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२६ जानेवारी इ.स.१६८०* *१६७६ मध्ये जंजिऱ्यात आणखी एक क्रांती झाली सिद्दी संबूळ आणि सिद्दी कासिम यांच्यामध्ये संघर्ष होऊन सिद्दी कासिमने आरमाराची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. तेव्हा सिद्दी संबूळने छत्रपती शिवाजी महाराजांकडे मदतीची याचना केली. जंजिऱ्यावर अधिपत्य निर्माण करण्याची ही एक सुवर्णसंधी चालून आली होती. परंतु सिद्दी कासिम याला मुघल आणि इंग्रज यांच्याकडून सतत कुमक मिळत असल्यामुळे त्यांनी सिद्दी संबूळला दाद दिली नाही. अशाप्रकारे सिद्दी आणि मराठे यांच्यात संघर्ष चालू असताना खांदेरी-उंदेरी प्रकरण उद्भवले. १६७९ मध्ये खांदेरी बेटावर तटबंदी बांधण्याचे काम शिवाजी महाराजांनी सुरू केले. तेव्हा सिद्दी कासीमने जानेवारी १६८० मध्ये खांदेरीजवळ असलेले उंदेरी बेट ताब्यात घेऊन शिवाजी महाराजांना विरोध सुरू केला. मराठ्यांचा आरमार प्रमुख दौलतखान यांनी २६ जानेवारी १६८० रोजी २००० फौजेनिशी उंदेरीवर हल्ला केला. परंतु सिद्दी कासीमने एवढा जबरदस्त प्रतिकार केला की दौलतखान यांना माघार घ्यावी लागली. उंदेरी सिद्दींच्याच ताब्यात राहिल्यामुळे खांदेरीवर नियंत्रण ठेवणे त्यांना सोपे झाले. अशा प्रकारे सिद्दी विरुद्ध संग्रामात मराठ्यांना माघार घ्यावी लागली. सिद्दींना यश येण्याचे प्रमुख कारण म्हणजे मुघल आणि इंग्रज यांच्याकडून मिळणारी मदत हेच होय. विशेष म्हणजे सिद्दींनी आरमारी सामर्थ्याप्रमाणे तोफखान्याचे सामर्थ्यही मोठे वाढविले होते. आधुनिक पद्धतीच्या लांब पल्ल्याच्या तोफा सिद्दीकडे होत्या त्यामुळे मराठ्यांना वारंवार माघार घ्यावी लागली सिद्दी मराठा संघर्ष पुढेही चालूच राहिला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२६ जानेवारी इ.स.१७४०* *दि. २६ जानेवारी १७४० या दिवशी नानासाहेबांनी मस्तानीला पर्वतीच्या बागेत कैद केले. नानासाहेबांनी लगेच चिमाजीआप्पांना घडलेले सारे पत्राद्वारे कळवले आहे. नाना लिहितात, "मस्तानीस बागास बोलावून कैद केली. कोणी हत्यार धरिले नाही. रात्री घरास घेऊन जाऊ. मग घरी ठेवावेसे जाले तर स्वामींचे (आप्पांचे) लिहिल्याप्रमाणे बंद करून ठेवू अथवा चोरून दहा माणसे बरोबर देऊन कोथळागड (घनगड) येथे भलते जागा पाठवू. स्वामींनी राऊंचा जीव जतन करावा..." यानंतर मात्र नानासाहेबांनी मस्तानीला शनिवारवाड्यातल्या तिच्याच महालात नेऊन भवताली चौक्या बसविल्या. नंतर चिमाजीआप्पा पैठण येथे बाजीरावांपाशी गेले. यावेळेस बाजीराव आणि चिमाजीआप्पा यांच्यात मस्तानीबद्दल अनेक वाद झाले असावेत, असे वाटते. आप्पांनी राऊंना समजावण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण बाजीरावांना ते काही पटले नाही. शेवटी नाईलाजाने बाजीरावांची तब्येत जपण्यासाठी चिमाजीआप्पांनी मस्तानीला कैदेतून सोडून बाजीरावांकडे रवानगी करण्याचे ठरवले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२६ जानेवारी इ.स.१८३१* *क्रांतिवीर संगोळी रायन्ना या स्वातंत्र्य योद्ध्याचा जन्मदिवस १५ ऑगस्ट पुढे जाऊन भारताचा स्वातंत्र्यदिवस ठरावा आणि प्रजेच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या या वीराला ज्या दिवशी फाशी देण्यात आली तो दिवस २६ जानेवारी पुढे जाऊन भारताचा प्रजासत्ताक दिन ठरावा यासारखा एकमेव्द्वितीय योगायोग म्हणजे जणू भारत-भारतीने आपल्या वीरपुत्रास देलेली हि आदरांजलीच म्हणावी लागेल...* *क्रांतिवीर संगोळी रायन्ना कित्तूर साम्राज्याचे सरसेनापती ब्रिटीशांविरोधात सलग-सतत सहा वर्षे लढून, त्यांना 'सळो की पळो' करून सोडणारे आणि वेळोवेळी संकटात आणणारे एक महान क्रांतिकारक तलवारीच्या टोकावर इंग्रजांना आव्हान देणारा योद्धा स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देऊन, फासावर जाणारे स्वातंत्र्यवीर मरण समोर असताना देखील पुन्हा जन्म घेऊन इंग्रजांना भारतातून बाहेर काढण्याची इच्छा व्यक्त करणारे भारतमातेचे सच्चे वीरपुत्र याच व्यक्तिमत्वा बद्दल घेतलेला हा आढावा..* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) #🙏शिवदिनविशेष📜 #🙏 शिवराय स्टेटस #🚩छत्रपति शिवाजी महाराज #📜इतिहास शिवरायांचा #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल
❤🚩शिवभक्त🚩❤
2.6K जणांनी पाहिले
⛳स्वराज्यभूमी ⛳ *महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *२५ जानेवारी इ.स.१६५६* *महंमद सुलतान हैदराबादमधील हुसेन सागर तलावाजवळ पोहोचला. त्याने हैदराबाद लुटायला सुरुवात केली. पाठोपाठ औरंगजेब ६ फेब्रुवारीला हैदराबादला पोहोचला. पण गोवळकोंड्याला वेढा घालता येईल इतके सैन्य त्याच्याकडे नव्हते. त्याने शहाजहानकडून अधिक कूमक मागवली. कुत्बशहाने दाराशी संधान बांधून शहाजहानकडे तहाची मागणी केली. दाराने शहाजहानचे जान फुंकले. शहाजहानने सैन्य मागे घेण्यास सांगितले. पण औरंगजेबाने त्याकडे लक्ष दिले नाही. शहाजहानला या दरम्यान लिहीलेल्या एका पत्रात औरंगजेब हैदराबादच्या परीसराचे वर्णन करतो - "इथल्या सृष्टीसौंदर्याबाबत काय आणि किती लिहू? मला जागोजागी मोठे तलाव, गोड्या पाण्याचे झरे, भरपूर शेते, दिसत आहेत. असा समृद्ध प्रदेश त्या नादानांच्या हाती पडलाय तो आपण जिंकून घ्यायला हवा."* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२५ जानेवारी इ.स.१६५८* *मुहम्मद आदिलशहाच्या गंभीर आजारपणामुळे कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद १६४६ पासून विजापूरातच होता. त्यास मुहम्मद आदिलशहाने बोलावून घेतले होते. आदिलशहा ४ नोव्हेंबर १६५६ रोजी मरण पावला. त्याचे तक्तावर वारस न बसविता आपल्या हातात सत्ता राखण्यासाठी बेगम साहेबिणीने अली नावाच्या विजापूरच्या १८ वर्षांच्या मुलास गादीवर बसविले. हा शाही घराण्यातील अस्सल राजपुत्र नाही अशा सबबीवर औरंगजेबाने विजापूरला वेढा घातला. आणि दोन्ही पक्षांनी छत्रपती शिवाजी राजांकडे मदत मागितली. शिवाजी महाराजांना या प्रसंगात विजापूरचा पक्ष घेऊन आपले राज्य अधिक वाढवावे हे फायदेशीर आहे असे जाणवले. पण सप्टेंबर १६५७ मध्ये विजापूर सरकारने औरंगजेबाशी शांतता करार केला. छत्रपती शिवाजी राजांनी मोंगलाशी सलोखा प्रस्थापित करण्याचा निर्णय घेतला. २५ जानेवारी १६५८ रोजी शिवाजीराजांनी आपला प्रतिनिधी म्हणून सोनाजी विश्वनाथ यांस औरंगजेबाच्या भेटीसाठी बेदरला धाडले. जुनी निजामशाही आणि आदिलशाही यांच्या ताब्यांतील कोकणपट्टी आपल्याला मिळावी अशी शिवाजीराजे यांनी आपल्या वकीलाकरवी औरंगजेबास विनंती केली. धूर्त औरंगजेबाने राजांचा डाव ओळखला व वकीलास सांगितले की, “हा मामला महत्त्वाचा असल्यामुळे खुद्द शिवाजीराजे यांनीच मला भेटावे हे बरे” राजे ओरंगजेबास भेटण्याच्या फंदात पडले नाहीत. त्यांनी औरंगजेबाच्या रागाची पर्वा न करता मोगलांच्या ताब्यांतील जुन्नर व अहमदनगर ही शहरे जिंकून घेतली. इतक्यात औरंगजेबास शहाजहान बादशहा आजारी असल्याचे समजले तेव्हा दिल्ली तक्त बळकावण्यासाठी त्याने घाईने उत्तरेची वाट धरली. वाटेत असता आपल्या सेना अधिकाऱ्यांस पत्रे लिहून शिवाजीराजांच्या पारिपत्यासाठी हालचाली करण्याचा आदेश दिला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२५ जानेवारी इ.स.१६६४* *सुरतेच्या या लुटीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रचंड दरारा निर्माण झाला. सुरतेच्या लुटीचे खरे फलित हेच आहे. लूट किती मिळाली, याचे आकडे भिन्न आहेत; परंतु राजांचा दरारा काय होता त्याचे चित्र इंग्रजी पत्रव्यवहारात मिळते. 'Surat trembles at the name obsevagee.' हे वाक्य बर्‍याच वेळा त्या पत्रव्यवहारात वाचावयास मिळते. 'छत्रपती शिवाजीराजांचे नाव काढताच सुरत भीतीने थरथरावयास लागते.' 'त्या' दरार्‍याचे अचूक वर्णन आहे. २५ जानेवारी १६६४ रोजी सुरतेच्या इंग्रजी वखारीतील एक फॅक्टर हेन्री गॅरी याने अर्ल ऑफ मार्लबरोला लिहिलेले एक पत्र फार बोलके आहे. त्यात गॅरी लिहितो, ''..* *Savagee the grand rebell to the king of Deccan came here the 6th of this instant with a considerable army, entering the town before the governor scarce had any notice of his aproche. He made a great destruction of houses by fire, upwards of 3000, and carried a vast treasure away with him. It is credibly reported near unto ten million of ruppees.''* *मुघलांनी सुरतेच्या या लुटीची हाय खाल्ली. ही बातमी ऐकून अनेक जण दिड्मूढ झाले. औरंगजेब सुन्न झाला. पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच यांनी मोठमोठी बातमीपत्रे आपापल्या राजांकडे पाठवून दिली.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२५ जानेवारी इ.स.१६६५* *छत्रपती शिवाजी महाराजांचे राजनैतिक सल्लागार व विश्वासू सेवक सोनोपंत तथा सोनोजी विश्वनाथ डबीर यांचे निधन.सोनोपंत डबीर म्हणजे शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळीतील एक मौल्यवान रत्न. मराठा साम्राज्याचे पेशवे (पंतप्रधान) श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील शंकर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ साहेब व सोनोपंत डबीर यांची सुवर्णतुला केली होती. सोनोपंत डबीर यांचे छत्रपति शिवाजी महाराज यांना सुनावलेले खड़े बोल -जेव्हा शहाजी राजे आदिलशाहकड़े बंदी होते त्यांच्या सुटकेसाठी आदिलशाहने सिंहगड किल्ला परत मागितला होता तेव्हा छत्रपति शिवाजी राजे आपल्या पित्यावर रुष्ट झाले होते अणि तेव्हा सोनोपंत डबीर यांनी त्यांचा रुसवा काढताना ""पराक्रमी राजलाच पृथ्वी वश होते , राजे एक सिंहगड गेला म्हणुन तुम्ही पित्यावर रागावता, त्यापेक्षा एक गडाच्या बदल्यात आदिलशाहने शाहजी राजंसारख्या सिंहाला मुक्त केले आहे राजे... आता तुम्ही पृथ्वीवर राज्य करा.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२५ जानेवारी इ.स.१६८४* *व्हिसेरेईने गोव्याच्या दयनीय अवस्थेचे वर्णन पोर्तुगालच्या राजास लिहीलेले पत्राचे वर्णन!* *आमच्या राजाची अवस्था शोचनीय आहे. मोगलांमुळे आमचे रक्षण झाले. परंतु मोगलांनी हे राज्य घेण्याचे ठरविले तर त्यांची अवस्था वाईट होईल आणि मोगल निघून गेले तरी देखील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वारीचा धोका पुनः आहेच." आमच्या आरमारात माणसे नाहीत. विश्वासू आधिकारी नाहीत. किल्ले निरुपयोगी झाले आहे. तंत्रज्ञाची, गोलंदाजांची आणि दारुगोळ्याची कमतरता आहे. द्रव्याची टंचाई तर पाचविलाच पुजलेली आहे. हे राज्य आमच्या हातून निसटण्याची भिती आहे. "* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२५ जानेवारी इ.स.१६८४* *(माघ वद्य ४, चतुर्थी शके १६०५, रुधिरोद्रारी संवत्सर, वार शुक्रवार)* *पोर्तुगिजांची शोचनीय अवस्थेबद्दल कोंट द आल्वोरचे पत्र!* *पोर्तुगीजांची शोचनीय अवस्था झाली. बारदेशाच्या हल्ल्यात मराठ्यांनी अनेक परगण्यांवर हल्ला केला. मराठे इरेसच पेटले होते. इथला दैनंदिन वस्तूंचा पुरवठा मराठ्यांनी बंद केला. त्यामुळे पोर्तुगीजांची चांगलीच कोंडी झाली. मराठ्यांनी धर्मांधतेचा कळस केलेल्या पोर्तुगिजांना धडा शिकविण्यासाठी पोर्तुगीजांचे चर्च पाडून टाकले. चर्च मधील सर्व मुर्त्या फोडून बऱ्याच लोकांना कैद केले. 'छत्रपती संभाजी महाराजांचे सैन्य पळपुटे असून छत्रपती संभाजिराजे सर्व सैन्यानिशी जरी गोव्यात आले तरी आपण गोव्याचे रक्षण करू' अशी फुशारकी मारणारा 'कोंट- द- आल्वारे' याची अत्यंत शोचनीय अवस्था मराठी आक्रमनाणे केली.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२५ जानेवारी इ.स.१७००* *१६८१ नंतर १७०७ म्हणजे मृत्यूपर्यंत औरंगजेब दक्षिणेतच राहिल्यामुळे उत्तरेकडील जमा होणा-या महसुलाचा पैसा विजापूर, सोलापूर, हैदराबाद, कोल्हापूर परिसरात जाताना तो परंड्याहून व्यवस्था लावल्याशिवाय जात नव्हता. असेच एकदा परंड्याहून निघालेला खजिना सेनापती धनाजी जाधवाने २५ जानेवारी १७०० मध्ये परंड्याजवळील उंदरगाव या ठिकाणी लुटून फस्त केला होता. धनाजीने वारंवार परंडा परिसरात धुमाकूळ घातल्याची नोंद सापडते. एवढेच नाही तर शिवरायांचे कनिष्ठ चिरंजीव छत्रपती राजारामांनीही परंडा किल्ल्याच्या परिसरात धुमाकूळ घातल्याने मराठ्यांच्या छत्रपतींचे पाय परंड्याला लागले म्हणायला हरकत नाही.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२५ जानेवारी इ.स.१७३७* *मडगाव शहर मराठ्यांच्या हाती! मंडगाव शहर मराठ्यांच्या हाती पडले तेथेच त्यांनी आपल्या सैन्याचा मुख्य तळ केला. मडगावची तटबंदी मराठ्यांनी काबीज करताच कुकल्ली येथील ठाण्याचा देशी अधिकारी कॅप्टन तुकू नाईक हा आपल्या सैन्यासह मराठ्यांना येऊन मिळाला. ह्यावरून गोव्यातील हिंदू पोर्तुगिजांच्या छळाने किती संत्रस्त झाले होते ते सिद्ध होते.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🙏शिवदिनविशेष📜 #🙏 शिवराय स्टेटस #🚩छत्रपति शिवाजी महाराज #📜इतिहास शिवरायांचा #🚩जय भवानी जय शिवाजी🚩
❤🚩शिवभक्त🚩❤
3.3K जणांनी पाहिले
⛳स्वराज्यभूमी ⛳ *महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *२२ जानेवारी इ.स.१६७७* *छत्रपती शिवरायानी हुसेनखानाचा पराभव केला.* *हुसेनखान मियाना, पठाण, जणू दुसरा बहलोलखान अशी त्याची ख्याती. वृत्तीने कजाख, मोठा लढवय्या. जुलमी अधिकारी - मियाना बंधूंच्या अमलाने गांजलेल्या कोप्पळ प्रांतातील रयतेची हाक छत्रपती शिवरायांच्या कानी आली, सरनोबत हंबीरराव मोहित्यांच्या हाताखाली महाराजांनी फौज रवाना केली. येल्बुर्गा जवळ मोठी लढाई झाली, मराठ्यांच्या तुलनेत पठाणीसैन्य संख्येने जास्त असूनही मराठ्यांनी निकराचे युद्ध केले, 'सहा प्रहरात कुल फौज बुडविली' (सभासद बखर), हंबीरराव,धनाजी जाधव,नागोजी जेधे(कान्होजी जेध्यांचे नातू, सर्जेराव जेध्यांचे मुल) आदींनी पराक्रमाची शर्थ केली. लढाईचे पारडे फिरले, हुसेनखान पळून जाऊ लागला, तेव्हा तरण्याबांड नागोजी जेध्यानी आपला घोडा पठाणाच्या हत्तीवर घातला, हत्तीची सोंड कापून, हत्ती जेर केला, घाबरून हुसेन्खानाने सपकन बाण सोडला, बाण नागोजींच्या कपाळातून घुसून हनुवटी फोडून बाहेर आला. बाण काढताच नागोजीनेचे प्राण पंचत्वात विलीन झाले. त्यांची पत्नी गोदुबाई जेध्यांच्या कारी गावी सती गेली. मियाना बंधू कैद झाले. नागोजी जेध्यांच्या हौतात्म्याची बातमी ऐकून महाराज कारी गावी जेध्यांच्या सांत्वनास गेले. प्रतिवर्षी एक शेर सोने देण्याची मोईन केली.(जेधे करीना)* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२२ जानेवारी इ.स.१६८२* *संत रामदासस्वामी यांची समाधि !* *शके १६०३ च्या माघ व. ९ रोजी आपल्या अंगची भगवद्भक्ति व ईश्वरोपासनेचे तेज यांच्या जोरावर महाराष्ट्राला प्रपंचविज्ञान शिकवून चेतना देणारे विख्यात संत श्रीसमर्थ रामदास स्वामी यांनी समाधि घेतली.* *छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधानाचे वर्तमान समजतांच 'श्रीची इच्छा ' म्हणून रामदास आपल्या खोलीत गेले. त्यानी अन्न खाणे सोडून दिले. फक्त दुधावर निर्वाह करून बाहेरचे हिंडणे -फिरणे हि अंद केले. शंभूराजांनी केलेल्या अनन्वित कृत्यांची हकीगत स्वामींच्या कानावर आली. त्यांनी शंभूराजेंना पत्र लिहून शिवरायाचें् आठवावे रूप । शिवरायाचा आठवावा प्रताप । शिवरायाचा आठवावा साक्षेप । भूमंडळी ॥" असा उपदेश केला.* *दिवसेदिवस त्यांची प्रकृति खालावत होती. माघ व ९ ला श्रीराममूर्तीस साष्टांग नमस्कार घालून स्वामी मूर्तिसम्मुख भूमीवर बसले. शेवटची वेळ येऊन ठेपली होती. समर्थांनी उपदेश केला* *" माझी काया गेली खरे । परि मी आहें जगदाकरें ।* *ऐका स्वहित उत्तरे | सांगेन तीं ।* *नका करू खटपट | पहा माझा ग्रंथ नीट* *तेण सायुज्याची वाट । ठार्थी पडे ॥ "* *शेवटी स्वामींनी 'हर हर' शब्द एकवीस वेळा उच्चारून 'श्रीराम' या शब्दा- बरोबर अवतार समाप्त केला. रामदासांचा जन्म शके १५३० मध्ये रामजन्माच्या दिवशी झाला. हे जांब गावचे कुलकर्णी सूर्याजीपंत ठोसर यांचे चिरंजीव. प्रथमपासूनच रामदास विरक्त होते. लग्नाच्या वेळी हे घरातून पळून गेले. नाशिक जवळील टाकळीस बारा वर्षे यांनी, खडतर, अशी तपश्चर्या केली. आणि पुढील बारा वर्षे सबंध हिंदुस्थानांत भ्रमण करून देशस्थिति स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली. आणि दुःखाने विव्हळ होऊन कृष्णातीरी लोकजागृति व धर्मप्रसार करणाऱ्या आपल्या सांप्रदायाची उभारणी केली.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२२ जानेवारी इ.स.१६८८* *राजश्री संतोजीराजे भोसले* *दक्षिण दिग्वीजयाच्यावेळी राजश्री संतोजीराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांना सामील झाले. व्यंकोजीराजांना पाठविलेल्या पत्रात चिरंजीव संतोजीराजे असा केला आहे. जेस्विटच्या वृत्तांतात संतोजीराजे एक शुर सेनापती होता असा उल्लेख आहे. व्यंकोजीराजांसोबत मदुरेचे सैन्यसुद्धा संतोजीराजे, रघुनाथपंत हणमंते आणि हंबीरराव मोहिते यांच्याशी युद्ध करण्यास जिंजीत आले. व्यंकोजीराजांच्या सैन्याचा पराभाव होताच संतोजीराजांसोबत मदुरानयकानेही तंजावरला वेढा दिला. संतोजीराजांचा पहिला बेत होता की मदुरानायकाकडून भरमसाट पैसा घेऊन तंजावरचा किल्ला आणि राज्य मदुरानायकाच्या स्वाधीन करावे. परंतु रघुनाथपंतांच्या सल्ल्याने आणि शिवाजी महाराजांच्या पत्राने व्यंकोजीराजांच्या राज्याचा नाश करू नये अशी सूचना मिळाल्यावर संतोजीराजांनी मदुरानायका सोबतचा शब्द मोडला आणि जिंजीला परत निघून गेले. इंग्रजांच्या सेंट जॉर्जवखारीतून सुरतला पाठवलेल्या पत्रात संतोजीराजांच्या हाताखाली ६००० घोडदळ & ६००० पायदळ होते. तर व्यंकोजीराजांचे ४००० घोडदळ आणि १०००० पायदळ होते. यात व्यंकोजीराजांच्या घोडदळाने कमाल केल्याचा उल्लेख आहे. पण त्यांचे मुसलमानी पायदळ सैरावैरा पळत सुटले. श्री. गजानन मेहेंदळेंच्या श्रीराजा शिवछत्रपती या ग्रंथात राजश्री संतोजीराजे यांच्या मातोश्री महाराणी नरसाबाईंची तुरळक माहिती आहे. सभासद बखरीत नरसाबाईंचा उल्लेख एक उपस्त्री म्हणून केला आहे. नरसाबाईंनी २२ जानेवारी १६८८ ला बाळंभट उपाध्ये याला लिहून दिलेले एक दानपत्र आहे. त्रिणामल म्हणजे तिरुवन्नमलै प्रांतातील तोरपाड उर्फ नरसांबापूर नावाचे गाव नरसाबाईंनी दान दिले आहे. यात नरसाबाईंनी स्वत:चा उल्लेख “माहाराज राजेश्री शहाजीराजे भोसले यांची स्त्री, राजेश्री संतोजीराजियांची माता, राजेश्री नरसाबाई” असा केला आहे. जिंजी प्रांतातील वीरनम येथुन आंद्रे फायर याने पॉल ऑलिव्हा याला इ.स.१६७८ मध्ये पाठविलेल्या एका पत्रात ‘संताजी हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भावांपैकी एक भाऊ’ असल्याचे म्हटले आहे.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२२ जानेवारी इ.स.१६९३* *जुल्फिकार खानचा पराभव* *स्वातंत्र्य लढा संताजी-धनाजीने बेळगाव-धारवाड करत कर्नाटक प्रांतात नेला. नंतर ह्यांनी जिंजीकडे आपला मोर्चा वळवला. जिंजी किल्ल्यास जुल्फिकार खान, त्याचा बाप असद खान, आणि शहजादा कामबक्ष वेढा घालून बसले होते. संताजी साधारण १५ हजाराचे घोडदळ घेऊन, तर धनाजी साधारण १० हजाराचे घोडदळ घेऊन जिंजीस थडकले. प्रथम धनाजी आपली फौज घेऊन सामोरे आले आणि मोगली सैन्यावर हल्ला केला. मागून येणाऱ्या संताजीस अलिमर्दाखान आडवा आला. अलिमर्दाखान हा जिंजीच्या मोगली फौजेला रसद पुरवीत असे. त्याची रसद मारीत संताजी पुढे निघून गेले. (संदर्भ- जेधे शकावली) या लढाईची फ्रेंच गव्हर्नर मार्टिन याने आपल्या डायरीत नोंद केली आहे. संताजी आणि धनाजी यांच्या या जोशासमोर मोगल सैन्याची दाणादाण उडाली. जिंजीच्या मोगली सैन्याचीतर वाताहत झाली. त्यांची रसद तोडली गेली, अफवांचे पीक उठवले जाऊ लागले होते. त्यात किल्ल्यातून मोगली फौजेवर हल्ले होऊ लागले. स्वतः जुल्फिकार खान रसद आण्यास बाहेर पडला असता त्याचा सामना संताजी बरोबर झाला. जुल्फिकार खान कसाबसा आपला जीव वाचवत परत छावणीत आला. जुल्फिकार खानने संताजीकडे वाट मागितली आणि जिंजीचा वेढा उठवण्याचा वायदा केला. २२ जानेवारी १६९३ रोजी हुकमाची वाट न पाहता मोगली सैन्य जिंजी सोडून वांदीवाश येथे निघून गेले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२२ जानेवारी इ.स.१७३२* *अखेर वाड्यात राहायला जाण्याचा मुहूर्त ठरला. दि. २२ जानेवारी १७३२, रथसप्तमीच्या मुहूर्तावर शनिवारवाड्याची वास्तुशांत थाटात करण्यात आली. वास्तुशांतीकरता खुद्द श्रीमंत बाजीराव पेशवे साताऱ्यास छत्रपती शाहूमहाराजांना आमंत्रण द्यायला गेले होते. पण काही कामानिमित्त महाराज येऊ शकले नाहीत. साताऱ्याहून अष्टप्रधानांपैकी काहीजण आले होते. नव्या हवेलीचे नाव काय असावे, याबाबत काही निर्णय होत नव्हता. शेवटी बाजीरावसाहेबांनीच नाव सुचवले. वाड्याची पाहणी करण्यात आली. तो शनिवार होता. वाड्याची पायाभरणी झाली, तोही शनिवार होता. आज (२२ जानेवारी १७३२) वाड्याची वास्तुशांत व गृहप्रवेश होतोय, तोही शनिवारच. म्हणून वाड्याचे नाव ठेवले 'शनिवारवाडा'. वाडा बांधताना ज्या लोकांच्या जमिनी विकत घेतल्या होत्या, त्यांना व इतरांनाही बाजीरावांनी वाड्याच्या आसपास जागा दिल्या व वस्ती करण्यास परवानगी दिली. ही वस्ती म्हणजेच पुणे कसबाच्या शेजारची 'शनिवार पेठ'. वास्तुशांतीनिमित्ते मोठ्याप्रमाणावर अन्नदान करण्यात आले. पेशव्यांनी सोहळा मोठा थाटाचा केला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२२ जानेवारी इ.स.१७३९* *मराठ्यांनी शिरगावचा किल्ला जिंकला.* *नोव्हेंबर १७३७ मध्ये मराठ्यांनी पोर्तुगिजांच्या ताब्यातील या किल्ल्याला वेढा घातला. महिना झाला तरी किल्ला सर होत नव्हता म्हणून मराठ्यांनी डिसेंबर अखेर वेढा उठवला. जानेवारी १७३९ रोजी मराठ्यांनी पुन्हा शिरगावला वेढा घातला व दिनांक २२ जानेवारी १७३९ रोजी गड मराठ्यांच्या ताब्यात आला. १७७२ मध्ये मराठ्यांनी किल्ल्याची दुरुस्ती केली. पुढे १८१८ मध्ये शिरगावचा ताबा इंग्रजांकडे गेला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२२ जानेवारी इ.स.१७७९* *इष्टुर फांकडा -* *मराठीशाहीमधील तीन फांकडे म्हणजे कोन्हेरराव (एकबोटे), मानाजीराव (शिंदे) व इष्टुर (जेम्स स्टुअर्ट) हे होत. क्याप्टन स्टुअर्टला मराठे लोक त्याच्या शौर्यामुळे मोठया कौतुकाने 'इष्टुर फांकडा असे म्हणत. श्रीमंत रघुनाथराव दादासाहेब पेशवे हे पुण्याची पेशव्यांची गादी मिळविण्याकरिता मुंबईच्या इंग्रजांस जाऊन मिळाले व त्यांचे सैन्य मदतीस घेऊन पुणे दरबाराच्या सैन्याशी लढण्याकरितां इ.स. १७७८ मध्ये बोरघांटामध्ये आले. या युध्दप्रसंगांमध्ये इंग्रजांच्या वतीने जे रणशूर योध्दे प्रसिध्दीस आले, त्यांपैकी क्याप्टन स्टुअर्ट हा एक होय. ह्यावेळी सर्व इंग्रज सैन्याचे अधिपत्य कर्नल इगर्टन हयाच्याकडे असून, त्याने आपल्या सैन्याच्या मुख्य दोन तुकडया केल्या होत्या. व त्यांचे अधिपत्य लेप्टनंट-कर्नल कॉकबर्न व लेप्टनंट-कर्नल के हया दोन नामांकित सेनापतीस दिले होते. हयाशिवाय तलासासाठी पुढे चाल करुन जाणारी बिनीच्या सैन्याची एक वेगळी तुकडी केली होती. तिचे अधिपत्य क्याप्टन स्टुअर्ट हयाजकडे होते. पुणे दरबारच्या सैन्याच्या वेगवेगळया तुकडया केल्या असून त्यांचे सेनाधिपत्य हरिपंत फडके, रामचंद्र गणेश, बाजीपंत बर्वे, तुकोजी होळकर, महादजी शिंदे, वगैरे नामांकित योध्दयांकडे होते. हे सर्व सरदार आपापल्या सैन्यानिशी तळेगांवापासून बोरघाटापर्यंत माऱ्याच्या जागा रोखून युध्दास सिध्द होते. क्याप्टन जेम्स स्टुअर्ट हा योध्दा फार पटाईत असून, त्यास सर्व रस्त्यांची व घांटनाक्यांची पूर्ण माहिती होती. तो आपल्याबरोबर ग्रेनेडियर शिपायांची एक पलटण व थोडासा तोफखाना घेऊन ता. २२ नोव्हेंबर रोजी मुंबईहून निघाला व आपटे नदीपर्यंत येऊन तेथून दुसरा मार्ग घेऊनब रघांट चढून वर येऊन पोहोचला. ता.२५ रोजी त्याने खंडाळयाच्या उंच टेकडीवर आपले निशाण लाविले.* *क्याप्टन स्टुअर्ट हयाने खंडाळयास बराच मुक्काम केला. मुंबईचे दुसरे सैन्य व तोफखाना ता. २३ दिसेंबर इ.स. १७७८ रोजी पनवेलच्या मार्गाने घांट चढून एकदां खंडाळयास येऊन पोहोचला. इकडे मराठयांचे सैन्य व तोफखाना शत्रूंशी तोड देण्याकरिता खंडाळयाच्या आजूबाजूस येऊन माऱ्याच्या जागा रोखून युध्दास सिध्द झाला. मराठयांच्या तोफखान्याचे मुख्य सेनापति भिवराव पानसे यांनी तोफा व बाण हयांचा प्रतिपक्षावर दररोज बर्षाव चालविला. मराठयांच्या सैन्यामध्ये नरोन्हा नांवाचा एक फिरंगी गोलदाज होता. तो तोफा डागण्यामध्ये अतिशय कुशल होता. त्याने शत्रूंवर तोफांचा व बाणांचा असा मारा केला की, प्रत्येक खेपेस शत्रूंचा नामांकित शिपाई नेमका गोळयाखाली सापडत असे. अशा प्रकारची निकराची लढाई चालू असता, क्याप्टन स्टुअर्ट हयाने आपल्या पराक्रमाची शर्थ करुन व शत्रूंच्या तोफांचा भडिमार सहन करुन, कारल्यापर्यंत आपली फौज नेऊन पोहोचविली. त्या योगाने मराठे सेनापतीस त्याच्या शौर्याचा प्रभाव फार अलौकिक वाटून त्यांनी त्याची फार वाहवा केली; व त्यास कोतुकाने “इष्टुर फांकडा” असे अभिधान दिले. मराठयांच्या सैन्यामध्ये इंग्रजी फौजतील ज्या गुप्त बातम्या येत असत. त्यांमध्ये इष्टुर फांकडयाच्या शौर्याबद्दल, धैर्याबद्दल आणि युध्दचातुर्याबद्दल फार प्रशंसनीय उल्लेख असत. त्यामुळे मराठयांच्या सेनापतीसहि इष्टुर फांकडयाशी शर्थीचे युध्द करुन त्यास आपले रणशौर्य दाखविण्याचे विशेष स्फुरण चढले. हया निकराच्या चकमकीमध्ये इष्टुर फांकडयास तोफेचा गोळा लागून तो ता. ४ जानेवारी इ.स.१७७९ रोजी मरण पावला. हया प्रसंगी मराठी सैन्याने “इष्टुर फांकडया शाबास” अशी आनंदचित्ताने शाबासकी दिली.* *इष्टुर फांकडयाच्या मृत्यूचे वर्तमान तत्कालीन अस्सल मराठी पत्रांत आढळून येते. त्यामध्ये इष्टुर फांकडयाच्या नावापुढे 'लढाव म्हणजे 'लढवय्या असे विशेषण मराठयांनी लाविलेले दिसून येते. परशुरामभाऊ पटवर्धनांचा कारकून शिवाजी बाबाजी हयाने ता. २२ जानेवारी इ.स. १७७९ च्या पत्रामध्ये पुढील उध्दार काढले आहेत. “मुख्यत्वे श्रीमंतांचे पुण्य विचित्र ? अवतारी पुरुषा त्यासारखे योग घडले. ज्या मॉष्टीनाने मसलत केली, तो घाटावर येताच, समाधान नाही म्हणोन मुंबईस गेला; तेव्हा मृत्यु पावला. इष्टुर फांकडा लढाव, इकडील फौजेचा, कारल्याच्या मुक्कामी गोळा लागून ठार जाहला. कर्णेल के म्हणोन होता, त्यास बाण लागून जेर जाहला. आकारिक (कर्ते) होते त्यांची अशी अवस्था जाहली... .. सारांश, श्रीमंतांचा प्रताप हे खरे* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏 शिवराय स्टेटस
❤🚩शिवभक्त🚩❤
5.3K जणांनी पाहिले
⛳स्वराज्यभूमी ⛳ *महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *२० जानेवारी इ.स.१६६३* *औरंगजेबचा वकील शेख मुहम्मद गोव्यात दाखल झाला. मुघलांच्या स्वराज्यावरील संभाव्य आक्रमणात पोर्तुगीजांनी सामील व्हावे आणि जाणाऱ्या रसदेला उपद्रव देऊ नये या अटी फिरांग्यांपुढे मांडल्या. एकीकडे बलाढ्य औरंगजेब आणि दुसरीकडे पराक्रमी छत्रपती शंभूराजे अशा कात्रीत सापडलेल्या पोर्तुगीज व्हाइसरॉयने बादशहाच्या अटी मान्य केल्या. आणि वरकरणी मात्र राजांशी मैत्रीचे नाटक सुरु ठेवले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२० जानेवारी इ.स.१६७४* *दीलेरखानाने कोकणात उतरण्याचा प्रयत्न केला पण मराठ्यांनी तो उधळून लावला. हा प्रकार नेमका कुठल्या घाटात घडला याची माहिती उपलब्ध नाही. यात दीलेरखानाचे १००० सैनिक मारले गेले तर सुमारे ४०० ते ५०० मराठेही या लढाईत धारातिर्थी पडले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२० जानेवारी इ.स.१६७५* *(माघ शुद्ध ४, चतुर्थी, शके १५९६, संवत्सर आनंद, वार बुधवार)* *महाराजांनी डुमगावची वखार लुटली!* *महाराजांनी डुमगावची वखार पुर्णपणे लुटली. महाराजांबरोबर तह करून वखार वाचवून घ्यावी, असा सल्ला जवळच्या माणसांनी सुचवूनही इंग्रज सेनापतीने तो धुडकावून लावला आणि नंतर त्याचा परिणाम काय झाला हे कंपनी सरकारलाही कळले. मात्र महाराजांनी डुमगावच्या वखारीला लुटून इंग्रजांच्या वाढत्या हस्तक्षेपाला चाप लावला हे निश्चित!* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२० जानेवारी इ.स.१६८३* *(पौष शुद्ध ५, पंचमी, शके १६०४, संवत्सर दुदुंभी, वार रविवार)* *औरंगजेबाचा वकील गोव्यात!* *औरंगजेबाचा वकील शेख मोहम्मद औरंगजेबाचे पत्र घेऊन गोव्यात आला. या पत्रात औरंगजेबाने अनेक मागण्या केल्या असून अप्रत्यक्षपणे गोव्याच्या विजरईस छत्रपती संभाजी महाराजांच्या विरुद्ध युद्ध पुकारण्यासाठी दबाव टाकला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२० जानेवारी इ.स.१६८५* *छत्रपती संभाजी महाराजांचे रंगाजी लक्ष्मीधर व सिधोजी फर्जंद हे वकील गोव्यास डिसेंबर इ.स.१६८४ मध्ये गेले. रंगाजी लक्ष्मीधर यांस पोर्तुगीज भाषा येत होती. सिधोजीस पोर्तुगीज भाषा येत नव्हती. छत्रपती संभाजी महाराजांच्या वरील वकीलांची उतरण्याची सोय गोवे शहरात "मोती'च्या पायाजवळ केली होती. २९ डिसेंबर इ.स.१६८४ तेथून त्यांनी विजरईला पत्रे लिहिली.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२० जानेवारी इ.स.१६९६* *संताजी नावाचे वादळ* *हा काळ होता १६९६ मोगल सरदार हिंमतखान बहादूर हा खरोखरच नावाप्रमाणे धाडसी आणि पराक्रमी होता. त्याच्याजवळ सैन्य थोडे असल्याने आतापर्यंत त्याने संताजींवर आक्रमण केले नव्हते. पण आता खुद्दै त्याच्यावर चालून गेले. मोठ्या धैर्याने त्याने संताजींशी लढायचे ठरविले. आपले सैन्य घेऊन तो बसावापट्टणच्या गढीतून बाहेर पडला आणि त्याने संताजींवर चाल केली. संताजींनी आपल्या सैन्याच्या दोन तुकड्या केल्या होत्या. एक तुकडी त्याने बसावापट्टणजवळच्या जंगली प्रदेशात लपवून ठेवली होती आणि दुसऱ्या तुकडीचे स्वतः संताजी नेतृत्व करून लढत होते. लढाई घनघोर सुरु झाली. खान शौर्याने लढत होता. उभय पक्षी अनेक सैनिक रणांगणी पडले. एवढ्यात संताजींनी माघार घेतली. रण टाकून संताजी पाठमोरे पळायला लागले.* *हिंमतखानला काही सुचेना त्याला त्याचाच डोळ्यावर विश्वास बसत नव्हता हाच तो संताजी ज्याने बादशहाच्या शामियान्यावरील सोन्याचे कळस मारिले. हाच तो संताजी ज्याने दस्तूरखुद्द संभाजी राजेंना कैद करणाऱ्या त्या मुक्करबखानास जायबंदी केलं. हाच तो संताजी ज्याचा भीम पराक्रमाने महाराष्ट्रच काय तर अवघे तामिळनाडू ढवळून निघाले, हाच तो संताजी ज्याचा मर्दुमकीमुळे मोगलांची दोड्डेरीकडे लांच्छनास्पद माघार घ्यावी लागली तो संताजी आज रणांगण सोडून पळतोय हिंमतखानाने तडक संताजींचा पाठलाग सुरु केला. मोठ्या जोमाने तो संताजींचा पाठलाग करू लागला कारण वाघाला मैदान सोडून पळताना पाहिलंचं होतं कुणी तेव्हा? पाठलाग करत संताजी आले त्या जंगलात जिथे त्यांची पहिली तुकडी दबा धरून बसली होती. खान व त्यांचे सैन्य आपल्या कह्यात आल्याबरोबर. संताजी एकाएकी थांबला व पलटी खाऊन त्यांनी लढाईस सुरवात केली. त्याच वेळी जंगलात दबा धरून बसलेले मराठी सैन्य अचानक पुढे येऊन त्याने खानास त्याच्या सैन्यासह, घेरले. संताजींचे अनेक बंदूकधारी जंगलातील झाडावर दबा धरून बसलेले. आणि नेमबाजीमध्ये ते चांगलेच तरबेज होते. कचाट्यात सापडलेल्या हिंमतखानच्या सैन्याची चांगलीच लांडगेतोड मराठ्यांनी केली.* *सर्व बाजूंनी वेढला जाऊनही खान पराक्रमाने लढला. ऐन लढाईत त्याच्या कपाळाला मोठी गोळी लागली. व तो जबर जखमी होऊन हौद्यात कोसळला. आता मोगल सेनेचे नीतिधैर्य पूर्ण नष्ट होऊन तिचा पुरा पाडव झाला. या लढाईत मोगलांचे एकूण ५०० सैनिक ठार झाले. काही मोगल सैनिकांनी जखमी हिंमतखान बहादुरास आपल्या ठाण्यात नेले. तेथे तो त्याचं दिवशी मरण पावला खुद्द संताजींना ह्या लढाईत बाणाच्या दोन जखमा झाल्याचा उल्लेख आहे. ही लढाई झाली २० जानेवारी १६९६ शिवाजी महाराजांनी शिकवलेला गनिमी कावा संताजींनी पुरेपुर लक्षात ठेवाला. त्याचा वापर केला. आणि राज्याभिषेकानंतर अभिषेकासाठी झालेला खर्च वसूल करण्यासाठी बहादूर खानच्या पेडगावच्या छावणीवर हल्ला करून जसा कावा साधला होता अगदी तसाच डाव इथे संताजींनी साधला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२० जानेवारी इ.स.१७३९* *माहिम किल्ला मराठ्यांनी जिंकला* *चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली पिलाजी जाधव, शंकराजीपंत व आठ हजार घोडेस्वार, सहा हजार हशम व १२ तोफांच्या मदतीने माहिमला वेढा घातला. किल्ल्याच्या तटांवर तोफांचा प्रखर मारा करुन त्याला जिकडे तिकडे भगदाडे पाडली. शेवटी २० जानेवारी १७३९ रोजी किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२० जानेवारी इ.स.१७४५* *छत्रपती शाहुंचे इंग्रजांना पत्र* *इ.स. १७४५ मध्ये शाहू महाराजांनी आणि नानासाहेब पेशव्यांनी पुन्हा एकदा जंजिरेकर सिद्दीविरुद्ध आघाडी उघडण्याचा मुहूर्त साधला आणि यात पूर्वीप्रमाणे इंग्रज सिद्दीला मदत करू लागले ती थांबावी म्हणून म्हणून इंग्रजांना पत्रं पाठवली. शाहू महाराज २० जानेवारी १७४५ रोजी मुंबईकरांना लिहितात, “तुळाजी आंग्रे यांना अंजनवेल घेण्याचा हुकूम मी दिला आहे, आणि म्हणूनच माझी इच्छा आहे की तुम्ही त्यात कसलाही हस्तक्षेप करू नये”.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२० जानेवारी इ.स.१८५८* *क्रांतिकारी कुशलसिंह चंपावतला अटक* *अजमेरचा चीफ कमिशनर पेट्रीक लाॕरेन्स याने या सैन्याच्या प्रतिकारासाठी जोधपूरच्या राजपूत राजाला सैन्य पाठविण्यास सांगितले. जोधपूरचा राजा तख्तसिंह याने आपला किल्लेदार ओनाडासिंह पवार याच्या नेतृत्वाखाली दहा हजार सैन्य व बारा तोफा त्यासाठी पाठविल्या . ज्याच्या पूर्वजांनी वर्षानुवर्ष दिल्लीच्या तख्ताची सेवा केली. त्या तख्ताच्या संरक्षणासाठी जोधपूरच्या राजाने सैन्य व रसद न पाठविता तीच मदत त्या तख्ताच्या विनाशासाठी परक्या इंग्रजांच्या सहायार्थ मात्र सैन्य व रसद पाठवावी, केवढा हा दैवदुर्विलास ! जोधपूरच्या राजाचे सैन्य क्रांतिकारकांच्या सैन्याच्या दीड पटीपेक्षा माठे असले तरी क्रांतिकारकांच्या सैन्याने जोधपूरच्या सैन्याची धूळधाण उडवून दिली व त्याच्या सर्व तोफा सुद्धाआपल्या ताब्यात घेतल्या. जोधपूरचा किल्लेदार ओनाडासिंह व त्याचे काही सैन्याधिकारी आपल्या शेकडो सैन्यासह या युद्धात ठार झाले . नंतर चीफ कमीशनर पेट्रीक लॉरेन्स व जोधपूरचा पोलिटिकल एजंट आपले सैन्य घेऊन त्या क्रांतिकारकांचा प्रतिकार करण्यासाठी आहुवा येथे आले. १८ डिसेंबर १८५७ रोजी दोन्ही सैन्यात तुंबळ युद्ध झाले. त्या युद्धात इंग्रजांचा पराभव झाला . त्यात मेसन ठार झाला. शेकडो सैनिक ठार झाले व पेट्रीक लॉरेन्सही जीव घेऊन पळून गेला. गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंगला जेव्हा हे वृत समजले तेव्हा त्याने २० जानेवारी १८५७ रोजी पालनपूर व नसिराबाद येथील छावण्यातून मोठे सैन्य आहवा येथे पाठवून दिले. त्या सैन्यापुढे क्रांतिकारकाच्या सैन्याचा टिकाव लागला नाही. कुशलसिंह चंपावतसह क्रांतिकारकाचे अनेक नेते पकडले गेले. त्यांना बंदीवासाच्या काठोर शिक्षा देण्यात आल्या.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🙏 शिवराय स्टेटस #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा
❤🚩शिवभक्त🚩❤
3.2K जणांनी पाहिले
⛳स्वराज्यभूमी ⛳ *महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *१९ जानेवारी इ.स. १३११* *वारंगळच्या लुटीतच जगप्रसिद्ध कोह-इ-नुर (कोहिनूर) हिरा मलिक काफुरच्या हातात सापडला. तो हिरा मलिक काफूरने जून १३१० मध्ये दिल्लीला माघारी जाऊन अल्लाउद्दीनला भेट केला. वारंगळची लुट बघून अल्लाउद्दीनचे डोळे लकाकले आणि त्याच्या लक्षात आले की भारताचा दक्षिण भूभाग अधिक समृद्ध आहे. म्हणून त्याने कर्नाटकातील द्वारसमुद्र म्हणजे नंतरचे हलेबिंदू येथील होयसला साम्राज्य जिंकण्यासाठी पुन्हा मलिक काफूरला दहा हजार सैन्यासह दक्षिणेकडे पाठवले. १९ ऑक्टोबर १३१० ला मलिक काफूर दहा हजार सैन्यासह दक्षिणेकडे निघाला आणि बरोबर तीन महिन्यानंतर त्याची गाठ गुणवडीजवळ करणसिंह गावडे आणि त्यांच्या सैन्याबरोबर पडली. वाटेत लागतील ती गावे लुटायची, स्रियांचे अपहरण करायचे, लोकांना बळजबरीने धर्मांतरे करायला लावायची हाच क्रुर मलिक काफूरचा एक कलमी कार्यक्रम होता. त्याच्यासमोर कोणाचाच टिकाव लागत नव्हता. पण गुणवडी गावातील दत्तोबा मंदिराजवळ असणा-या भुयाराजवळ सुर्यकुल कुलभूषण श्री करणसिंह गावडे यांच्या आणि भीमराव गावडे यांच्या नेतृत्वाखाली सगर राजपूत आणि काही ब्राम्हण योद्धे असे अकराशे जणांचे एक पथक त्या मलिक काफूरचा प्रतिकार करण्यासाठी जमले होते. १९ जानेवारी ते २० जानेवारी १३११ असे दीड दिवस हे घनघोर युद्ध चालले होते. एका बाजूला मलिक काफूरचे दहा हजार सैन्य तर दुस-या बाजूला फक्त अकराशे योद्धे. शेवटी दीड दिवसांच्या संग्रामानंतर २०जानेवारी १३११ या दिवशी २२ सगर योद्धे या ठिकाणी मारले गेले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१९ जानेवारी इ.स.१५९७* *महाराणा प्रताप यांचा स्मृतिदिन* *(जन्म ९ मे १५४०)* *राणा प्रतापसिंह गुहिलोत ह्या राजपूत वंशातील एक अत्यंत पराक्रमी राजा. उदयसिंहाचा पुत्र. प्रतापसिंह गुहिलोत ह्या नावाने हा राजस्थानात प्रसिद्ध आहे. उदयसिंहाने जगमल ह्या आपल्या आवडत्या पुत्रास गादीचा वारस नेमले होते; परंतु प्रतापसिंहाच्या मामाने इतर सरदारांच्या मदतीने जगमलास दूर करून प्रतापास १ मार्च १५७२ रोजी महाराणा केले. तो महाराणा झाला त्यावेळी राजधानी चितोड शत्रूच्या हातात गेली होती. अनेक राजपूत अधिपतींनी अकबराचे स्वामित्व पतकरले होते व काहींनी आपल्या मुली त्यास देऊन शरीरसंबंध जोडला होता; पण राणाप्रतापने त्याच्यापुढे मान लवविली नाही. त्याने चितोड अकबराच्या हातून स्वतंत्र करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि आपले वास्तव्य अकबराच्या सैन्याच्या दृष्टिक्षेपापासून दूर ठिकाणी केले. प्रजेला अरवलीच्या डोंगराळ भागात, जेथे अकबराचा उपद्रव पोहोचणार नाही, अशा ठिकाणी वस्ती करण्यास लावले. तेथेच त्याने काही भागात शेती केली. मेवाडचा मैदानी प्रदेश ओसाड करून टाकला आणि आपली राजधानी गोगुंड येथे नेली. सर्व डोंगरभागांतून अभेद्य असे किल्ले बांधले व ते शस्त्रास्त्रांनी सुसज्ज केले. अकबराचे स्वामित्व न पतकरल्यामुळे त्यास मोगलांशी अखेरपर्यंत झगडा करावा लागला. अकबराने मानसिंह आणि आसफखान यांच्याबरोबर मोठी सेना देऊन त्याच्यावर पाठविले. २१ जून १५७६ रोजी हळदीघाटच्या घनघोर लढाईत प्रतापसिंहाचा पराजय झाला, तरी तो तीतून निसटला आणि राजस्थानच्या दऱ्याखोऱ्यांतून त्याने मोगलांशी गनिमी काव्याने संघर्ष चालू ठेवला. त्यांच्या रसदा तोडल्या, खजिने लुटले. अकबर स्वतः त्याच्यावर चालून गेला पण त्याला प्रतापला न जिंकताच परत फिरावे लागले. त्याची पाठ वळताच प्रतापने आपले गेलेले सर्व किल्ले परत मिळविले. यानंतर त्याने पुढे १२ वर्षे शांततेने राज्य केले. ह्यावेळी अकबर हा पंजाब व दक्षिण भारत ह्या दोन ठिकाणी आपली सत्ता स्थिर करण्याच्या बेतात होता. त्यामुळे त्याने पुढे प्रतापकडे लक्ष दिले नसावे. राणाप्रतापास परचक्राची फार चिंता होती. म्हणून त्याने आपल्या सरदारांकडून तुर्कांपासून आपल्या देशाचे रक्षण करण्याचे प्रथम वचन घेऊन नंतर आपल्या अमरसिंह ह्या पुत्राच्या हाती राज्य सोपविले व प्राण सोडला. अकबरानेही त्याची मुक्तकंठाने स्तुती केली आहे. कर्नल टॉड म्हणतो, ‘प्रतापचे नाव अजूनही पूज्य मानले जाते आणि पुढेही एखाद्या नवीन जुलमी राजसत्तेकडून राजपुतांत शिल्लक असलेली देशाभिमानाची ठिणगी विझेपर्यंत ते नाव पूज्यच मानले जाईल.’* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१९ जानेवारी इ.स.१६३६* *निजामशाही संपवायची ह्या ध्येयाने शहाजहान निघाला होता. त्याने हांडियाजवळ नर्मदा ओलांडली. इथूनच ९ जानेवारीला आदिलशाहला पत्राने तंबी दिली की निजामशाहीमधल्या शाहजी राजा बरोबर असलेल्या सरदारांना पाठिंबा मिळता कामा नये. वर हे सुद्धा लिहीले की त्याने देय असलेली वार्षिक खंडणी १० मार्च १६३६ पर्यंत दौलताबादला पाठवावी. ह्यासाठी शाहजहानने सोलापूर, त्याच्या आसपासचा परिसर व वांगीचा भाग निजामशाहिकडील भाग आदिलशाहला देऊ केले. ह्या परिसरातून वर्षाला नऊ लक्ष होनाचे उत्पन्न येत होते. १९ जानेवारी १६३६ ला शेख दबीर व इतर काही आदिलशाही वकील शाहजहानला भेटले. त्यानंतर ५ फेब्रुवारीला शाहजहानने खानजमान, खानदौरान व शाहिस्ताखान यांना निजामशाहीचा परिसर जिंकण्यासाठी धाडले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१९ जानेवारी इ.स.१६६५* *(माघ शुद्ध १३, त्रयोदशी शके १५८६, संवत्सर क्रोधी, वार गुरुवार)* *मिर्झाराजे जयसिंग आले!* *९ जानेवारी इ.स.१६६५ मिर्झाराजे जयसिंगांनी हंडीया घाटातून नर्मदा ओलांडली अन् १३ जानेवारी इ.स.१६६५ ला ते बुर्हानपुरास पोहोचून वेळ न दवडता पुढे कुच कुच केले. मिर्झाराजे जयसिंगांनी बर्हाणपुर सोडून औरंगाबादच्या दिशेने प्रवास सुरू केला.मिर्झाराजे जयसिंगांनी पहिल्या प्रवासात कुठेही वेळ दवडला नाही.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१९ जानेवारी इ.स.१६८२* *(माघ वद्य षष्ठी, शके १६०३, संवत्सर दुर्मती, वार गुरुवार)* *सिद्दी कासीम हा पावसाळा तेथेच काढील या भितीने मुंबईकर चिंतातुर झाले आणि मुंबईकरांनी सुरतकरांना कळविले की "सिद्दीचे आरमार मुंबई बंदरात येत आहे आणि सिद्दीवर छत्रपती संभाजी महाराज फारच, क्रृद्ध झाला असून सिद्दीवर छत्रपती संभाजी महाराज तुटून पडणार आहेत. तेव्हा सिद्दीला पावसाळ्यात मुंबई बंदरावर ठेवणे, आपणास त्रासदायक ठरेल तेव्हा त्यास तेथून हालविण्याबाबत निर्णय करावा."* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१९ जानेवारी इ.स.१६८२* *(माघ वद्य षष्ठी, शके १६०३, संवत्सर दुर्मती, वार गुरुवार)* *दंडाराजपुरीवर छत्रपती संभाजी महाराजांचे प्रखर हल्ले!* *दंडाराजपुरीवर छत्रपती संभाजी महाराजांचे प्रखर हल्ले सुरूच होते. समुद्रावर ख्रिस्ती, हबशी सत्ता नामशेष करण्याचे छत्रपती संभाजी महाराजांनी ठरविले होते. त्यामुळे साम, दाम, दंड, भेद या नितीचा वापर करून छत्रपती संभाजी महाराजांच्या आदेशानुसार मराठी सैन्य दंडाराजपुरीवर तुटून पडले होते. 'याचा सर्वात जास्त त्रास इंग्रजांना होत होता.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🙏 शिवराय स्टेटस #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #📜इतिहास शिवरायांचा #🚩जय भवानी जय शिवाजी🚩
See other profiles for amazing content