फॉलो करा
शिवभक्त सुरेश भोसले
@sureshbhosale
4,163
पोस्ट
14,074
फॉलोअर्स
शिवभक्त सुरेश भोसले
610 जणांनी पाहिले
7 तासांपूर्वी
*🚩आजचे _ऐतिहासिक _शिवदिनविशेष🚩* ▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬ *⛳ श्री शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य* ⛳ ▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬ *🚩शिव कार्य हेच आमचे ध्येय आणि हेच आमचे धोरण* *************************************** https://www.instagram.com/shrishivshambhu_pratishtan?igsh=dG9ib2pubnA5dDU4 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🚩जय जिजाऊ #🙏शिवदिनविशेष📜 ⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 १२ ऑक्टोबर इ.स.१६५९ (कार्तिक शुद्ध सप्तमी शके १५८१ संवत्सर विकारी वार बुधवार) महाराजांनी पंताजी गोपीनाथ यांची वकिल म्हणून निवड केली! पंताजी गोपीनाथांची वकील म्हणून निवड अफजलखानाचा वकील आला मग रिवाजानुसार आपलाही वकील खानाकडे जायला हवा हे मनोमन ठरवून गोपीनाथपंथांची निवड केली. ही निवड केवळ वकील म्हणून साधीसुधी नव्हती तर खानाच्या गोटात शिरून खानाच्या छावनीचा संपूर्ण अंदाज बांधणे शत्रुपक्षाच्या मनीचे हेतू जाणता आले तर पाहावे या हेतूने ही निवड होती. आणि म्हणूनच पंताजी गोपीनाथक्षयांचे बरोबर काही हुषार हेर‌ हुजऱ्यांच्या रुपाने शिवरायांनी पाठवून आपले फासे टाकायला सुरुवात केली. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 १२ ऑक्टोबर इ.स‌.१६७३ वाई जवळील पांडवगड किल्ल्यावर मराठा फौजेने हल्ला चढवला! चालुक्यांच्या राज्यांनतर शिलाहारांनी पन्हाळा -कोल्हापूर दख्खन या भागावर राज्य चालविले. १९९१-९२ मध्ये सापडलेल्या ताम्रलेखानुसार शिलाहार राजा दुसरा भोज याने हा किल्ला बांधला हे पुरावे आढळतात. हा किल्ला प्रथम आदीलशाहीत होता. ऑक्टोंबर १६७३ मध्ये मराठ्यांनी तो जिंकला. पुढे १७०१ औरंगजेबाने हा किल्ला घेतला. त्यानंतर शाहू महाराजांनी किल्ला पुन्हा स्वराज्यात आणला. इ.स. १८१८ मध्ये इंग्रजांनी पांडवगड आपल्या ताब्यात आणला. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 १२ ऑक्टोबर इ.स.१६८० अश्विन शु. १, स्वराज्याचे पंतप्रधान मोरेश्वर त्रिंबक पिंगळे यांचे श्रीमान रायगडावर महानिर्वाण झाले. त्यांच्या ज्येष्ठ पुत्राचे सांत्वन करून छत्रपती शंभुराजांनी त्यांना पेशवेपद दिले. निळोपंत हे स्वराज्याचे पेशवे बनले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 १२ ऑक्टोबर इ.स.१६८१ छत्रपती संभाजी महाराज राज्यपदावर आल्यावर त्यांच्याविरोधात काही मंत्र्यानी कट केला होता. मंत्र्यानी या कटात सुलतान अकबराला गोवण्याचा कट केला होता पण अकबराने आपला दूत पाठवून ही गोष्ट संभाजीराजेंना कळवली. संभाजीराजेंच्या हालचालींची माहिती मुंबईकर इंग्रजांच्या एका पत्रात येते,"छत्रपती संभाजी महाराज हल्ली रायरीस आलेले आहे. त्याच्या खुनाच्या कटाबाबत ते तेथे आले. पूर्वी कळवल्याप्रमाणे थोड्याच दिवसांपूर्वी त्याने अण्णाजीपंत,हिरोजी फर्जंद,बाळाजी पंडित आणि आणखी पाच जण हत्तीच्या पायाखाली घालून मारविले. आणि असे म्हणतात की, या कटात सापडलेल्या आणखी वीस जणांना ठार मारण्यात येईल. राजा आपल्या सैन्याची जमवाजमव करीत आहे व बातमी अशी आहे की ते थोड्याच दिवसात सुलतान अकबरा बरोबर बुऱ्हाणपुरास जाण्यासाठी कूच करतील. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 १२ ऑक्टोबर इ.स.१७०७ महाराणी ताराराणी साहेब व शाहू राजे यांच्यात खेड-कडूस येथे लढाई झाली त्यात शाहूराजेंचा विजय झाला. महाराणी ताराराणीसाहेबांनी जिंकलेले सर्व किल्ले शाहू राजेंना आपसूकच मिळाले. शाहु राजेंच्या पक्षात गेलेले बाळाजी विश्वनाथ यांनी महाराणी ताराराणी साहेबांच्या पक्षातील उदाजी चव्हाण, चंद्रसेन जाधव, कान्होजी आंग्रे आदी सेनानींना शाहु राजेंच्या बाजूला वळवून घेतले. त्यामुळे शाहु राजेंचा पक्ष बळकट झाला. शाहु राजेंनी साताऱ्याला गादीची स्थापना केली आणि महाराणी ताराबाईंनी साताऱ्याहून माघार घेऊन, कोल्हापूर येथे वेगळी गादी स्थापन केली. त्यानंतर वारणेला झालेल्या दिलजमाईनुसार शाहूराजांनी कोल्हापूरच्या गादीला संमती दिली आणि मराठी साम्राज्यात सातारा व कोल्हापूर अशा दोन स्वतंत्र गाद्या निर्माण झाल्या. पुढे शाहु राजेंच्या मध्यस्थीने ताराबाईंची कैदेतून सुटका झाली. त्यानंतर त्या सातारा येथे राहावयास गेल्या. शाहु राजेंना पुत्र नसल्यामुळे त्यांनी ताराबाईंचा नातू रामराजा यांस दत्तक घेतले. ताराबाईंचे निधन ९ डिसेंबर १७६१ रोजी साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर झाले. त्यांची समाधी क्षेत्र माहुली, ता. सातारा येथे कृष्णेच्या काठावर असून पावसाळ्यात ही समाधी नदीच्या प्रवाहात पाण्याखाली असते. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 १२ ऑक्टोबर इ.स.१८८० वासुदेव बळवंतांचे “ सीमोलंघन" ! शके १८०२ च्या आश्विन शु. ९ रोजी भारतातील पहिले क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी एडन येथील तुरुंगांतून सुटण्याचा धाडसी प्रयत्न केला. अत्युच्च ध्येय उराशी चाळगणारा हा खंदा वीर एडनच्या तुरुंगांत काळ्या पाण्याची जन्मठेप भोगीत खितपत पडला होता. परंतु मुक्त असणारा आत्मा सारखी तडफड करी. हातांतील शृंखला तोडाव्यात, खोलीच्या भिंती पाडाव्यात, तुरंगाचे तट ओलांडावेत, असे विचार त्यांच्या मनांत वारंवार येत. आणि आश्विन शु. ९ या दिवशी त्यांच्या या इच्छाशक्तीने साकार रूप धारण केले. दुर्धर रोगाकडे लक्ष न देतां वासुदेव बळवंतांनी आपल्या अचाट शक्तिसामर्थ्याने हातांतील शृंखला खळ्कन् तोडिल्या. बंदिवान् गरुड आतां मुक्त झाला होता. त्याच्या भरारीची झेप आतां अत्यंत मोठी अशीच असणार. कोठडीच्या दाराशी आल्यावर त्यांना आढळून आले की, भक्कम अशा लोखंडी गजांच्या दारांना मोठे थोरले कुलूप आहे ! ते पाहून या मुक्त सिंहाला जास्तच चेव आला. त्यांचे बाहु स्फुरण पावू लागले. लागलीच त्यांनी दोनहि हातांनी ती दारें उखडून काढिली; आणि ती तशीच घेऊन ते तटापर्यंत आले. तटावरून उतरण्यासाठी शिडी पाहिजे होती ना! या उखडलेल्या दाराची शिडी झाली. वासुदेव चळवंतांनी ताइकन् तटावरून उडी झोंकली. रोगग्रस्त झालेल्या मुखावर स्वातंत्र्यप्राप्तीचा आनंद विलसत होता. सुटलों या यमयातनेतून, असा श्वास टाकून त्यांनी धांवण्यास सुरुवात केली. अविरतपणे धांवतां धांवतां यांना दम लागला; आणि दुर्दैवाने पहारेकऱ्यांना ही गोष्ट समजली. सरकारी घोडेस्वार त्यांचा पाठलाग करूं लागले. त्यांची आणि फडके यांची लहानशी चकमक झाली. परंतु एकटे फडके कोठवर प्रतिकार करणार ? पुनः त्यांना पोलिसांच्या स्वाधीन व्हावे लागले. त्यांचे दिव्य स्वप्न क्षणाधीत नाहीसे होऊन त्यांना कठोर अशा सरकारी यंत्रांत जखडून घ्यावे लागले. आता तर पहिल्यापेक्षा जास्त प्राप्त होणार होता. आणि फडके सर्वे भोग भोगण्यास तयार होतेच. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 ▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬ ✍ *लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.* ▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬ *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* *जय गडकोट* *!! हर हर महादेव !!* #🚩छत्रपति शिवाजी महाराज
शिवभक्त सुरेश भोसले
646 जणांनी पाहिले
8 तासांपूर्वी
*#ऊर्जामंत्र* *जर तुमचा नशिबावर विश्वास असेल तर जे तुमच्या नशिबात लिहिले आहे ते तुम्हाला नक्की मिळेल....!!..* *🚩||दैवत छत्रपती शिवशंभु||🚩* #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #🚩जय जिजाऊ #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #⛳शिवसंस्कृती
शिवभक्त सुरेश भोसले
1.5K जणांनी पाहिले
1 दिवसांपूर्वी
*🚩आजचे _ऐतिहासिक _शिवदिनविशेष🚩* ▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬ *⛳ श्री शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य* ⛳ ▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬ *🚩शिव कार्य हेच आमचे ध्येय आणि हेच आमचे धोरण* *************************************** https://www.instagram.com/shrishivshambhu_pratishtan?igsh=dG9ib2pubnA5dDU4 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩जय जिजाऊ #🚩छत्रपति शिवाजी महाराज #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 ⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 ११ ऑक्टोबर इ.स.१६५९ ( कार्तिक शुद्ध षष्टी, शके १५८१, संवत्सर विकारी, मंगळवार ) खानाच्या वकिलाला निरोप :- कृष्णा भास्करला जाणूनबुजून गड दाखवला गेला. गडाचा बंदोबस्त किती मजबूत आहे हा निरोप खानापर्यंत जावा हा हेतू. खानाचे पत्र स्वीकारून रिवाजानुसार आपलेही वकील खानाकडे येतील असे सांगून कृष्णा भास्करास उंची नजराणे, भारी पोशाख, घोडा व भेटवस्तू देऊन आजच्या दिवशी त्यांना निरोप देण्यात आला. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 ११ ऑक्टोबर इ.स.१६७९ सुंदरजी प्रभू नामक छत्रपती शिवाजी महाराजांचे एक हेर मुंबईमध्ये गुपचूप माहिती जमा करीत असताना इंग्रजांच्या तावडीत सापडले. इंग्रजांनी त्यांच्याकडून माहिती जमा करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात अपयश येऊन इंग्रजांनी त्यांना कैदेत टाकले. तसेच मुंबईतील ३-४ गरीब रहिवाश्यांना चौलच्या आसपास टेहळणीकरिता पाठवले व त्यांना आदेश दिला की, त्यांनी दर ३-४ दिवसांनी मुंबईला मराठ्यांच्या हालचालीबद्दल खबर कळवावी. हे हेर मराठ्यांच्या हालचाली इंग्रजांना कळवीत होते. मुंबईतील जवळजवळ सर्वच फौज खांदेरीच्या नाकेबंदीत सामील असल्यामुळे मुंबईचे संरक्षण कमी झाले होते व त्याचा धोका जाणवून इंग्रजांनी १३ ऑक्टोबर रोजी २ शिबाडे भाडेतत्वावर घेऊन मुंबई बंदर संरक्षित केले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 ११ ऑक्टोबर इ.स.१६८२ स्वराज्यावर चालून आल्यावर औरंगजेबाने नोव्हेंबर १६८१ पासूनच तळकोकणावर आपले सरदार पाठवून हल्ले करण्यास सुरुवात केली होती. या मोहिमेवर हसन अलीखान,राव दलपत यासारखे मातब्बर सरदार होते. ऑगस्ट १६८२ मध्ये खानजहान बहादूर या सरदारालाही तळ कोकणात पाठवले होते. छत्रपती संभाजीराजे कोकणात मुघलांच्या या चालू असलेल्या हालाचली थांबवण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यांनी तळ कोकणातील आपल्या अधिकाऱ्यांना हुकूम देऊन मुघल सैन्याच्या वाटा अडवायला सांगितले होते. मराठ्यांच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी या हुकुमाची ताबडतोब अंमलबजावणी केली. कोकणच्या वाटेवर संभाजीराजेंच्या सैन्याने चोख बंदोबस्त ठेवला असल्याने मुघल सरदारांना आणि त्यांच्या सैन्याला मराठ्यांनी कोकणात शिरु दिले नाही. याच दरम्यान १६८२ च्या ऑक्टोबर महिन्यात तळ कोकणचा मुघल अधिकारी अली चौधरी याने आपल्याला एक सरदार, अहजार स्वार व २ हजार प्यादे दिले तर आपण सुरतपासून तळ कोकणपर्यंत मुलुख लुटू शकेन असे कळवले होते. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 ११ ऑक्टोबर इ.स.१७२४ निजामाने मुबारिझखानास लिहिले की, आपण दोघेही बादशहाचे सेवक, आपसात लढणे चांगले नाही. माझी नेमणूक दुसरीकडे कोठे झाल्यावर मी दक्षिण सोडून जाईन. खानाने हे बोलणे जुमानले नाही. लढाईनेच सोक्षमोक्ष करून घ्यावयाचे त्याने ठरविले. कदाचित दिल्लीची कुमक खानास मिळेल म्हणून त्यास अगोदर गाठण्यासाठी निजामाने आपल्याकडील बाजीराव व मराठी फौज घेऊन तारीख ३ सप्टेंबर रोजी औरंगाबादेहून दौड केली. बाजीरावांनी आपली माणसे मुबारिझखानाच्या हालचाली कळविण्यास पाठविली होती. दोन्ही सैन्याची गाठ साखरखेड या गावी पडली. तारीख १ ऑक्टोबर रोजी तुंबळ युद्ध झाले. मुबारिझखानाने लढण्याची पराकाष्ठा केली पण तो व त्याचे दोन मुलगे मारले गेले. त्याच्या फौजेचा मोठा संहार झाला. विजयी निजामाने जानेवारी १७२५ च्या सुरुवातीस हैद्राबादेचा ताबा मिळविला. निजामाच्या या विजयामुळे भागानगर ऊर्फ हैद्राबादचा सुभा फत्तेसिंगास मिळावा ही शाहू महाराजांची मागणी पार वितळून गेली. निजामाने औरंगाबाद व हैद्राबाद या बाजू आपल्या सरदारांकडून व्यापल्यामुळे शाहू महाराजांच्या सरदारांना कर्नाटकाकडे आपली मुलुखगिरीची कामगिरी करावी लागली. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 ११ ऑक्टोबर इ.स.१७८० दि. ११ ऑक्टोबर १७८० रोजी हालेचा मुक्काम उल्हास नदीकाठावर असलेल्या बदलापूरानजीक कुळगाव येथे असताना आनंदराव रास्त्यांच्या फौजांनी त्याच्यावर हल्ला चढवला. यात हालेचे विशेष नुकसान झाले नाही. तरीही बदलापूराजवळच्या हल्ल्याची धास्त खाऊन तो टिटवाळा मुक्कामी गेला. रामचंद्र गणेश कानडे हे वसईच्या कुमकेकरता जात असतानाच टिटवाळ्याच्या जवळच हालेने त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्याला रामचंद्रपंतांनीही असे कडवे प्रत्युत्तर दिले की, हार्टलेची पाचावर धारण बसली. अशावेळी दि. १२ डिसेंबर रोजी सकाळी वज्रेश्वरी नजिक आकाशात खूप मळभ असताना रामचंद्रपंत गुपचूप हार्टलेला पकडण्यासाठी पुढे सरसावले. परंतु, ऐनवेळी चक्क उन पडले आणि हार्टलेला रामचंद्रपंत दिसले. इंग्रजांनी त्यांच्यावर बेछूट गोळ्या झाडल्या आणि रामचंद्रपंत ठार झाले. इकडे वज्रेश्वरीला पंत पडले अन् तिकडे त्याच सुमारास वसईदेखील पडली!!! 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ११ ऑक्टोबर इ.स.१७८८ गुलाम कादरने नवीन बादशहाचे सहाय्याने जनानखाना व राजपुत्रांचे महाल लुटले. एके दिवशी शहाजाद्यांना व दासींना आपल्या समोर उभे करून गावयास व नाचावयास लाविले, तसेच बादशहास दिवाणी इ-खासात ओढून आणून चाबकाने मारिले. इतकेही करून द्रव् मिळेना म्हणून बादशहास पुरलेल्या द्रव्याचा ठावठिकाणा विचारला, तेव्हा बादशहाने आपल्याला असे द्रव्य माहीत नाही असे उत्तर करताच तक्तावर हुक्का ओढीत बसलेल्या गुलाम कादरने एकदम उडी टाकून बादशहा शहा अलम यास खाली पाडले व त्याचे उरावर बसून पेषकबजाने बादशहाचे दोन्ही डोळे फोडले. शहरात सतत लुटालूट चालू ठेविली. इस्माईल बेग यास गुलाम कादरचे हे वर्तन मुळीच आवडले नाही. अशा वाईट कृत्यात आपण सामील असल्याने आपल्यावरही केव्हातरी गदा येईल म्हणून तो घाबरून गेला आणि सरळ महादजी शिंद्यास येऊन मिळाला महादजीनी काळजीपूर्वक योजना आखून ऑक्टोबर १७८८ त आपला सरदार राणेखान यास फौज व तोफा देऊन दिल्लीचा कबजा घेण्यास रवाना केले. तसेच गुलाम कादरचे अंतर्वेदीतील मुलुखात मराठी फौज पाठविली. अंतर्वेदीतील या मराठे फौजेने सन १७८८ च्या ऑक्टोबरात रोहिल्यांची ठाणी उठवून मराठ्यांचा अंमल पूर्ववत स्थापिला. मराठ्यांची फौज आपल्यावर चालून येत आहे असे पाहून गुलाम कादरखान दिल्ली सोडून आपल्या मुलुखाचे रक्षण करण्यासाठी निघून गेला. पुढे दिनांक ११ ऑक्टोबर १७८८ रोजी मराठी फौजेने दिल्लीच्या किल्ल्यात प्रवेश केला. त्यानंतर २२ ऑक्ट रोजी मराठे सरदार अंध बादशहा शहाअली यास नजर शिष्टाचार करून भेटले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬ ✍ *लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.* ▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬ *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* *जय गडकोट* *!! हर हर महादेव !!*
शिवभक्त सुरेश भोसले
618 जणांनी पाहिले
1 दिवसांपूर्वी
*#ऊर्जामंत्र* *स्वप्न खरी होण्याची शक्यताच ही आपल्या जीवनाला रोमहर्षक आणि ऊर्जादायी बनवत असते....!!..* *🚩||दैवत छत्रपती शिवशंभु||🚩* #⛳शिवसंस्कृती #🚩शिवराय #🚩छत्रपति शिवाजी महाराज #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #🚩जय जिजाऊ
शिवभक्त सुरेश भोसले
890 जणांनी पाहिले
2 दिवसांपूर्वी
*#ऊर्जामंत्र* *स्वताच्या मेहनती वर विश्वास ठेवा,कारण प्रयत्न हे कधीच व्यर्थ जात नाहीत....!!..* *🚩||दैवत छत्रपती शिवशंभु||🚩* #⛳शिवसंस्कृती #🚩शिवराय #📜इतिहास शिवरायांचा #🚩जय जिजाऊ #🚩छत्रपति शिवाजी महाराज
See other profiles for amazing content