#आजचा शिव दिनविशेष #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #😎आपला स्टेट्स #जंजिरा
२२ ऑगस्ट १७३३...
इ.स १७१३ च्या कान्होजी आंग्रे आणि शाहू छत्रपती यांच्यामधील तहामुळे जंजिऱ्याच्या सिद्दीचा काही भाग छत्रपतींनी कान्होजी आंग्रे यांस दिला त्यामुळे अधूनमधून या भागात सिद्धी कुरापती काढण्याचा प्रयत्न सातत्याने करतच असे. सिद्दीचा पाडाव करावा असा छत्रपतींचा मनोदय त्यात त्याचा या भागात होणारा पुंडावा या सगळ्या कारणां मुळेच सिद्दीविरुद्ध मोहीम निघावी ह्याविषयीची खलबतं चालू झाली...
समुद्री मोहीम म्हटल्यावर आंग्रे घराण्याशिवाय मोहीम पुढे हालणारचं कशी तेव्हा जानेवारी १७३२ मध्ये खुद्द बाजीराव सेखोजींना भेटण्यासाठी कुलाबा येथे आले त्यांच्या भेटीचा उपयोग झाला,आणि सेखोजींनी ही मोहीम अंगावर घ्यायचे असे ठरवले शिवाय जंजिरेकरा विषयी पूर्ण माहिती असलेला आणि आरमारी लढाईत कुशल असा बांकाजी नाईक महाडिक नावाचा आपला एक प्रसिध्द सरदार सैन्यासह बाजीरावाचे स्वाधीन केला तसेच आपला भाऊ मानाजी यासही या मोहिमेवर जाण्यास सांगितले...
इ.स १७३३ एप्रिलमध्ये श्रीनिवासराव प्रतिनिधी बाजीराव आणी फत्तेसिंग भोसले ही मोहीम चालू करण्यासाठी कोकणात आले आंग्ऱ्यांचा सरदार महाडिक आणि सिद्दीसात यांचे चिपळूणजवळ युद्ध झाले त्यात सिद्दी सातची दाणादाण उडाली. या मोहिमेची सुरवात झाल्यावर सिद्दी रसूल याकूतखान मृत्यू पावला व त्याच्या सात मुलांमध्ये यादवी सुरु झाली यात त्याचा ज्येष्ठ मुलगा मारला गेला सिद्दी अब्दुल रहिमान गादीवर बसला तो सेखोजींच्या मताप्रमाणे वागत होता त्यामुळे बाजीरावाविरुद्ध लढू नये, असे त्याचे मत होते परंतु त्याचा सरदार मंडळाला हे मान्य नव्हते त्यांनी सिद्दी रसूल याकूतखानच्या सिद्दी हसन या मुलाला गादी वर बसविले आणि ही मोहीम लढण्यास त्यांनी सुरवात केली...
२२ ऑगस्ट १७३३ पर्यंत जंजिरा आणि अंजनवेल हे वगळता सिद्दीची बाकीची सर्व ठाणी मराठ्यांच्या ताब्यात आली. या मोहिमेची सर्व सूत्रे बाजीराव सेखोजी यांच्या सल्लामसलतीने चालवीत होते...