अनंत चतुर्थी
69 Posts • 257K views
Devendra Fadnavis
1K views 4 months ago
निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी, चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी... आपल्या 'वर्षा' निवासस्थानी आज लाडक्या बाप्पाचे कुटुंबियांसोबत, पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन केले. बाप्पा तर आपल्या प्रत्येकाच्या मना-मनात सदैव विराजमान असतो आणि त्याचे आशीर्वादही कायम आपल्या सोबत असतात. पण गेले 10 दिवस बाप्पाच्या भक्तीने तल्लीन झालेले मन आज बाप्पाचा निरोप घेताना भरून आले. बाप्पाची कृपा सदैव आपल्यावर राहील, या विश्वासाने पुढच्या वर्षी आणखी उत्साहाने गणरायाचे स्वागत करण्यासाठी सज्ज राहू. तूर्तास... गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या! (📍वर्षा निवासस्थान, मुंबई | 6-9-2025) #अनंत चतुर्थी #गणेशविसर्जन #देवेंद्र फडणवीस #महाराष्ट्र
12 likes
1 comment 5 shares