#💐महान क्रिकेटपटूचे अचानक निधन🏏
*ऑस्ट्रेलियन संघाचे माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू #बॉब_सिम्पसन यांचे आज (१६ ऑगस्ट २०२५ रोजी) निधन झाले.*
बॉब सिम्पसन यांचा अल्पपरिचय.
जन्म.३ फेब्रुवारी १९३६
बॉब सिम्पसन यांचे खरे नाव रॉबर्ट बँडले सिम्पसन होते.
ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट इतिहासातील बॉब सिम्पसन सर्वाधिक प्रभावशाली खेळाडूंपैकी एक मानले जातात.
बॉब सिम्पसन यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांनी १९५७ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले व एकूण ६२ कसोटी सामने खेळले. यात त्यांनी ४८६९ धावा केल्या ज्यात १० शतकं व २७ अर्धशतकं समाविष्ट आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या सर्व शतकं त्यांनी कर्णधार असतानाच झळकावली. १९७८ मध्ये ते अखेरचा कसोटी सामना खेळले. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर तब्बल २१०२९ धावा नोंद आहेत.
१९६८ मध्ये निवृत्त झाल्यानंतर, बॉब सिम्पसन यांना १९७७ मध्ये वयाच्या ४१ व्या वर्षी क्रिकेट संघात परतण्यास राजी करण्यात आले, जेव्हा वर्ल्ड सिरीज क्रिकेटमुळे संघ विखुरला गेला. त्यांने आणखी १० कसोटी सामने खेळले आणि दोन शतकं केली.
खेळाडू म्हणून मोठा ठसा उमटवल्यानंतर ते ऑस्ट्रेलियाचे पूर्णवेळ प्रशिक्षक झाले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऑस्ट्रेलियन क्रिकेटने नवे विक्रम प्रस्थापित केले.
१९८६ मध्ये ऑस्ट्रेलियन संघ अतिशय खराब फॉर्ममध्ये होता. त्यावेळी बॉब सिम्पसन संघाशी जोडले गेले आणि मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांनी संघात आमूलाग्र बदल घडवला. त्यांनी कर्णधार अॅलन बॉर्डरसोबत कठोर मेहनत घेतली व डेव्हिड बून, डीन जोन्स, स्टीव्ह वॉ, क्रेग मॅकडरमॉट आणि मर्व ह्यूजेस यांसारख्या तरुण खेळाडूंना संघात स्थान दिले.
बॉब सिम्पसन यांनी कोचिंगची जबाबदारी स्वीकारली आणि १९९६ पर्यंत या भूमिकेत कार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच ऑस्ट्रेलियाने पहिला वनडे वर्ल्ड कप जिंकला. इंग्लंडविरुद्धच्या रोमांचक अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने सात धावांनी विजय मिळवला. त्यानंतर १९८९ मध्ये त्यांनी अॅशेस मालिका जिंकून दाखवली.
सिम्पसन यांच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात, १७ वर्षांच्या दुष्काळानंतर १९९५ मध्ये ऑस्ट्रेलियाने फ्रँक वॉरेल ट्रॉफी परत मिळवली. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिका फ्रँक वॉरेल ट्रॉफी म्हणून ओळखली जाते.
२००६ मध्ये सिम्पसन यांचा ऑस्ट्रेलियन क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये आणि २०१३ मध्ये आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला. १९९० च्या दशकात सिम्पसन यांनी भारतीय क्रिकेट संघाचे सल्लागार म्हणूनही काम केले होते. २००० च्या दशकाच्या सुरुवातीला रणजी ट्रॉफीमध्ये त्यांनी राजस्थान क्रिकेट संघासाठी काही काळासाठी हीच भूमिका बजावली होती.
#भावपूर्ण श्रद्धांजली #📢16 ऑगस्ट अपडेट्स🆕 #rip #🔴आजचे ताजे अपडेट्स📰