mahesh m. shirkar
592 views
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *३० जानेवारी इ.स.१६४२* महाराज शहाजी राजे कर्नाटकास जातातमाहुलीच्या पराभवानंतर शाहजी राजे रणदुल्लाखान सोबत विजापुरास गेले. त्यांना आदिलशाहकरिता काम करायला मिळणार होते पण कडक जाचाखाली. लगेच त्यांना रणदुल्लाखान बरोबर कर्नाटकात पाठवले गेले. शाहजी राजाच्या कर्नाटकातील कार्याची अजून फारशी माहिती उपलब्ध नाही. त्यांना कर्नाटकात पाठवल्यानंतरचे पहिले पत्र ३० जानेवारी १६४२ सालचे आहे व ते आदिलशाहने शाहजी राजांना लिहीले आहे. *३० जानेवारी इ.स.१६८०* इंग्रज सैन्याने छत्रपती शिवरायांपुढे शरणागती पत्करली. *३० जानेवारी इ.स.१६८१* छत्रपती शंभूराजांनी "बुऱ्हाणपूर" शहराच्या तटबंदीबाहेरील बहादूरपुरा व इतर १७ पुरे अलोट संपत्ती मिळवली. यावेळी बुऱ्हाणपूरचा सुभेदार खानजमान याने मराठ्यांना प्रतिकार न करताच बुऱ्हाणपूराचे दरवाजे बंद करून घेतले. *३० जानेवारी इ.स.१७१५* *कान्होजी आणि सिद्दी यांमध्ये तह* सातारकर छत्रपतींची कोकणची जहागीर मोगलांपासून सुरक्षित राखण्याची जबाबदारी छत्रपती पहिले राजाराम यांनी सिधोजी घोरपडे यांचेवर सोपविली होती, परंतु हे जोखमीचे काम घोरपडे पार पाडू शकले नाही आणि पुढे ही जवाबदारी कान्होजींवर आली. मोगलांच्या जुलमापासून मुक्त केलेल्या कोकणातील जहागिरीला राजमुद्रेची संमती मिळाली, म्हणून कान्होजी आंग्रे यांचे समाधान झाले; तर आपले हितसंबंध राखण्यासाठी आपला एक कर्तबगार प्रतिनिधी आपण कोकणासाठी मिळविला, असे समाधान शाहू छत्रपतींना झाले. १७१३ मध्ये कान्होजींना जो प्रदेश दिला गेला त्यात सिद्दीचा काही प्रदेश दिला गेला होता यामुळे कान्होजी आणि जंजिरेकर सिद्दी यांचे युद्ध झाले. सिद्दीचे परिपत्य करण्यासाठी कान्होजींना इ. स. १७१३ ते १७१५ पर्यंत खूप परिश्रम करावे लागले. अखेर ३० जानेवारी १७१५ मध्ये कान्होजी आणि सिद्दी यांमध्ये तह झाला त्यात १. मामलत तळे व गोरेगाव, गोवेळ व निजामपूर या महलांवर आंग्रे यांना एक हजार रुपये कर मिळाला. तळेपैकी ८००, गोरेगाव ६००, गोवळ १०००, तर्फ निजामपूर १७५ मिळून रुपये २५७५ पैकी १००० रूपये कान्होजींना मिळाले. २. तर्फ नागोठणे, अष्टमी पाली, आश्रेधार पेटा व अंतोणे यांतील निम्मा वसूल कान्होजींनी घेण्याचे ठरले. या तहाने आपली सत्ता कमी झाली हे शल्य जंजीरेकराचे मनात सलत राहिले आणि त्याने कान्होजींचा पराभव करण्यासाठी मुंबईकर इंग्रजांची मदत घेण्याचा उपक्रम केला, इंग्रजांनी मदत केली देखील परंतु कान्होजी पुढे त्या दोघांचे काही चालले नाही.सुरतपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत त्यांचे अनिर्बंध वर्चस्व होते. #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🗿शिवकालीन पुराणवस्तू

More like this