फॉलो करा
mahesh m. shirkar
@301598477
1,735
पोस्ट
5,664
फॉलोअर्स
mahesh m. shirkar
502 जणांनी पाहिले
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *२८ जानेवारी इ.स‌.१६४५* छत्रपती शिवरायांनी रांझ्याचा पाटील बाबाजी भिकाजी गुजर याचे, त्याने बद-अमल केला म्हणून दोनही हात व दोनही पाय कापून काढले व त्याची पिढीजात पाटिलकी जप्त केली. *२८ जानेवारी इ.स.१६४६* *छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘मराठी राज्याची राजमुद्रा’ वापरून लिहिलेले पहिले उपलब्ध पत्र. *२८ जानेवारी इ.स.१६६०* शहिस्तेखान आपल्या अफ्फाट सैन्यासह स्वराज्यावर चालून यायला निघाला. #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩
mahesh m. shirkar
654 जणांनी पाहिले
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *२५ जानेवारी इ.स.१६६४* सुरतेच्या या लुटीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रचंड दरारा निर्माण झाला. सुरतेच्या लुटीचे खरे फलित हेच आहे. लूट किती मिळाली, याचे आकडे भिन्न आहेत; परंतु राजांचा दरारा काय होता त्याचे चित्र इंग्रजी पत्रव्यवहारात मिळते. 'Surat trembles at the name obsevagee.' हे वाक्य बर्‍याच वेळा त्या पत्रव्यवहारात वाचावयास मिळते. 'शिवाजीराजांचे नाव काढताच सुरत भीतीने थरथरावयास लागते.' 'त्या' दरार्‍याचे अचूक वर्णन आहे. २५ जानेवारी १६६४ रोजी सुरतेच्या इंग्रजी वखारीतील एक फॅक्टर हेन्री गॅरी याने अर्ल ऑफ मार्लबरोला लिहिलेले एक पत्र फार बोलके आहे. त्यात गॅरी लिहितो, ''.. Savagee the grand rebell to the king of Deccan came here the 6th of this instant with considerable army, entering the town before the governor scarce had any notice of his aproche. He made a great destruction of houses by fire, upwards of 3000, and carried a vast treasure away with him. It is credibly reported near unto ten million of ruppees.'' मुघलांनी सुरतेच्या या लुटीची हाय खाल्ली. ही बातमी ऐकून अनेक जण दिड्मूढ झाले. औरंगजेब सुन्न झाला. पोतरुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच यांनी मोठमोठी बातमीपत्रे आपापल्या राजांकडे पाठवून दिली. *२५ जानेवारी इ.स.१६६५* छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळातील एक रत्न, राजनैतिक सल्लागार व विश्वासू सेवक सोनोपंत तथा सोनोजी विश्वनाथ डबीर यांचे निधन. *२५ जानेवारी इ.स.१६७३* शिवरायांनी कैदेतील इंग्रज कैद्यांची सुटका केली. *२५ जानेवारी इ.स.१६८४* छत्रपती संभाजी महाराजांची पोर्तुगीजांनी एवढी दहशत घेतली होती की त्यांनी गोव्याची राजधानी मुरगाव बंदरात नेण्याचे ठरवले होते . २५ जानेवारी १६८४ रोजी विसेरई गोव्याच्या दयनीय अवस्थेचे वर्णन करताना पोर्तुगालच्या राजाला लिहतो …. "आमच्या राज्याची अवस्था शोचनीय आहे. मोग्लांमुळे आमचे रक्षण झाले परंतु त्यांनी हे राज्य घेण्याचे ठरवले तर आमची अवस्था अतिशय वाईट होईल ,मोगल निघून गेले तरी देखील संभाजीच्या स्वारीचा धोका पुन्हा आहेच. आमच्या आरमारात माणसे नाहीत. विश्वासू अधिकारी नाहीत,किल्ले निरुपयोगी झालेत,गोलंदाजाची आणि दारूगोल्याची कमतरता आहे.द्रव्याची टंचाई आहेच,हे राज्य आमच्या हातून निसटण्याची भीती आहे …. #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय
mahesh m. shirkar
395 जणांनी पाहिले
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *२४ जानेवारी इ.स.१६६७* *छत्रपती श्री शिवरायांनी १२ मावळ मधील कानंद खोरे या मावळच्या वतनाचा तंटा मिटवला.मरळ घराण्याकडे पुन्हा वतनदारी* 🚩 *#जय_जिजाऊ* *#जय_शिवराय* *#जय_शंभूराजे*🚩 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩
mahesh m. shirkar
594 जणांनी पाहिले
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *#म्यानातून_उसळे_तलवारीची_पात* *#वेडात_मराठे_वीर_दौडले_सात* छत्रपती शिवरायांच्या एका शब्दाखातर खरोखरच सात साहसी वीरांनी शत्रूकडे दौड घेऊन स्वराज्यासाठी बलिदान दिले. सेनापती प्रतापराव गुजर आणि सहा सरदारांनी शौर्य गाजवलेला तो दिवस होता २४ फेब्रुवारी १६७४ बहलोलखान स्वराज्यात धुमाकूळ घालत होता. त्याने स्वराज्याच्या रयतेवर अनन्वित अत्याचार केले. महाराजांनी प्रतापरावांना बहलोलखानास धुळीस मिळवा असा आदेश दिला. मराठ्यांच्या गनीमीकाव्याने प्रतापरावांनी खानाला डोंगरदरीत पकडून जेरीस आणले. वेळ प्रसंग पाहून बहलोलखान शरण आला आणि हा रांगडा शिपाईगडी मेहेरबान झाला. युद्धात शरण आलेल्याला मारू नये असा प्रतापरावांचा शिपाईधर्म सांगत होता. प्रतापरावांनी त्याला धर्मवाट दिली. तो जीव वाचवून गेला.* छत्रपती शिवाजी महाराजांना खबर पोहोचली, “प्रतापरावांनी बहलोलखानाला सोडला!” आपल्या रयतेचे हाल करणारा बहलोलखान जिवंत जातो याचा महाराजांना राग आला. त्यांनी एक खरमरीत पत्र पाठवून प्रतापरावांची कान उघाडणी केली. त्या पत्रात एक वाक्य असं होतं की, "बहलोलखानाला मारल्याशिवाय आम्हाला रायगडी तोंड दाखवू नका ". त्याकाळी मावळ्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांवर असलेला जीव पाहता ही किती भयंकर शिक्षा सुनावल्या गेली होती हे लक्षात येईल.* महाराजांना तोंड दाखवायचं नाही तर मग जगायचं कशासाठी? हा एकच प्रश्न कडतोजींना दिवसरात्र सातावीत होता. जीवाची तगमग होत होती. सैन्य घेऊन बहलोलखानाच्या मागावर निघाले. सर्वत्र जासूद पाठवले. माग काढा ! फक्त माग काढा आणि सांगा कुठे आहे तो गनीम . त्याला मारल्याशिवाय महाराजांना तोंड दाखवता येणार नाही.अशातच एके ठिकाणी सैन्याचा तळ पडलेला होता. मन रमत नाही म्हणून जवळचे सहा सरदार घेऊन प्रतापराव शिकारीला निघाले. काही मैल गेल्या नंतर त्यांच्या हेरांनी बातमी आणली की बहलोलखान जवळच आहे. जवळ म्हणजे कोठे? तर हा समोरचा डोंगर ओलांडला की छावणी आहे.बस! प्रतापरावांना राग अनावर झाला. त्या हेराला त्यांनी तसाच छावणीत पाठवला सैन्याला स्वारीचे आदेश दिला. पण… पण… सैन्य येई पर्यंत प्रतापरावांना थांबवल्या गेलं नाही. त्यांच्या मूळच्या शिपाई स्वभावाला धीर धरता आला नाही आणि त्यांनी आपल्या सरदारांना चढाईचा आदेश दिला. अवघे सात मराठे सुमारे पंधरा हजारच्या सैन्यावर चढाई करतात. यात काय नाही? दुर्दम्य विश्वास , पराकोटीची स्वामीनिष्ठा सारं – सारं काही ! प्रतापरावंचं ठीक पण त्या सहांपैकी एकाचे ही पाय अडखळले नाहीत. केवळ मरणावर चालून गेलेले ते सात वीर हे मराठी इतिहासातील एक स्वर्णीम पराक्रम पर्व आहे. *#दगडात_दिसतील_अजुन्बी_तेथल्या_टाचा ,* *#ओढ्यात_तरंगे_अजुनी_रंग_रक्ताच* #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
mahesh m. shirkar
728 जणांनी पाहिले
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *२० जानेवारी इ.स.१६९६* *सरसेनापती संताजी घोरपडे नावाचे वादळ* हा काळ होता १६९६ मोगल सरदार हिंमतखान बहादूर हा खरोखरच नावाप्रमाणे धाडसी आणि पराक्रमी होता. त्याच्याजवळ सैन्य थोडे असल्याने आतापर्यंत त्याने संताजींवर आक्रमण केले नव्हते. पण आता खुद्द संताजीच त्याच्यावर चालून गेले. मोठ्या धैर्याने त्याने संताजींशी लढायचे ठरविले. आपले सैन्य घेऊन तो बसावापट्टणच्या गढीतून बाहेर पडला आणि त्याने संताजींवर चाल केली. सरसेनापती संताजींनी आपल्या सैन्याच्या दोन तुकड्या केल्या होत्या. एक तुकडी त्याने बसावापट्टणजवळच्या जंगली प्रदेशात लपवून ठेवली होती आणि दुसऱ्या तुकडीचे स्वतः सरसेनापती संताजी नेतृत्व करून लढत होते. लढाई घनघोर सुरु झाली. खान शौर्याने लढत होता. उभय पक्षी अनेक सैनिक रणांगणी पडले. एवढ्यात संताजींनी माघार घेतली. रण टाकून संताजी पाठमोरे पळायला लागले. हिंमतखानला काही सुचेना त्याला त्याचाच डोळ्यावर विश्वास बसत नव्हता हाच तो सरसेनापती संताजी ज्याने बादशहाच्या शामियान्यावरील सोन्याचे कळस मारिले. हाच तो संताजी ज्याने दस्तूरखुद्द छत्रपती संभाजी राजेंना कैद करणाऱ्या त्या मुक्करबखानास जायबंदी केलं. हाच तो संताजी ज्याचा भीम पराक्रमाने महाराष्ट्रच काय तर अवघे तामिळनाडू ढवळून निघाले, हाच तो संताजी ज्याचा मर्दुमकीमुळे मोगलांची दोड्डेरीकडे लांच्छनास्पद माघार घ्यावी लागली तो संताजी आज रणांगण सोडून पळतोय हिंमतखानाने तडक संताजींचा पाठलाग सुरु केला. मोठ्या जोमाने तो संताजींचा पाठलाग करू लागला कारण वाघाला मैदान सोडून पळताना पाहिलंचं होतं कुणी तेव्हा? पाठलाग करत संताजी आले त्या जंगलात जिथे त्यांची पहिली तुकडी दबा धरून बसली होती. खान व त्यांचे सैन्य आपल्या कह्यात आल्याबरोबर. संताजी एकाएकी थांबले व पलटी खाऊन त्यांनी लढाईस सुरवात केली. त्याच वेळी जंगलात दबा धरून बसलेले मराठी सैन्य अचानक पुढे येऊन त्याने खानास त्याच्या सैन्यासह, घेरले. संताजींचे अनेक बंदूकधारी जंगलातील झाडावर दबा धरून बसलेले. आणि नेमबाजीमध्ये ते चांगलेच तरबेज होते. कचाट्यात सापडलेल्या हिंमतखानच्या सैन्याची चांगलीच लांडगेतोड मराठ्यांनी केली. सर्व बाजूंनी वेढला जाऊनही खान पराक्रमाने लढला. ऐन लढाईत त्याच्या कपाळाला मोठी गोळी लागली. व तो जबर जखमी होऊन हौद्यात कोसळला. आता मोगल सेनेचे नीतिधैर्य पूर्ण नष्ट होऊन तिचा पुरा पाडव झाला. या लढाईत मोगलांचे एकूण ५०० सैनिक ठार झाले. काही मोगल सैनिकांनी जखमी हिंमतखान बहादुरास आपल्या ठाण्यात नेले. तेथे तो त्याचं दिवशी मरण पावला खुद्द सरसेनापती संताजींना ह्या लढाईत बाणाच्या दोन जखमा झाल्याचा उल्लेख आहे ही लढाई झाली २० जानेवारी १६९६ छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेला गनिमी कावा सरसेनापती संताजींनी पुरेपुर लक्षात ठेवाला. त्याचा वापर केला. आणि राज्याभिषेकानंतर अभिषेकासाठी झालेला खर्च वसूल करण्यासाठी बहादूर खानच्या पेडगावच्या छावणीवर हल्ला करून जसा कावा साधला होता अगदी तसाच डाव इथे संताजींनी साधला. #🙏शिवदिनविशेष📜 #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩शिवराय
mahesh m. shirkar
617 जणांनी पाहिले
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *१९ जानेवारी इ.स.१५९७* *#महाराणा_प्रताप_यांचा_स्मृतिदिन* *(जन्म ९ मे १५४०)* राणा प्रतापसिंह गुहिलोत ह्या राजपूत वंशातील एक अत्यंत पराक्रमी राजा. उदयसिंहाचा पुत्र. प्रतापसिंह गुहिलोत ह्या नावाने हा राजस्थानात प्रसिद्ध आहे. उदयसिंहाने जगमल ह्या आपल्या आवडत्या पुत्रास गादीचा वारस नेमले होते; परंतु प्रतापसिंहांच्या मामाने इतर सरदारांच्या मदतीने जगमलास दूर करून प्रताप यांना १ मार्च १५७२ रोजी महाराणा केले. ते महाराणा झाले त्यावेळी राजधानी चितोड शत्रूच्या हातात गेली होती. अनेक राजपूत अधिपतींनी अकबराचे स्वामित्व पतकरले होते व काहींनी आपल्या मुली त्यास देऊन शरीरसंबंध जोडला होता; पण राणाप्रताप यांनी त्याच्यापुढे मान लवविली नाही. त्याने चितोड अकबराच्या हातून स्वतंत्र करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि आपले वास्तव्य अकबराच्या सैन्याच्या दृष्टिक्षेपापासून दूर ठिकाणी केले. प्रजेला अरवलीच्या डोंगराळ भागात, जेथे अकबराचा उपद्रव पोहोचणार नाही, अशा ठिकाणी वस्ती करण्यास लावले. तेथेच त्याने काही भागात शेती केली. मेवाडचा मैदानी प्रदेश ओसाड करून टाकला आणि आपली राजधानी गोगुंड येथे नेली. सर्व डोंगरभागांतून अभेद्य असे किल्ले बांधले व ते शस्त्रास्त्रांनी सुसज्ज केले. अकबराचे स्वामित्व न पतकरल्यामुळे त्यास मोगलांशी अखेरपर्यंत झगडा करावा लागला. अकबराने मानसिंह आणि आसफखान यांच्याबरोबर मोठी सेना देऊन त्याच्यावर पाठविले. २१ जून १५७६ रोजी हळदीघाटच्या घनघोर लढाईत प्रतापसिंहाचा पराजय झाला, तरी तो तीतून निसटला आणि राजस्थानच्या दऱ्याखोऱ्यांतून त्याने मोगलांशी गनिमी काव्याने संघर्ष चालू ठेवला. त्यांच्या रसदा तोडल्या, खजिने लुटले. अकबर स्वतः त्याच्यावर चालून गेला पण त्याला प्रताप यांना न जिंकताच परत फिरावे लागले. त्याची पाठ वळताच प्रतापानी आपले गेलेले सर्व किल्ले परत मिळविले. यानंतर त्याने पुढे १२ वर्षे शांततेने राज्य केले. ह्यावेळी अकबर हा पंजाब व दक्षिण भारत ह्या दोन ठिकाणी आपली सत्ता स्थिर करण्याच्या बेतात होता. त्यामुळे त्याने पुढे प्रतापकडे लक्ष दिले नसावे. राणाप्रतापास परचक्राची फार चिंता होती. म्हणून त्याने आपल्या सरदारांकडून तुर्कांपासून आपल्या देशाचे रक्षण करण्याचे प्रथम वचन घेऊन नंतर आपल्या अमरसिंह ह्या पुत्राच्या हाती राज्य सोपविले व प्राण सोडला. अकबरानेही त्याची मुक्तकंठाने स्तुती केली आहे. कर्नल टॉड म्हणतो, महाराणा प्रताप यांचे नाव अजूनही पूज्य मानले जाते आणि पुढेही एखाद्या नवीन जुलमी राजसत्तेकडून राजपुतांत शिल्लक असलेली देशाभिमानाची ठिणगी विझेपर्यंत ते नाव पूज्यच मानले जाईल.’ #🚩शिवराय #🚩छत्रपति शिवाजी महाराज #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🙏शिवदिनविशेष📜
mahesh m. shirkar
734 जणांनी पाहिले
*शिवविचार_प्रतिष्ठान* *१७ जानेवारी इ.स.१६४५* *छत्रपती शिवरायांनी दादाजी नरसप्रभुंना पत्र पाठवले.* रोहिड व वेलवंड भागाचे कुलकर्णी दादाजी नरसप्रभु हे शिवरायांबरोबर उठावात सामिल झाले, यामुळे विजापुर दरबाराने त्याना जरबेचे पत्र पाठवले, त्यामुळे हवालदिल झालेल्या दादाजींना छत्रपती शिवरायांनी पत्र पाठवून स्वराज्यात सामिल होण्याचे आवाहन केले. *१७ जानेवारी इ.स.१६४८* आदीलशहाने "नवाब मुस्तफाखान" यास हुकूम दिला की,कर्नाटक मध्ये जाऊन त्या बगावतखोर "शहाजी भोसले" ला गिरफ्तार करा.नवाब मुस्तफाखान" आणि "बाजी घोरपडे" प्रचंड फौज घेऊन महाबली शहाजी राजांना कैद करण्यासाठी विजापूरहून "किल्ले जिंजी" कडे निघाले." #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🙏शिवदिनविशेष📜
mahesh m. shirkar
1.5K जणांनी पाहिले
*#शिवविचार_प्रतिष्ठान* ⛳ *श्रीशंभुराज्याभिषेक सोहळा* ⛳ *१६ जानेवारी इ. स.१६८१ रोजी राजे संभाजी महाराज छत्रपती झाले•* *थोरल्या महाराजांच्या मृत्युनंतरच्या अस्थिर वातावरणात झालेल्या मंचकरोहणात शंभुराजे व त्यांच्या सहकारी मंत्र्याधिकाऱ्यांना त्यातुन तितके समाधान व शास्त्रार्थाच्या दृष्टीने निर्दोषत्व वाटले नाही. त्यामुळे शंभुराजांवर विधियुक्त राज्याभिषेक करवुन राजसिंहासानाची प्रतिष्ठा राखावी असा विचार झाला. त्यानुसार शंभुराजांनी आपला राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला•* *१४, १५ व १६ जानेवारी १६८१ (रौद्रनाम संवत्सरातील माघ शुद्ध ७, शके १६०२) यादिवशी शंभुराजांचा विधियुक्त राज्याभिषेक झाला व ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले•* *राज्याभिषेक प्रसंगी पुर्वीच्या कैद्यांना मुक्त करण्याचा रिवाज असल्याने शंभुराजांनी कैद्यांना मुक्त केले. प्रधान मंडळातील अण्णाजी दत्तो, निळोपंत, बाळाजी आवजी, जनार्धनपंत आदींच्या समावेशाने प्रधान मंडळ नेमुन त्यांना कारभार सांगितला गेला.* #🚩छत्रपति शिवाजी महाराज #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
See other profiles for amazing content